Agriculture news in Marathi Basmati rice scarcity | Page 2 ||| Agrowon

‘बासमती’ची तांदळाचा तुटवडा

राजकुमार चौगुले
गुरुवार, 7 जानेवारी 2021

गेल्या महिन्यापासून सुरु असलेल्या किसान आंदोलनाचा फटका बासमती तांदळाला बसला आहे. सीमा बंद असल्याने या तांदळाच्या वाहतुकीला अडथळे निर्माण झाले आहेत. परिणामी मागणी इतका तांदूळ उपलब्ध होत नसल्याने बासमती तांदळाच्या दरात क्विंटलला सरासरी १००० रुपयांनी वाढ झाली आहे.

कोल्हापूर: गेल्या महिन्यापासून सुरु असलेल्या किसान आंदोलनाचा फटका बासमती तांदळाला बसला आहे. सीमा बंद असल्याने या तांदळाच्या वाहतुकीला अडथळे निर्माण झाले आहेत. परिणामी मागणी इतका तांदूळ उपलब्ध होत नसल्याने बासमती तांदळाच्या दरात क्विंटलला सरासरी १००० रुपयांनी वाढ झाली आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बासमतीचे उत्पादन चांगले असले तरी आंदोलनाचा फटका या तांदळाला बसला. आंदोलन संपल्यानंतरच बासमती तांदूळ देशातील विविध बाजारपेठांत आवश्‍यक त्या प्रमाणात पोचू शकणार असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. यंदाचा हंगाम १५ नोव्हेंबरला सुरु झाला. हंगाम सुरु झाल्यानंतर काहीच दिवसातच आंदोलन सुरु झाले. यामुळे बासमतीची पंजाब, हरियानातून होणारी वाहतूक विस्कळित झाली. राइस मिल धारकही धोका पत्करून तांदळाची वाहतूक करण्यास नकारघंटा देत आहेत. परिणामी पुरेशा प्रमाणात हा तांदूळ मिळणे अशक्‍य बनले आहे.

बासमती तांदळाला देशाबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारातूनही मोठी मागणी असते.  गेल्या काही वर्षापासून पारंपारिक बासमती तांदूळ घेण्याचे प्रमाण नगण्य बनत आहे. याऐवजी बासमतीची हायब्रीड व्हरायटी ११२१, १५०९, शेला बासमती आदि प्रकारांना मागणी वाढतानाचे चित्र आहे. शेतकऱ्यांनाही पारंपारिक बासमती तांदळापेक्षा हायब्रीड व्हयरायटी उत्पन्नाच्या दृष्टीने फायदेशीर होत असल्याने शेतकऱ्यांचीही या व्हरायटीला पसंती आहे. याची लांबीही पारंपारिकपेक्षा जास्त असते. यामुळे ती व्यावसायिकांनाही परवडते.

आंतरराष्ट्रीय बाजारातून मागणी कायम
भारत प्रमुख निर्यातदार देश आहे. यंदाही आंतरराष्ट्रीय बाजारातून मागणी कायम आहे. एप्रिल ते नोव्हेंबर २०२० अखेर ३१ लाख टन बासमतीची निर्यात झाली. अजूनही निर्यात सुरू असून ती ४५ लाख टनापर्यंत जाईल, असा अंदाज व्यापारी सूत्रांचा आहे

यंदा बासमतीचे पीक चांगले आहे. पंजाब हरियाना सीमेवर सुरु झालेल्या किसान आंदोलनामुळे खरेदी विक्री प्रक्रियेत अडथळे निर्माण होत आहेत. यामुळे दरात वाढ झाली आहे. यंदाच्या हंगामाचा आढावा घेतल्यास यंदा निर्यातही चांगली होइल. नॉन बासमतीप्रमाणे बासमती तांदळालाही चांगली मागणी राहील हे निश्‍चित.
- राजेश शहा, वरिष्ठ उपाध्यक्ष, फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र (फाम)


इतर अॅग्रोमनी
आवक वाढूनही हरभरा दर टिकून पुणे ः यंदा हरभरा उत्पादनात घटीचा अंदाज आणि सण...
देशातील कापूस उत्पादन ३५८ लाख गाठींवर...नवी दिल्ली ः देशात यापूर्वी कापसाचे ३६० लाख गाठी...
मोहरीला दराचा ‘तडका’ पुणे ः राजस्थानमध्ये मोहरीच्या दराने हमीभावाचा...
हळदीची आवक वाढू लागली सांगली/परभणी ः बाजार समित्यांत हळदीची आवक वाढू...
देशात विक्रमी फलोत्पादनाचा अंदाज पुणे ः देशात २०२०-२१ मध्ये फलोत्पादनात फळांचे १०३...
चीनकडून शेतीमालाची आक्रमक खरेदी पुणे ः जागतिक पातळीवर जवळपास सर्वच शेतमालाची...
हरभरा दरात घसरणीची शक्यता कमीपुणे ः हरभरा आवक वाढत असून पुढील १० ते १२ दिवसांत...
तेलबिया उत्पादनात वाढ वॉशिंग्टन ः जागतिक तेलबिया उत्पादनात फेब्रुवारी...
सांगली बाजार समितीत हळदीची आवक वाढलीसांगली ः  कोरोना विषाणूचा वाढता...
सरकारी आकड्यांपेक्षा हरभरा उत्पादनात घट यंदाच्या हंगामात सुरुवातीपासूनच पिकांना बदलत्या...
देशात साखर उत्पादनात ४० लाख टनांनी वाढलेकोल्हापूर : देशातील साखर कारखान्यांनी...
केंद्रीय गोदाम महामंडळाची क्षमता अनेक...नवी दिल्ली ः केंद्रीय गोदाम महामंडळाची क्षमता...
पाकिस्तानची भारतीय कापसाला पसंती जळगाव ः पाकिस्तान कापसासाठी भारताच्या दारात...
हरभरा बाजारात सुधाराची चिन्हे पुणे ः बाजारात हरभरा आवक सुरू झाली आहे....
बाजारात तूर खातेय भाव; वाढ कायम पुणे ः इतर कडधान्य पिकांसह तूर उत्पादनातही घट...
हळदीला दराचा ‘रंग’ पुणे ः हळद उत्पादनात घट झाल्याने यंदा हळदीचे दर...
अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन नवी दिल्ली ः देशात यंदा अन्नधान्याचे विक्रमी...
राष्ट्रीय खाद्यतेल मिशनचा यंदाही चकवापुणे : राष्ट्रीय खाद्यतेल मिशनची यंदाही घोषणा न...
सोयाबीनमधील तेजी कायम पुणे ः सोयाबीनने प्लॅंट दरासह बाजार...
हरभरा बाजाराला ‘नाफेड’चा टेकू पुणे ः नाफेडने राज्यनिहाय खरेदीचे उद्दिष्ट जाहीर...