agriculture news in marathi B_B_Thombre honoured by Jamnalal Bajaj Award | Page 3 ||| Agrowon

जमनालाल बजाज पुरस्कार बी. बी. ठोंबरे यांना प्रदान

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 7 सप्टेंबर 2021

जमनालाल बजाज नैतिक उद्योग पुरस्कार रांजनी (ता. कळंब) येथील नॅचरल शुगर्स ॲण्‍ड अलाईडचे संस्थापक अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांना मुंबईत येथे नुकताच (ता.३) झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. 

लातूर : कौन्सिल फॉर फेअर बिझनेस प्रॅक्टिसकडून देण्यात येणारा या वर्षीचा जमनालाल बजाज नैतिक उद्योग पुरस्कार रांजनी (ता. कळंब) येथील नॅचरल शुगर्स ॲण्‍ड अलाईडचे संस्थापक अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांना मुंबईत येथे नुकताच (ता.३) झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. 

ऊस उत्पादक शेतकरी, सभासदांचा विश्वास संपादन करून साखरे बरोबरच विविध उपपदार्थांची निर्मिती करून शेतकरी व कर्मचा-यांचे हीत जोपासण्याचा प्रयत्न ठोंबरे यांनी केला आहे. नॅचरल शुगरचा ‘नॅचरल परिवार’ तयार करून परिवारातील प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंधित सर्वांना रोजगार उपलब्ध करून त्यांनी दिला आहे.

साखर, दूध, स्टील, इथेनॉल, शेतीमाल साठवणेसाठी ग्रामीण भागात कोल्ड स्टोअरेज, रेशीम धागा निर्मिती प्रकल्प, सीएनजी प्रकल्प, सामाजिक बांधिलकी म्हणून शैक्षणीक संस्था, ग्रामीण रूग्णालय, पतसंस्था, नॅचरल बझार असे विविध प्रकल्प एकाच छताखाली श्री. ठोंबरे यांनी राबवले आहेत. या बाबींची देशपातळीवर दखल घेऊन कौन्सिल फॉर फेअर बिझनेस प्रॅक्टिसेसकडून श्री. ठोंबरे यांचा सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमुर्ती बी. एन. श्रीकृष्णा व जे. के. उद्योग समुहाचे अनंत सिंघानिया यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. 

ग्राहक समाधान व संवाद, कर्मचारी प्रेरणा, पर्यावरण संरक्षण, पुरवठा साखळी प्रणाली, कायद्याचे व आचारसंहितेचे पालन, सामाजिक दायित्व या मुद्यांवर उद्योग, सेवा, व्यापार क्षेत्रातील उल्लेखनीय उद्योजकांना हा पुरस्कार दिला जात आहे. यापूर्वीही बी. बी. ठोंबरे यांना राज्य शासनाच्या कृषिरत्नसह विविध मानाचे ३५ पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. 
 


इतर ताज्या घडामोडी
अकोला, वाशीम जि.प.,पंचायत समिती...अकोला ः जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील रिक्त...
आठवडी बाजार सुरू करा : मुनगंटीवारचंद्रपूर ः राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव...
शिवसेनेचे शिष्टमंडळ लखीमपूरला जाणार;...नवी दिल्ली : लखीमपूर खेरी येथील हिंसा आणि...
सांगलीत १० ते १५ टक्क्यांनी सोयाबीनचे...सांगली ः जिल्ह्यात जुलै महिन्यात आलेल्या...
शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी...लखनौ ः लखीमपूरमधील हिंसाचारानंतर राज्य...
लखीमपूर खेरीतील हिंसाचार...नवी दिल्ली ः शेतकऱ्यांचा बळी घेणाऱ्या लखीमपूर...
पुणे जिल्ह्यातील पशुधन बाजार बंदपुणे ः केंद्र सरकारकडून वेळेत लसींचा पुरवठा न...
देशांतर्गत कडधान्य उत्पादनवाढ गरजेचीपुणे : गेल्या तीन दशकांत कडधान्य लागवड आणि...
मागणी वाढल्याने उन्हाळ  कांदा...नाशिक : जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांत...
आजच्या ग्रामसभांना ग्रामसेवकांचा विरोध नगर : राज्याच्या ग्रामविकास विभागाने आज (ता. २)...
राज्य सरकारने तातडीने भरपाईचा निर्णय...नागपूर : राज्यावर मोठी नैसर्गिक आपत्ती येते....
वीजदर सवलतीबाबत उपमुख्यमंत्री सकारात्मक कोल्हापूर : राज्यातील उच्च दाब आणि लघू दाब सहकारी...
‘महानंद’ला बदनाम करण्याचे प्रयत्न : ...मुंबई : कोरोनाची भयंकर परिस्थिती असताना ‘महानंद’...
पीक नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे...नाशिक : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
बँकांनी कर्ज प्रकरणे वेळेत मंजूर करावीत...वाशीम : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बँकांनी खरीप आणि...
शेतकरी आंदोलकांवर सर्वोच्च न्यायालय...नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या सीमांवर ठाण...
‘माळेगाव कारखाना देणार  शेतकऱ्यांना ‘...माळेगाव, जि. पुणे : माळेगाव साखर कारखाना आगामी...
मुंबै बँकेची चौकशी केवळ सुडाने आणि...मुंबई ः मुंबै बँकेच्या विरोधात चौकशी करण्याचा...
नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची...नाशिक : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्यानंतर पुन्हा...
तापी, वाघूर, गिरणा नदीला पुन्हा पूरजळगाव  : जिल्ह्यात महत्त्वाच्या मानल्या...