बीसीजी लस घेतलेल्यांना कोरोनाचा धोका तुलनेने कमी; न्यूयॉर्क तंत्रज्ञान महाविद्यालयातील संशोधन
बीसीजी लस घेतलेल्यांना कोरोनाचा धोका तुलनेने कमी; न्यूयॉर्क तंत्रज्ञान महाविद्यालयातील संशोधन

बीसीजी लस घेतलेल्यांना कोरोनाचा धोका तुलनेने कमी; न्यूयॉर्क तंत्रज्ञान महाविद्यालयातील संशोधन

पुणे : क्षयरोगाचा (ट्यूबरक्यूलोसिस-टीबी) प्रतिबंध करणारे बॅसिलस कॅलमेट्टे ग्युनेन (बीसीजी) हे लसीकरण लहान मुलांसाठी बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनो (कोविड-१९) या रोगाचा धोका तुलनेने कमी असल्याचा निष्कर्ष अमेरिकेतील न्यू यॉर्क तंत्रज्ञान महाविद्यालयातील संशोधकांनी काढला आहे.

पुणे : क्षयरोगाचा (ट्यूबरक्यूलोसिस-टीबी) प्रतिबंध करणारे बॅसिलस कॅलमेट्टे ग्युनेन (बीसीजी) हे लसीकरण लहान मुलांसाठी बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनो (कोविड-१९) या रोगाचा धोका तुलनेने कमी असल्याचा निष्कर्ष अमेरिकेतील न्यू यॉर्क तंत्रज्ञान महाविद्यालयातील संशोधकांनी काढला आहे. या निष्कर्षामुळे बीसीजी लसीकरण धोरणात्मकरित्या बंधनकारक असलेल्या भारतासारख्या अन्य देशांसाठीही आशेचा किरण दिसू लागला आहे.    न्यू यॉर्क तंत्रज्ञान महाविद्यालयातील जैववैद्यकीय शास्त्राचे सहाय्यत प्रा. डॉ. गोंझालो ओताझू यांच्या नेतृत्वाखाली ॲरॉन मिलर, मॅक जॉश रिॲंडलर, किंबर्ले फॅसिग्लीओनी, व्हॉयोलेटा रोमॅनोवा आणि यान ली यांच्या चमूने कोविड-१९च्या उद्रेकानंतर २१ मार्चपर्यंत जगभरातून मिळालेल्या माहितीच्या आधारे अभ्यास केला. त्यांच्या त्यांचा प्रबंधाचा विषय ‘सार्वजनिक बीसीजी लसीकरण धोरण आणि त्यामुळे कोविड-१९मध्ये कमी झालेला फैलाव व घटलेला मृत्यूदर यांचा परस्पर संबध : एका महामारीचा अभ्यास,’असा होता. प्रबंधाच्या निष्कर्षानुसार, ज्या देशांमध्ये बीसीजी लसीकरणाचे राष्ट्रीय धोरण लवकर सुरू करण्यात आले, त्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर हा तुलनेने कमी राहिला आहे. म्हणजेच बीसीजी लसीकरणामुळे, कोविड-१९ विषाणूंमुळे होणाऱ्या मृत्यूंना मोठ्या प्रमाणात अटकाव झाला आहे, असेही नमूद केले आहे. भारताने स्वातंत्र्यप्राप्तीनंतर लगेचच १९४८ मध्ये बीसीजी लसीकरणाचा राष्ट्रीय धोरण म्हणून अंगीकार केला होता. त्यामुळे आपल्या देशाला कोरोनाच्या धोक्याची तीव्रता कमी असू शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.  सर्वसाधारणपणे, विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात प्रगत देशांमधून क्षयरोग नष्ट होऊ लागला. त्यानंतर विशेषतः अमेरीका, इटली, नेदरलॅड, स्पेन, बेल्जियम अशा प्रगत देशांनी बीसीजी लसीकरणाकडे दुर्लक्ष केल्याचे नमूद केले आहे. याउलट, युरोपातील डेन्मार्क सारख्या देशाने बीसीजी लसीकरण सक्तीचे केले. जपान, ब्राझील, चीन (सांस्कृतिक क्रांतीचा काही काळ वगळता), बीसीजी लसीकरण हे राष्ट्रीय धोरण आहे. परिणामी, स्पेनमध्ये दहा लाख लोकांपैकी २९.५ जण मृत्युमुखी पडले तर डेन्मार्कमध्ये हे प्रमाण  फक्त २.३ इतके (सुमारे दहापटीने कमी) मर्यादित राहिले. याउलट, इराणने बीसीजी लसीकरण ३६ वर्षापूर्वी (१९८४ मध्ये) सुरू केले त्यामुळे ३६ वर्षापुढील सर्वांना कोविड-१९ चा धोका निर्माण झाला. त्या देशामध्ये मृत्यूदर दहा लाखांमागे १९.७ इतका झाला. याउलट जपानमध्ये १९४७ पासून बीसीजी लसीकरण सुरू केल्याने चीन पाठोपाठ कोरोना तेथे धडकूनही मृत्यूदर मात्र इराणच्या तुलनेत दहापट कमी (म्हणजे ०.२८) इतका मर्यादित राहिला.  अशा, विविध आकडेवारीनिशी, बीसीजी लसीकरण आणि कोरोनामुळे होणारे मृत्यू आणि या साथीचा फैलाव याची सांगड या संशोधकांनी घातली आहे. आपल्या देशात बीसीजी लसीकरण सक्तीचे असल्यामुळे या प्रबंधाचा निष्कर्ष हा दिलासादायक ठरू शकेल.  अहवाल म्हणतो :

  •   बीसीजीची लस श्‍वसनाचा संसर्ग रोखते. कोरोनामध्ये मृत्यू प्रामुख्याने श्‍वसनमार्गाच्या संसर्गाने होतो.
  •   कोरोनाविरुद्धच्या लढाईत वेळीच झालेले बीसीजी लसीकरण हे आपल्या देशासाठी फायदेशीर ठरू शकते. 
  •   जपान, चीन, डेन्मार्कमध्ये कोरोनाला अटकाव हा सक्तीच्या बीसीजी लसीकरणामुळे झाला असावा.
  •   ज्येष्ठांना बीसीजी लस दिल्यास काय फायदा होईल, याची पडताळणी करण्यास वाव आहे.
  •   कोरोना वाहून नेणाऱ्यांवर (कॅरीअर) बीसीजी मात्रा पडताळून पहावी.
  • न्यूयॉर्क कॉलेजचे संशोधन तर्कसंगत वाटते. आपल्या देशात मलेरिया, क्षयरोगाबाबत प्रतिकारशक्ती चांगली विकसित असल्यामुळे आपली कमीत कमी हानी होऊ शकते. कोरोना प्रसाराचा वेग मंदावल्यास हे  संशोधन आपल्यालाही लागू झाले असे म्हणता येईल. — डॉ. विनोद शहा, सिनिअर फिजिशियन

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com