सांगलीत २०१४च्या तुलनेत महायुतीला धक्का

सांगलीत २०१४च्या तुलनेत महायुतीला धक्का
सांगलीत २०१४च्या तुलनेत महायुतीला धक्का

सांगली : २०१४ च्या मोदी लाटेत चार अधिक एक अशी भाजप-शिवसेनेचे भरभक्कम पाठबळ लाभलेल्या महायुतीला २०१९ च्या निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीने धक्का दिला. जतमध्ये कॉंग्रेस तर शिराळ्यात राष्ट्रवादीने कमबॅक केले आहे. सांगली-मिरजेच्या दोन जागांवर भाजपने वर्चस्व कायम ठेवले.

जत तालुक्यात गेल्या तीन निवडणुकांमध्ये भाजपचा गड राहिलेल्या जत विधानसभा मतदार संघात कॉंग्रेसने जोरदार कम बॅक केले. कॉंग्रेसचे उमेदवार विक्रमसिंह सावंत यांनी दुपारी बारापर्यंत २४ हजार मतांची निर्णायक आघाडी घेतली होता. भाजपचे विद्यमान आमदार विलासराव जगताप यांचा पराभव निश्‍चित मानला जात आहे. इस्लामपुरात तिरंगी लढत झाल्याने जयंत पाटील यांना रोखण्यात विरोधकांना यश येते का? याकडे लक्ष होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विरोधकांतील फुटीचा पुरेपूर फायदा उठवत सलग सातव्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली. 

मिरज विधानसभा मतदार संघात भाजप उमेदवार, सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे यांचा विजय निश्‍चित मानला जात आहे. त्यांनी १६ हजाराहून अधिक आघाडी घेतली आहे. तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघातील आर. आर. आबांच्या गडात श्रीमती सुमनताई पाटील यांचा करिश्‍मा कायम राहिला आहे. राष्ट्रवादीने तब्बल ६५ हजार मतांनी निर्णायक आघाडी घेतली. शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी आघाडी घेतली आहे.

कॉंग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष, आमदार विश्वजित कदम यांनी एक लाखाहून अधिक मताधिक्‍याने विजय मिळवण्याच्या दृष्टीने घोडदौड सुरू केली आहे. त्यांनी मतदार संघात मोठी मुसंडी मारली आहे. मते ही "नोटा' या बटणाला पडली असल्याने तो राज्यभर चर्चेचा विषय ठरणार आहे.  शिराळा विधानसभा मतदार संघात अपेक्षेप्रमाणे धक्कादायक निकाल नोंदवत राष्ट्रवादीच्या मानसिंगराव नाईक यांनी विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक यांना धक्का बसण्याची शक्यता आहे.

विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासमोर कॉंग्रेसचे नवखे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांनी चांगलेच आव्हान उभे केले आहे. यामुळे सांगलीत प्रचंड धाकधूक निर्माण झाली आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com