Agriculture news in marathi To be an alternative to sugarcane Ability in summer dancing | Page 3 ||| Agrowon

उसाला पर्याय ठरण्याची उन्हाळी नाचणीत क्षमता

टीम अॅग्रोवन
सोमवार, 19 एप्रिल 2021

उन्हाळी नाचणी उसाचे कमी उत्पादन असणाऱ्या भागात एक पर्यायी पीक म्हणून मोठ्या प्रमाणावर स्वीकारले जात आहे, हे उत्साहवर्धक चित्र आहे, असे मत विभागीय कृषी सहसंचालक उमेश पाटील यांनी व्यक्त केले. 

कोल्हापूर : उन्हाळी नाचणी उसाचे कमी उत्पादन असणाऱ्या भागात एक पर्यायी पीक म्हणून मोठ्या प्रमाणावर स्वीकारले जात आहे, हे उत्साहवर्धक चित्र आहे, असे मत विभागीय कृषी सहसंचालक उमेश पाटील यांनी व्यक्त केले. पन्हाळा तालुक्यात उन्हाळी नाचणी प्रक्षेत्रांना भेट दिल्यानंतर त्यांनी नाचणी उत्पादकांसोबत संवाद साधला.

या वेळी प्रादेशिक कृषी विस्तार प्रशिक्षण संस्था (रामेती) कोल्हापूरचे सहाय्यक संचालक नामदेव परीट उपस्थित होते. पाटपन्हाळा येथील दगडू पाटील, धोंडीराम पाटील, बाळासाहेब मोहिते, किसरुळ येथील बळवंत पाटील, गणपती संभाजी पाटील यांच्या उन्हाळी नाचणी प्रक्षेत्राला उमेश पाटील यांनी भेट देऊन माहिती घेतली. पिसात्री येथील प्रयोगशील शेतकरी मिलिंद पाटील यांची भेट घेऊन त्यांचे उन्हाळी नाचणी आणि उन्हाळी वरी उत्पादनाचे अनुभव जाणून घेतले. 

महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत विभागीय कृषी संशोधन प्रकल्प शेंडापार्क कोल्हापूर येथे विकसित केलेल्या अधिक उत्पादनक्षम फुले नाचणी या वाणाचा उन्हाळी लागवडीसाठी गेल्या तीन वर्षांपासून वापर करीत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. 

विभागीय कृषी संशोधन प्रकल्प शेंडापार्क कोल्हापूर येथील सध्याचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. उत्तम होले, नाचणी पैदासकार डॉ. योगेश बन, प्रा. गणपती सूर्यवंशी यांचे उन्हाळी नाचणी आणि उन्हाळी वरी उत्पादनाबाबत संशोधनाचे प्रभावी काम सुरू असल्याने येणाऱ्या काळात उन्हाळी नाचणी उत्पादनाला मोठी संधी उपलब्ध होणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. गगनबावडा तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक पराग परीट यांनी सन २०१८ व २०१९ मध्ये राबविलेल्या उन्हाळी नाचणी उत्पादन प्रयोगांबाबत तसेच इतर पिकांसोबत तुलनात्मक उत्पन्नाची सविस्तर माहिती दिली.

कृषी भूषण सर्जेराव पाटील, कृषी पर्यवेक्षक विलास गायकवाड, कृषी सहाय्यक मधुकर कुंभार, उदय पाटील यांच्यासह संभाजी पाटील, युवराज पाटील, ज्योतिराम पाटील आदी उन्हाळी नाचणी उत्पादक शेतकरी उपस्थित होते.


इतर ताज्या घडामोडी
सोलापूरच्या कृषी विभागात कोरोनाचा शिरकावसोलापूर ः जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा विळखा वरचेवर...
पंढरपूरला आणखी २०० बेड वाढवणार ः भरणेसोलापूर : ‘‘पंढरपुरातील वाढत्या कोरोना...
केहाळ येथे भुईमुगाची उन्हाळी हंगामात...परभणी ः जिल्ह्यातील केहाळ (ता. जिंतूर) येथील...
नाशिकच्या उत्तरपूर्व भागात टँकर सुरूनाशिक : जिल्ह्याच्या अनेक भागात समाधानकारक पाऊस...
लातूर कृषी विभागातील पाच जिल्ह्यांत...लातूर : लातूर कृषी विभागातील पाच जिल्ह्यांत...
परभणीत कपाशी क्षेत्र घटण्याची शक्यतापरभणी ः ‘‘जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
सोलापुरात माल उतरण्यासाठी भुसार बाजारात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
सातारा : कांदा बी सदोष निघाल्याने...विसापूर, जि. सातारा : खासगी कृषी फार्म, व्यापारी...
विमा कंपनी विरोधात शेतकऱ्यांमध्ये रोषगोंदिया : खरीप हंगामात अतिवृष्टी, संततधार पाऊस व...
सोयाबीन बियाण्यांची खरिपासाठी जुळवाजुळवअकोला : येत्या हंगामासाठी शेतकरी घरगुती सोयाबीन...
‘कुरनूर’मधून पाण्याचे दुसरे आवर्तन सोडलेसोलापूर ः अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरणातून...
पंढरपुरातील दोन्ही भक्त निवासे कोरोना...सोलापूर ः पंढरपूर शहर आणि तालुक्यातील कोरोना...
कोरोना सुपरस्प्रेडर रोखण्यासाठी पुणे...पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात...
सांगलीत साखरेचे उत्पादन १३ लाख...सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या गळीत...
‘पंदेकृवि’चा दीक्षान्त समारंभ अखेर पुढे...अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा...
ऑक्सिजन, रेमडेसिव्हिरचा पुरवठा करा ः...मुंबई ः महाराष्ट्राला अधिक ऑक्सिजनची गरज असून,...
बाजार समिती कर्मचाऱ्यांना विम्यासाठी ‘...पुणे ः कोरोना संकटात बाजार समिती कर्मचाऱ्यांचा ५०...
डाळिंब प्रक्रिया, मुल्यवर्धन तंत्रज्ञान...औरंगाबाद : डाळिंब पिकापासून जास्त आर्थिक नफा...
वन्यप्राण्यांपासून पीक वाचवण्यासाठी...मंडणगड, जि. रत्नागिरी ः वन्य प्राण्यांच्या...
यंदा कर्तव्य असणाऱ्यांसाठी ६४ मुहूर्त नागपूर : कोरोनामुळे वेळेवर तारखांत बदल करावा लागत...