सांडपाणी गोदावरीत मिसळणार नाही यासाठी दक्षता घ्या : भुजबळ

सांडपाणी गोदावरीत मिसळणार नाही यासाठी दक्षता घ्या : भुजबळ
सांडपाणी गोदावरीत मिसळणार नाही यासाठी दक्षता घ्या : भुजबळ

नाशिक : शहरातील गटारामार्फत नदीत मिसळणाऱ्या सांडपाण्यामुळे नदीचा प्रवाह दूषित होतो, त्यामुळे हे सांडपाणी नदीत मिसळणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्री तथा अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिले. अविरल निर्मल गोदावरी साक्षरता यात्रेत भुजबळ यांनी सहभाग घेतला. यावेळी जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांच्यासमवेत त्यांनी मलजल शुद्धीकरण प्रक्रिया केंद्र व रामवाडी येथील गोदावरी नदीची पाहणी केली. या पाहणी दौऱ्यात ते बोलत होते. या वेळी उपायुक्त रमेश काळे, अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर, स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर, राजेश पंडित यांच्यासह मनपाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. श्री. भुजबळ म्हणाले, स्वच्छ व निर्मळ गोदावरीमुळे जनसामान्यांचे भविष्य सुरक्षित होणार असल्याने गोदावरी नदीच्या संवर्धनासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे आवश्यक आहे. गोदावरी नदीच्या शुद्धीकरण व सौंदर्याला बाधा येणार नाही, अशा मर्यादेपर्यंत पर्यावरणपूरक पद्धतीचे बांधकाम करण्यास हरकत नाही. परंतु गोदावरी पात्रात कुठलेही बांधकाम करण्यात येऊ नये, अशा सूचनाही श्री. भुजबळ यांनी दिल्या, तसेच गोदावरीचा किनारा सुंदर करून चालणार नाही तर नदीचा प्रवाह शुद्ध असणे आवश्यक असल्याने त्यासाठी सर्वांनी निर्मळ गोदेसाठी सहकार्य करावे, असे आवाहन श्री. सिंह यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com