कृषी निविष्ठा पुरवठ्यासाठी दक्ष राहा : पालकमंत्री पाटील-निलंगेकर

कृषी निविष्ठा पुरवठ्यासाठी दक्ष राहा : पालकमंत्री पाटील-निलंगेकर
कृषी निविष्ठा पुरवठ्यासाठी दक्ष राहा : पालकमंत्री पाटील-निलंगेकर

लातूर : कमी प्रतीच्या कृषी निविष्ठा बाजारात विक्री होणार नाहीत, याविषयी यंत्रणेने दक्ष राहावे, असे निर्देश पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी दिले. 

जिल्हा खरीप हंगामपूर्व आढावा बैठक शुक्रवारी (ता. ३१) निलंगेकर यांच्या अध्यक्षतेखाली लातूर  येथे घेण्यात आली. या वेळी उन्नत शेती-समृद्ध शेतकरी अभियानांतर्गत शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी उपयुक्त ठरणाऱ्या सोयाबीन बियाणे घरगुती निर्मिती व वापर पद्धत, कीडनाशके हाताळताना घावयाची काळजी, एकात्मिक कीड व्यवस्थापन, अमेरिकन लष्करी अळी व्यवस्थापन व खरीप हंगामातील पिकासाठी कमी खर्चात किफायतशीर उत्पादन तंत्रज्ञान या विषयावरील घडीपत्रिकांचे विमोचन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

निलंगेकर म्हणाले, ‘‘खरीप हंगामात दर्जेदार खते व बियाण्यांचा मुबलक साठा आहे. शेतकऱ्यांना कमी प्रतीच्या कृषी निविष्ठा बाजारात विक्री होणार नाहीत, यासाठी यंत्रणेने दक्ष राहावे. जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी सामूहिकरीत्या कमी प्रतीचे बियाणे न विकण्याच्या घेतलेल्या निर्णयावर निलंगेकर यांनी समाधन व्यक्त केले. जिल्ह्यातील टंचाईच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ पोचविण्याचे आवाहन केले. 

जिल्हा अधिक्षक कृषी अधिकाऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पासह विविध योजनेच्या प्रगतीचा आढावा बैठकीत सादर केला. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, आमदार विनायकराव पाटील यांनी या वेळी चर्चेत भाग घेतला. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलिंद लातुरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन इटनकर, कृषी विद्यापिठाचे तज्ज्ञ, जिल्हा उपनिबंधक, कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते .

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com