agriculture news in marathi, BE Mechanical Students research on crop spray pump | Agrowon

शेतकऱ्यांचे श्रम, वेळ आणि पैशाची बचत करणारे फवारणी यंत्र !
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

औरंगाबाद : आपल्या कल्पकतेचा वापर करून देवगिरी महाविद्यालयाच्या बी.ई. मॅकेनिकलच्या विद्यार्थ्यांनी कीडनाशक फवारणी यंत्र बनविले आहे. सायकलरूपी असलेले हे यंत्र शेतकऱ्यांचे श्रम, वेळ आणि पैशाची बचत करण्यात परिणामकारक ठरेल असा विश्‍वास या विद्यार्थ्यांनी व्यक्‍त केला आहे. 

औरंगाबाद : आपल्या कल्पकतेचा वापर करून देवगिरी महाविद्यालयाच्या बी.ई. मॅकेनिकलच्या विद्यार्थ्यांनी कीडनाशक फवारणी यंत्र बनविले आहे. सायकलरूपी असलेले हे यंत्र शेतकऱ्यांचे श्रम, वेळ आणि पैशाची बचत करण्यात परिणामकारक ठरेल असा विश्‍वास या विद्यार्थ्यांनी व्यक्‍त केला आहे. 

मूळचे चित्तेपिंपळगाव येथील रहिवासी व शेतकरी कुटुंबातील योगेश राजेंद्र गावंडे व निखिल भास्कर गावंडे अशी यंत्र बनविणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षाला असतांना शेतकऱ्यांसाठी काहीतरी करावे या भावनेतून दोघांनीही चिंतन सुरू केले. या चिंतनातून त्यांना शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या खुरपणी व फवारणीच्या समस्या, त्यावर होणारा खर्च शेतकऱ्यांच्या आवाक्‍याबाहेरचा असल्याचे निदर्शनास आले. त्यामधून दोघांनीही फवारणी यंत्राचे कायम पाठीवर असणारे ओझे कमी करता येईल का, याचा विचार सुरू केला. त्यामधून सायकलचा सांगाडा, चाक व त्यावर फवारणी यंत्र अशी संकल्पना त्यांच्या मनाला भावली. त्यामधून साकारलेले त्यांचे हे यंत्र वापरताना 

पाठीवर घेऊन फवारणी करण्याची गरज नाही. 
एकावेळी चार सऱ्या (ओळी) फवारण्याची सोय आहे. सरीनुसार व पिकाच्या उंचीनुसार पाच फुटांपर्यंतच्या अंतरात फवारणी करता येण्याची सोय आहे. दुचाकीच्या तंत्रज्ञानाचा विचार करून हे यंत्र विकसित केले आहे. चाक फिरले की पंप सुरू होण्याची सोय या यंत्रात केली. शिवाय शरीरापासून विशिष्ट अंतर ठेवून असल्याने फवारणीवाटे द्रावण शरीरावर येण्याचा धोका नाही. पुढे लोटत नेऊन वा मागे ओढत फवारणी करण्याची सोय या यंत्रामध्ये केली आहे. 

पहा प्रत्यक्ष video... 

 

भाऊ निखिल गावंडे हा वर्षभर यंत्रावर काम केल्यानंतर नोकरी करण्याच्या मार्गी लागला. परंतु आपण उद्योजक व इतरांच्या सहकार्य व मार्गदर्शनात यंत्राची निर्मिती व विक्रीचे काम सुरूच ठेवले. काही ठिकाणी सादरीकरणात विद्यार्थी मित्रांची मदतही घेतली. यंत्राची विक्री केल्यानंतर त्याचा वापर करणाऱ्या व्यक्‍तींकडून यंत्राविषयीचा ‘फीडबॅक’ घेण्याचेही काम आम्ही करत असल्याचे योगेश गावंडे म्हणाले. केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर छत्तीसगड, मध्य प्रदेश, कर्नाटक आदी राज्यांसह दिल्लीला यंत्राचा पुरवठा आपण केल्याचे योगेश गावंडे म्हणाले. 

प्रदर्शनात आवर्जून पाहा हे फवारणी यंत्र
आजपासून औरंगाबाद येथे २७ ते ३० डिसेंबर या कालावधीत जबिंदा ग्राउंड येथे ‘ॲग्रोवन’चे भव्य कृषी प्रदर्शन सुरू होत आहे. या प्रदर्शनात हे यंत्र शेतकऱ्यांना पाहण्यासाठी उपलब्ध केले जाणार आहे. या यंत्राविषयी अधिक माहितीही या वेळी जाणून घेणे शेतकऱ्यांना या निमित्ताने शक्य होणार आहे.  
 : योगेश गावंडे 7350899801 

इतर अॅग्रो विशेष
शेतकरी कंपन्या स्थापन करण्यासाठी करारपुणे ः नाबार्डच्या कंपनी विकास फंडातून...
कर्नाटकात गुऱ्हाळघरातून थेट व्यापार...सांगली ः कर्नाटकमध्ये हमाली आणि अडत कमी असल्याने...
पीकविम्याचे ३२५ कोटी कंपन्यांना वितरितमुंबई ः गेल्यावर्षीच्या खरिपातील पीकविमा योजनेचा...
ग्रामविकासावर खर्च झालेल्या निधीची...मुंबई: आपल्या ग्रामपंचायतीला गावातील...
दुष्काळातही कडवंचीत शेतीतून ७२ कोटींचे...जालना : ‘महाराष्ट्राचे इस्राईल’ म्हणून नावलौकिक...
राज्यात सहामाहित तेराशे शेतकऱ्यांची...मुंबई ः सततची दुष्काळी स्थिती, नैसर्गिक संकटे,...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : मॉन्सून पुन्हा सक्रीय झाल्याने...
परीक्षा शुल्क परतीचा खर्च सात लाख रुपयेयवतमाळ ः परीक्षा रद्द झाल्यानंतर उमेदवारांचे पैसे...
दुबार पेरणीसाठी सरकारची तयारीः डाॅ....पुणे: पावसाचा काही प्रमाणात खंड पडला आहे....
डोणगावात होणार खजूर लागवडअकोला ः पारंपरिक पिकांना पर्याय शोधण्यासाठी...
रक्तक्षय दूर करण्यासाठी लोहयुक्त तांदूळनाशिक : दैनंदिन आहारातून अत्यल्प प्रमाणात लोह...
असंमत बियाणे लागवडीला बोंडअळी कारणीभूत...नवी दिल्ली : देशात २०१८ मध्ये गुलाबी...
दुष्काळामुळे द्यावा लागणार पाणी...पुणे ः सततच्या दुष्काळामुळे आता पाणी...
पीक पोषणात महत्त्वाची अन्नद्रव्ये पिकांच्या सुदृढ वाढीसाठी १८ अन्नद्रव्यांची...
मिल्क केक बनविण्याची प्रक्रियामिल्क केक हा दिसायला कलाकंदप्रमाणे असला तरी...
मराठवाड्यात ठिकठिकाणी हलक्या ते जोरदार...पुणे ः राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार...
सोयाबीनवरील कीडीची ओळख सोयाबीन हे राज्यातील महत्त्वाचे पीक असून, त्यावर...
नांदेड जिल्ह्यात अन्नधान्य पिकांच्या...नांदेड : जिल्ह्यात गुरुवारपर्यंत (ता. १८) ६ लाख...
एकाच गावातील ७५० एकरांत ७५०० कामगंध...जालना : गतवर्षी नियंत्रण मिळविलं म्हणून कपाशीवरील...
जलसंधारणाचा खामगाव पॅटर्न देशभरात जाणारअकोला ः राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना त्यासाठी...