पाटीलवाडीत समुद्रकिनारी आढळला मृत व्हेल मासा

रत्नागिरी ः तालुक्यातील जाकिमि‍ऱ्या गावातील पाटीलवाडी येथे शनिवारी (ता. २०) समुद्र किनाऱ्यावर व्हेल मासा मृतावस्थेत आढळून आला. सुमारे २५ फुटांहून अधिक लांबीचा महाकाय व्हेल पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली.
Beach at Patilwadi Dead whale found
Beach at Patilwadi Dead whale found

रत्नागिरी ः तालुक्यातील जाकिमि‍ऱ्या गावातील पाटीलवाडी येथे शनिवारी (ता. २०) समुद्र किनाऱ्यावर व्हेल मासा मृतावस्थेत आढळून आला. सुमारे २५ फुटांहून अधिक लांबीचा महाकाय व्हेल पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. कुजलेल्या अवस्थेत किनाऱ्यावर लागलेल्या व्हेलचा मृत्यू काही दिवसांपूर्वी झाला असावा, असा अंदाज वर्तविला जात आहे.

कोकण किनारपट्टीवर व्हेलचा वावर वाढल्याचा अंदाज गेले काही महिने अभ्यासकांकडून केला जात आहे. गेल्या पाच वर्षांत रत्नागिरी जिल्ह्यातील किनारी भागात मृतावस्थेतील व्हेल सापडल्याच्या नोंदी झालेल्या आहेत. त्यात जाकिमिऱ्या येथील सापडलेल्या व्हेलची भर पडली आहे. पौर्णिमेच्या उधाणाबरोबर हा महाकाय व्हेल मध्यरात्रीच्या सुमारास किनारी भागाला लागला. सुरुवातीला तो पाण्यात दिसून आला. लाटांबरोबर तो वाळूत आला. ही माहिती मिळाल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. 

या माशाची लांबी २५ फूट आहे. त्याचा मृत्यू समुद्रातच झाला होता. मृतावस्थेत तो वाहत मिऱ्या किनाऱ्यावर आला. काही दिवसांपूर्वी त्याचा मृत्यू झाला असल्यामुळे तो सडलेल्या अवस्थेत होता. त्याची वैद्यकीय तपासणीही करणे अशक्य होते. त्यामुळे माशाची नियमानुसार विल्हेवाट लावण्याचा निर्णय वनविभागाने घेतला. किनाऱ्यावर खड्डा खोदून त्याला पुरण्यात आले.

जाकिमिऱ्या पाटीलवाडी येथील समुद्र किनारी मृतावस्थेतील व्हेल दिसून आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यानंतर घटनास्थळाची पाहणी केली. तो मासा पूर्णतः सडलेल्या अवस्थेत आढळला. प्रचंड वास येत असल्यामुळे किनाऱ्यावरील वाळूतच त्याला पुरण्यात आले. - प्रियांका लगड, वनाधिकारी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com