Agriculture news in marathi; Bean harvest season begins in Kakada area | Page 2 ||| Agrowon

काकडा परिसरात सोयाबीन काढणीच्या हंगामाला सुरवात
टीम अॅग्रोवन
रविवार, 20 ऑक्टोबर 2019

काकडा, अमरावती ः परिसरात सोयाबीन काढणीच्या हंगामाला सुरवात झाली आहे. परंतु उत्पादकता, उत्पन्नाच्या तुलनेत काढणीवरच जास्त खर्च होत असल्याने शेतकऱ्यांसमोरील अडचणीत वाढ झाली आहे. 

काकडा, अमरावती ः परिसरात सोयाबीन काढणीच्या हंगामाला सुरवात झाली आहे. परंतु उत्पादकता, उत्पन्नाच्या तुलनेत काढणीवरच जास्त खर्च होत असल्याने शेतकऱ्यांसमोरील अडचणीत वाढ झाली आहे. 

कापसासोबतच परिसरात सोयाबीनची लागवड होते. लागवडीनंतर पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकरी चिंतेत होते. त्यानंतर मात्र पावसाने जोरदार कमबॅंक केले. दमदार पाऊस सोयाबीनला पोषक ठरल्याने सोयाबीनची चांगली वाढ झाली. त्यामुळेच या हंगामात सोयाबीन पीक चांगले पैसे देऊन जाईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांची होती. परंतु, एकूण उत्पादकता खर्च आणि उत्पादन यामुळे शेतकऱ्यांचा खर्च जुळता जुळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. शेतकऱ्यांनी सोयाबीनची काढणी केल्यानंतर मळणीअंती एकरी २ ते ५ पोती इतकीच उत्पादकता मिळत असल्याची स्थिती आहे. परिणामी, पिकावर केलेल्या खर्चाची भरपाईदेखील होत नसल्याचे चित्र आहे. 

खरिपात सोयाबीनच्या विविध वाणांची पेरणी शेतकऱ्यांनी केली. यातील काही वाण कमी जास्त फरकाने काढणीला लवकरच येणार आहे. मात्र, काढणीला येणाऱ्या लवकर वाणांची स्थिती अत्यंत बिकट असल्याचे शेतकरी सांगतात. सोयाबीन कापणीला एकरी २००० रुपये मजुरांना द्यावे लागत असून मळणीचा खर्च प्रती पोते २०० रुपये आहे. त्याप्रमाणे सोयाबीनला तीन हजाराच्या आत भाव असल्याने शेतकरी अस्वस्थ झाले आहेत.

इतर ताज्या घडामोडी
राज्यातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदाची...मुंबई ः राज्यातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदाची...
भारत 'या' देशाला देणार कापूस...नागपूर ः मुस्लिम बहूल असलेल्या अझरबैजान देशातील...
कांदा घेऊन जाणाऱ्या ट्रक ड्रायव्हरची...नाशिक : परराज्यांत होणाऱ्या कांद्याच्या...
हमीभाव खरेदी केंद्रावर आली वजनकाटे...अकोला ः शासनाने या हंगामात सुरु केलेल्या आधारभूत...
मराठवाड्यात रब्बी पेरणीला मिळेना गती लातूर : मराठवाड्यातील रब्बी पेरणीची गती...
परभणी जिल्ह्यात कापूस वेचणीसाठी...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या हंगामात सद्य:स्थितीत...
अरुणा प्रकल्पग्रस्तांनी मांडले...सिंधुदुर्ग : आयुक्त कार्यालयावर ‘दे धडक बेधडक’...
पाण्याच्या निचऱ्यासाठी गादीवाफ्यावर धान...भंडारा ः‘पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा...
अस्मानीमुळे नुकसान सोसवेना, चालविली...नाशिक : अगदी प्रतिकूल परिस्थितीत भांडवल जमा करून...
अचूक सांख्यिकीमुळे शेती उत्पन्न वाढविणे...नवी दिल्ली: बदलत्या हवामानाच्या आव्हानावर...
पुणे जिल्हा परिषदेत येणार ‘महिला राज’पुणे  : जिल्हा परिषदेच्या नवीन अध्यक्ष...
पुणे बाजार समितीत रताळ्यांची २० टन आवक...पुणे  ःकार्तिकी एकादशीनिमित्ताने पुणे बाजार...
कशामुळे घटले साताऱ्यातील स्ट्राॅबेरीचे...सातारा  ः जिल्ह्यात अतिपावसाचा फटका...
साताऱ्यात पुढील वर्षी सहकारी संस्थांची...सातारा  : आगामी वर्ष हे सहकारातील विविध...
नगर जिल्हा परिषदेतही वाहताहेत...नगर ः राज्यात एकीकडे भाजपला सत्तेपासून दूर...
थकीत पीकविम्यासाठी किसान सभेचा पुण्यात...पुणे  ः बीडमधील शेतकऱ्यांना थकीत पीकविम्याची...
किसान सभेचे सोमवारपासून राज्यभर आंदोलन...पुणे  ः अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाले. या...
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचे केंद्र...मुंबई  : भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यावर...
भारतीय मक्याचे पुढे काय होते ? जाणून...मका हे एक महत्त्वाचे तृणधान्य आहे. जगातील चार...
शाश्‍वत शेतीसाठी तण व्यवस्थापन आवश्यकतणांकडे आजवर आपण सर्वांनी एखाद्या शत्रूसारखे...