नांदेड, परभणी, हिंगोलीत पावसाने सोयाबीन, कपाशीचे नुकसान

नांदेड, परभणी, हिंगोलीत पावसाने सोयाबीन, कपाशीचे नुकसान
नांदेड, परभणी, हिंगोलीत पावसाने सोयाबीन, कपाशीचे नुकसान

नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील १२२ मंडळांमध्ये गुरुवारी (ता. २६) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत हलका ते मध्यम पाऊस झाला. गेल्या २५ दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे विहिरी, तलाव, धरणातील पाणीपातळीत वाढ झाली. परंतु सततच्या पावसात भिजल्यामुळे काढणीस आलेल्या सोयाबीन, शेतामध्ये पाणी साचल्याने कपाशीच्या पिकाचे नुकसान झाले. पाऊस सुरू राहिल्यास नुकसानीची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यतील अनेक मंडळांमध्ये या महिन्यात सतत पाऊस सुरू आहे. त्यामुळे ओढे, नाले, नद्याकाठच्या तसेच सखल भागातील जमिनीतील निचरा झाला नाही. पिकांमध्ये पाणी साचून राहिले. सोयाबीनच्या पिकाचे नुकसान होत आहे. लवकर लागवड करण्यात आलेल्या कपाशीची बोंडे सडली आहेत. झाडे उमळून जात आहेत.

नांदेड जिल्ह्यातील ७९ मंडळांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. मुदखेड, भोकर, उमरी, नायगाव, बिलोली, देगलूर, मुखेड, कंधार तालुक्यातील अनेक मंडळांमध्ये चांगला पाऊस झाला. ओढे, नाले, नद्यांच्या, विहिरींच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. परभणी जिल्ह्यातील आठ तालुक्यतील २४ मंडळांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. पालम, पूर्णा, मानवत, पाथरी तालुक्यात पाणी साचून राहिल्याने ओढे, नद्याकाठच्या पिकांचे नुकसान झाले.

या महिन्यात झालेल्या पावसामुळे अनेक मंडळातील विहिरी, तलाव, धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली. हिंगोली जिल्ह्यातील चार तालुक्यातील १९ मंडळामध्ये हलका ते मध्य्म पाऊस झाला. सेनगाव तालुक्यात चांगला पाऊस झाला.

मंडळनिहाय पाऊस (१० मिमीच्या पुढे)  

नांदेड जिल्हा तुप्पा १०, वसरणी १७, तरोडा ११, मुदखेड २६, मुगट १३, बारड २३, हदगाव ११, तामसा १२, किनवट १२, बोधडी १३, दहेली ११, जलधारा १४, भोकर ३३, किनी १४, मोगाली २०, मातुल १०, धर्माबाद ११, जारिकोट ३८, करखेली ३२, सिंदी ३१, गोळेगाव २०, नायगाव १९, नरसी २१, मांजरम ३०, बरबडा २२, कुंटूर १४, बिलोली ४९, लोहगाव १२, सगरोळी १०, कुंडलवाडी २४, देगलूर १४, खानापूर १६, शहापूर २२, मालेगाव २५, मुखेड १४, जांब २०, येवती ६२, जाहूर ३०, चांदोला २०, मुक्रमाबाद ३४, बाऱ्हाळी १९, कंधार १०, कुरुला १६, उस्माननगर १०, पेठवडज ३६, फुलवळ १५, लोहा १५, माळाकोळी १२. 
परभणी जिल्हा बामणी १८, गंगाखेड १५, महातपुरी १०, चाटोरी २९, पूर्णा २२, चुडावा १०.
हिंगोली जिल्हा सिरसम ३४, कळमनुरी १२, सेनगाव ३०, गोरेगाव १८, अजेगाव १५, साखरा ४२, पानकनेरगाव २९, हत्ता २७.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com