धरणे अद्याप तहानलेलीच

राज्यात ७ सप्टेंबरअखेरपर्यंत राज्यातील धरणांत गेल्या वर्षीच्या तुलनेत १५ टक्के तूट झाली आहे. चालू महिन्यात पुरेसा पाऊस न झाल्यास आगामी काळात पाणी टंचाईचे संकट गडद होण्याचे संकेत देण्यात आले आहेत.
The bear is still thirsty
The bear is still thirsty

पुणे : जून, जुलै महिन्यात पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली. मात्र, ऑगस्टमध्ये दिलेल्या ओढीने धरणांतील पाणीपातळीत फारशी वाढ झाली नाही. राज्यात ७ सप्टेंबरअखेरपर्यंत राज्यातील धरणांत गेल्या वर्षीच्या तुलनेत १५ टक्के तूट झाली आहे. चालू महिन्यात पुरेसा पाऊस न झाल्यास आगामी काळात पाणी टंचाईचे संकट गडद होण्याचे संकेत देण्यात आले आहेत.

राज्यातील बहुतांश भागात पावसाने धुमाकूळ घातला आहे. कोकण, घाटमाथा, मराठवाडा विदर्भात अनेक ठिकाणी अतिवृष्टीसदृश्य पाऊस पडत आहे. गेल्या तीन महिन्यांत पाण्याची नव्याने बऱ्यापैकी आवक झाली आहे. सध्या एकूण तीन हजार २६७ प्रकल्पांमध्ये सुमारे ९२२ टीएमसी (२६१२२.५५ दशलक्ष घनमीटर) एवढा म्हणजेच सरासरी ६४ टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्यावर्षी याच काळात तब्बल ७९ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. त्यातुलनेत यंदा मोठी घट झाल्याने धरणात अजूनही पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. जून महिन्यात पाण्याची मागणी वाढल्याने धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला होता. मात्र, ५ ते २० जून या कालावधीत चांगला पाऊस बरसला. त्यानंतर ७ ते २२ जुलैपर्यत पावसाने धुमाकूळ घातला होता. ऑगस्टमध्ये ओढ देत कमी पाऊस झाला. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील धरणातील पाणी पातळीत फारशी वाढ झालेली नाही. काही धरणे भरली असली अनेक धरणांत अजूनही ७० टक्क्याच्या आतच पाणीसाठा आहे.

मोठ्या प्रकल्पात ७६ टक्के साठा  कोयना, जायकवाडी, वारणा, उजनी, मुळा, पवना अशी जवळपास १४१ मोठी धरणे आहेत. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरुवातीला कमी पाऊस झाला होता. सध्या मोठ्या प्रकल्पात ७८६ टीएमसी म्हणजेच सरासरी ७६ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी या प्रकल्पात तब्बल ९० टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. त्यातुलनेत चालू वर्षी १४ टक्क्यांनी घट झाली आहे. यंदा अमरावती विभागातील धरणांत ७१.९४ टीएमसी म्हणजेच ८६ टक्के, औरंगाबाद विभागातील धरणांत ९९.९५ टीएमसी म्हणजेच ६२ टक्के, पुणे विभागातील धरणांत ३६७ टीएमसी म्हणजेच ८३ टक्के, कोकणातील धरणांत ८१.६३ टीएमसी म्हणजेच ९४ टक्के,  नागपूर विभागातील धरणांत ७४.०८ टीएमसी म्हणजेच ६० टक्के, नाशिक विभागातील धरणांत ९१.२१ टीएमसी म्हणजेच ६९ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.   कोकणातील धरणांत मुबलक पाणीसाठा यंदा कोकणात सुरुवातीपासून चांगला पाऊस पडला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. चालू महिन्यातही कोकणातील बहुतांश भागात अतिवृष्टीसदृश्य पाऊस झाला. त्यामुळे नद्या, ओढे भरून वाहत होते. धरणात नवीन पाण्याची आवक होऊन चांगलाच पाणीसाठा झाला आहे. रायगड, रत्नागिरी, घाटमाथ्यावरही पावसाच्या चांगल्याच सरी कोसळल्या होत्या. कोकणातील लहान मोठ्या असलेल्या एकूण १७६ प्रकल्पांत १०४.४१ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. सरासरी ८४ टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी या काळात कोकणातील धरणांत ८१.९३ टक्के पाणीसाठा झाला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तीन टक्क्यांनी जास्त पाणीसाठा झाला आहे.

मोठ्या प्रकल्पात अवघा ७६ टक्के पाणीसाठा  राज्यात कोयना, जायकवाडी, वारणा, उजनी, मुळा, पवना अशी जवळपास १४१ मोठी धरणे आहेत. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरुवातीला कमी पाऊस झाला होता. त्यामुळे धरणात फारशी नवीन पाण्याची आवक झालेली नसल्याने पाणीपातळीत वाढ झालेली नव्हती. परंतु गेल्या काही दिवस चांगला पाऊस झाल्याने सध्या मोठ्या प्रकल्पात ७८६ टीएमसी म्हणजेच सरासरी ७६ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी या प्रकल्पात तब्बल ९० टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. त्यातुलनेत चालू वर्षी १४ टक्क्यांनी घट झाली आहे. यंदा अमरावती विभागातील धरणांत ७१.९४ टीएमसी म्हणजेच ८६ टक्के, औरंगाबाद विभागातील धरणांत ९९.९५ टीएमसी म्हणजेच ६२ टक्के, पुणे विभागातील धरणांत ३६७ टीएमसी म्हणजेच ८३ टक्के, कोकणातील धरणांत ८१.६३ टीएमसी म्हणजेच ९४ टक्के,  नागपूर विभागातील धरणांत ७४.०८ टीएमसी म्हणजेच ६० टक्के, नाशिक विभागातील धरणांत ९१.२१ टीएमसी म्हणजेच ६९ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com