Agriculture news in Marathi The bear is still thirsty | Page 2 ||| Agrowon

धरणे अद्याप तहानलेलीच

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 14 सप्टेंबर 2021

राज्यात ७ सप्टेंबरअखेरपर्यंत राज्यातील धरणांत गेल्या वर्षीच्या तुलनेत १५ टक्के तूट झाली आहे. चालू महिन्यात पुरेसा पाऊस न झाल्यास आगामी काळात पाणी टंचाईचे संकट गडद होण्याचे संकेत देण्यात आले आहेत.

पुणे : जून, जुलै महिन्यात पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली. मात्र, ऑगस्टमध्ये दिलेल्या ओढीने धरणांतील पाणीपातळीत फारशी वाढ झाली नाही. राज्यात ७ सप्टेंबरअखेरपर्यंत राज्यातील धरणांत गेल्या वर्षीच्या तुलनेत १५ टक्के तूट झाली आहे. चालू महिन्यात पुरेसा पाऊस न झाल्यास आगामी काळात पाणी टंचाईचे संकट गडद होण्याचे संकेत देण्यात आले आहेत.

राज्यातील बहुतांश भागात पावसाने धुमाकूळ घातला आहे. कोकण, घाटमाथा, मराठवाडा विदर्भात अनेक ठिकाणी अतिवृष्टीसदृश्य पाऊस पडत आहे. गेल्या तीन महिन्यांत पाण्याची नव्याने बऱ्यापैकी आवक झाली आहे. सध्या एकूण तीन हजार २६७ प्रकल्पांमध्ये सुमारे ९२२ टीएमसी (२६१२२.५५ दशलक्ष घनमीटर) एवढा म्हणजेच सरासरी ६४ टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्यावर्षी याच काळात तब्बल ७९ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. त्यातुलनेत यंदा मोठी घट झाल्याने धरणात अजूनही पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. जून महिन्यात पाण्याची मागणी वाढल्याने धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला होता. मात्र, ५ ते २० जून या कालावधीत चांगला पाऊस बरसला. त्यानंतर ७ ते २२ जुलैपर्यत पावसाने धुमाकूळ घातला होता. ऑगस्टमध्ये ओढ देत कमी पाऊस झाला. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील धरणातील पाणी पातळीत फारशी वाढ झालेली नाही. काही धरणे भरली असली अनेक धरणांत अजूनही ७० टक्क्याच्या आतच पाणीसाठा आहे.

मोठ्या प्रकल्पात ७६ टक्के साठा 
कोयना, जायकवाडी, वारणा, उजनी, मुळा, पवना अशी जवळपास १४१ मोठी धरणे आहेत. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरुवातीला कमी पाऊस झाला होता. सध्या मोठ्या प्रकल्पात ७८६ टीएमसी म्हणजेच सरासरी ७६ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी या प्रकल्पात तब्बल ९० टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. त्यातुलनेत चालू वर्षी १४ टक्क्यांनी घट झाली आहे. यंदा अमरावती विभागातील धरणांत ७१.९४ टीएमसी म्हणजेच ८६ टक्के, औरंगाबाद विभागातील धरणांत ९९.९५ टीएमसी म्हणजेच ६२ टक्के, पुणे विभागातील धरणांत ३६७ टीएमसी म्हणजेच ८३ टक्के, कोकणातील धरणांत ८१.६३ टीएमसी म्हणजेच ९४ टक्के,  नागपूर विभागातील धरणांत ७४.०८ टीएमसी म्हणजेच ६० टक्के, नाशिक विभागातील धरणांत ९१.२१ टीएमसी म्हणजेच ६९ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
 
कोकणातील धरणांत मुबलक पाणीसाठा
यंदा कोकणात सुरुवातीपासून चांगला पाऊस पडला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. चालू महिन्यातही कोकणातील बहुतांश भागात अतिवृष्टीसदृश्य पाऊस झाला. त्यामुळे नद्या, ओढे भरून वाहत होते. धरणात नवीन पाण्याची आवक होऊन चांगलाच पाणीसाठा झाला आहे. रायगड, रत्नागिरी, घाटमाथ्यावरही पावसाच्या चांगल्याच सरी कोसळल्या होत्या. कोकणातील लहान मोठ्या असलेल्या एकूण १७६ प्रकल्पांत १०४.४१ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. सरासरी ८४ टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी या काळात कोकणातील धरणांत ८१.९३ टक्के पाणीसाठा झाला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तीन टक्क्यांनी जास्त पाणीसाठा झाला आहे.

मोठ्या प्रकल्पात अवघा ७६ टक्के पाणीसाठा 
राज्यात कोयना, जायकवाडी, वारणा, उजनी, मुळा, पवना अशी जवळपास १४१ मोठी धरणे आहेत. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरुवातीला कमी पाऊस झाला होता. त्यामुळे धरणात फारशी नवीन पाण्याची आवक झालेली नसल्याने पाणीपातळीत वाढ झालेली नव्हती. परंतु गेल्या काही दिवस चांगला पाऊस झाल्याने सध्या मोठ्या प्रकल्पात ७८६ टीएमसी म्हणजेच सरासरी ७६ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी या प्रकल्पात तब्बल ९० टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. त्यातुलनेत चालू वर्षी १४ टक्क्यांनी घट झाली आहे. यंदा अमरावती विभागातील धरणांत ७१.९४ टीएमसी म्हणजेच ८६ टक्के, औरंगाबाद विभागातील धरणांत ९९.९५ टीएमसी म्हणजेच ६२ टक्के, पुणे विभागातील धरणांत ३६७ टीएमसी म्हणजेच ८३ टक्के, कोकणातील धरणांत ८१.६३ टीएमसी म्हणजेच ९४ टक्के,  नागपूर विभागातील धरणांत ७४.०८ टीएमसी म्हणजेच ६० टक्के, नाशिक विभागातील धरणांत ९१.२१ टीएमसी म्हणजेच ६९ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.


इतर अॅग्रो विशेष
दहा वर्षांवरील हरभरा वाणांना अनुदान नाहीपुणे ः राज्यात रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना हरभरा...
प्रक्रिया उद्योगातून शेती झाली किफायतशीरमानकरवाडी (ता. जावळी, जि. सातारा) येथील संगीता...
यंदा कापूस तेजीतच राहणारपुणे : महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशात...
पावसाने वाढली सोयाबीनची आवक नागपूर ः मध्य प्रदेशात पावसाच्या शक्‍यतेमुळे...
ड्रायपोर्टमुळे संत्रा निर्यातीला चालनानागपूर : वर्धा जिल्ह्यातील सिंधी रेल्वे येथे...
शेतीमाल साठवणूक, तारण कर्ज, ब्लॉकचेनची... पुणे : राज्य वखार महामंडळाच्या शेतीमाल...
मतदार नोंदणीसाठी राज्यभरात...नागपूर : राज्यात सर्व ग्रामपंचायतींमध्ये १६...
अकोल्यातील सिंचन प्रकल्पांच्या...अकोला ः जिल्ह्यातील सर्व सिंचन प्रकल्पांची देखभाल...
अन्नधान्य भाववाढीच्या चर्चा निराधारपुणे : सध्या अन्नधान्य महागाईच्या चर्चांना ऊत आला...
राज्यात थंडीची चाहूलपुणे : नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून)...
इंधन दरवाढ, महागाई दिसत नाही, कांद्याची...नाशिक : एकीकडे इंधन खर्च, निविष्ठांचे वाढते दर,...
पावसामुळे द्राक्ष हंगामात अडचणी वाढल्यानाशिक : सप्टेंबर महिन्यापासून द्राक्ष उत्पादक...
सरासरी ते सरासरीपेक्षा कमी तापमानाचा...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) १४...
महाराष्ट्राच्या समृद्ध पीकसंपदेचा...संगमनेर, जि. नगर ः ‘‘महाराष्‍ट्रात पिकांची मोठी...
सांगली जिल्ह्यात ५० टक्के द्राक्ष...सांगली : जिल्ह्यात द्राक्ष पिकाच्या फळछाटणीची गती...
लखीमपूर खेरी घटनेतील  शेतकऱ्यांच्या...वर्धा : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे भाजप...
राज्यभरात निघणार लखीमपूर खेरी  किसान...  नाशिक : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी...
गोड्या पाण्यात निर्यातक्षम व्हेमानी...गोड्या पाण्यात कोळंबी व त्यातही ‘व्हेनामी’ जातीचे...
‘ऑयस्टर’ मशरूमला मिळवली बाजारपेठसांगली जिल्ह्यातील बावची येथील प्रदीप व राजेंद्र...
कृषी विकासाचे भगीरथ ठरलेल्या...पुणे : कष्टकरी शेतकऱ्यांच्या मनगटाला बारा...