औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत हरभऱ्याकडून ज्वारीला धोबीपछाड

औरंगाबाद जिल्ह्यातील काही भागांतील ज्वारीवर चिकटा व माव्याचा प्रादुर्भाव दिसून आला. कणसं लागलेल्या पिकात उपाय शक्‍य नाही, परंतु न लागलेल्या पिकासाठी शेतकऱ्यांनी उपाय योजावेत. हरभऱ्याच्या पिकावरही काही प्रमाणात उंटअळीचा प्रादुर्भाव दिसत आहे. - डॉ. किशोर झाडे, कार्यक्रम समन्वयक, केव्हीके औरंगाबाद.
beat the sorghum by green gram in Aurangabad, Jalna, Beed Districts
beat the sorghum by green gram in Aurangabad, Jalna, Beed Districts

औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत रब्बी ज्वारीची कमी क्षेत्रावर, तर हरभऱ्याची जास्त क्षेत्रावर पेरणी झाली आहे. काही ठिकाणी ज्वारीवर मावा, चिकटा, तर हरभऱ्यावर घाटेअळी, उंटअळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. 

औरंगाबाद, जालना व बीड तीनही जिल्ह्यात ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र ४ लाख ८८ हजार १४० हेक्‍टर आहे. प्रत्यक्षात केवळ ७० टक्‍के क्षेत्रावर अर्थात ३ लाख ४२ हजार ७६३ हेक्‍टरवर ज्वारीची पेरणी झाली आहे. या क्षेत्रापैकी औरंगाबाद जिल्ह्यात ज्वारीची ६० हजार ४०८ हेक्‍टरवर पेरणी झाली. जी सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत केवळ ५४ टक्‍के आहे. दुसरीकडे बीड जिल्ह्यातही सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ६५ टक्‍के १ लाख ८६ हजार ५५१ हेक्‍टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली. 

जालना जिल्ह्यात मात्र ज्वारीची सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत १०५ टक्‍के ९५ हजार ८०४ हेक्‍टर इतक्‍या क्षेत्रावर पेरणी झाली आहे. ज्वारीच्या पिकांमध्ये काही ठिकाणी मावा, चिकट्याचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. या तीनही जिल्ह्यात हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ५९ हजार ७१० हेक्‍टर होते. प्रत्यक्षात या क्षेत्राच्या तुलनेत १८४ टक्‍के क्षेत्रावर अर्थात २ लाख ९३ हजार ८८६ हेक्‍टरवर हरभऱ्याची पेरणी झाली आहे. त्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत औरंगाबाद जिल्ह्यात १२९ टक्‍के, जालना जिल्ह्यात २०४ टक्‍के, तर बीड जिल्ह्यात २०७ टक्‍के क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी झाली.

कमी थंडीचा विपरीत परिणाम 

औरंगाबाद जिल्ह्यात ५९ हजार ३४० हेक्‍टर, जालना ८६ हजार ९५७ हेक्‍टर, तर बीड जिल्ह्यात १ लाख ४७ हजार ५८९ हेक्‍टर क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी झाली आहे. हरभऱ्याच्या पिकावर कुठे उंट अळी, कुठे घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. शिवाय थंडी अपेक्षेनुरूप नसणेही या पिकासाठी फारसे फायद्याचे नसल्याचे चित्र आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com