बीड जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा पेच 

बीड जिल्हा बँकेच्या १९ संचालक मंडळाच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत मंगळवारी (ता. २३) उमेदवारी अर्जांच्या छाननीत सेवा सोसायटीच्या सर्व ११ मतदार संघांतून दाखल झालेले सर्वच ८७ उमेदवारी अर्ज बाद ठरले.
बीड जिल्हा बँकेच्या  निवडणुकीचा पेच Of Beed District Bank Election screw
बीड जिल्हा बँकेच्या  निवडणुकीचा पेच Of Beed District Bank Election screw

बीड : जिल्हा बँकेच्या १९ संचालक मंडळाच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. मंगळवारी (ता. २३) उमेदवारी अर्जांच्या छाननीत सेवा सोसायटीच्या सर्व ११ मतदार संघांतून दाखल झालेले सर्वच ८७ उमेदवारी अर्ज बाद ठरले. 

उमेदवारांच्या नावाच्या ठराव देणाऱ्या संबंधित सेवा सोसायटीला लेखा परिक्षणात सलग तीन वर्षे ‘अ’ किंवा ‘ब’ दर्जा असावा. उमेदवाराला या सेवा सोसायटीचा प्रशासकीय अनुभव असावा, अशी बॅंकेच्या अधिनियमात तरतूद आहे. या मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या एकाही उमेदवाराच्या सेवा सोसायटीला ‘अ’ किंवा ‘ब’ दर्जा नाही. त्यामुळे मंगळवारी छाननीत निवडणूक निर्णय अधिकारी विजय देशमुख यांनी सर्वच उमेदवारी अर्ज बाद केले. 

दरम्यान, या मतदार संघातून भाजपचे ज्येष्ठ नेते रमेशराव आडसकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, ऋषिकेश आडसकर, आमदार सुरेश धस यांचे चिरंजीव जयदत्त धस, दाजीसाहेब लोमटे, अभय मुंडे, दत्तात्रेय पाटील, फुलचंद मुंडे, महेंद्र गर्जे, अशोक लोढा, वसंत सानप, चंद्रकला वनवे, सतीश शिंदे, सत्यभामा बांगर, मधुकर काचगुंडे अशा मातब्बरांचे उमेदवारी अर्ज होते. 

‘‘सर्वच सोसायट्या ‘क’ दर्जाच्या असल्याने अर्ज बाद झाले आहेत. त्यामुळे निवडणुकीत नवाच पेच निर्माण झाला आहे. दरम्यान, सोमवारी (ता. २२) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशीपर्यंत २१४ अर्ज दाखल झाले होते. १० मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज माघे घेण्याची मुदत आहे. १२ मार्चला चिन्हांचे वाटप, २० मार्चला मतदान आणि २१ मार्चला मतमोजणीनंतर निकाल जाहीर होईल’’, अशी माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी गोपाळकृष्ण परदेशी यांनी दिली.  याचिका अद्याप निर्णयाविना  जिल्ह्यातील ७३५ पैकी केवळ १३ सेवा सोसायट्यांना लेखा परिक्षणात ‘अ’ किंवा ‘ब’ दर्जा आहे. मात्र, नेमक्या याच संस्थांमधून कोणाचेही अर्ज नसल्याने ते बाद ठरले. मात्र, बँकेचा या अधिनियमास स्थगिती देण्याबाबत सहकार मंत्र्यांकडे सादर केलेल्या याचिकेवर अद्याप निर्णय झालेला नाही. आता हा पेच कसा सुटणार? याकडे सहकार तज्ज्ञांचे लक्ष लागले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com