Agriculture news in marathi Of Beed District Bank Election screw | Agrowon

बीड जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा पेच 

दत्ता देशमुख
बुधवार, 24 फेब्रुवारी 2021

बीड जिल्हा बँकेच्या १९ संचालक मंडळाच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत मंगळवारी (ता. २३) उमेदवारी अर्जांच्या छाननीत सेवा सोसायटीच्या सर्व ११ मतदार संघांतून दाखल झालेले सर्वच ८७ उमेदवारी अर्ज बाद ठरले. 

बीड : जिल्हा बँकेच्या १९ संचालक मंडळाच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. मंगळवारी (ता. २३) उमेदवारी अर्जांच्या छाननीत सेवा सोसायटीच्या सर्व ११ मतदार संघांतून दाखल झालेले सर्वच ८७ उमेदवारी अर्ज बाद ठरले. 

उमेदवारांच्या नावाच्या ठराव देणाऱ्या संबंधित सेवा सोसायटीला लेखा परिक्षणात सलग तीन वर्षे ‘अ’ किंवा ‘ब’ दर्जा असावा. उमेदवाराला या सेवा सोसायटीचा प्रशासकीय अनुभव असावा, अशी बॅंकेच्या अधिनियमात तरतूद आहे. या मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या एकाही उमेदवाराच्या सेवा सोसायटीला ‘अ’ किंवा ‘ब’ दर्जा नाही. त्यामुळे मंगळवारी छाननीत निवडणूक निर्णय अधिकारी विजय देशमुख यांनी सर्वच उमेदवारी अर्ज बाद केले. 

दरम्यान, या मतदार संघातून भाजपचे ज्येष्ठ नेते रमेशराव आडसकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, ऋषिकेश आडसकर, आमदार सुरेश धस यांचे चिरंजीव जयदत्त धस, दाजीसाहेब लोमटे, अभय मुंडे, दत्तात्रेय पाटील, फुलचंद मुंडे, महेंद्र गर्जे, अशोक लोढा, वसंत सानप, चंद्रकला वनवे, सतीश शिंदे, सत्यभामा बांगर, मधुकर काचगुंडे अशा मातब्बरांचे उमेदवारी अर्ज होते. 

‘‘सर्वच सोसायट्या ‘क’ दर्जाच्या असल्याने अर्ज बाद झाले आहेत. त्यामुळे निवडणुकीत नवाच पेच निर्माण झाला आहे. दरम्यान, सोमवारी (ता. २२) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशीपर्यंत २१४ अर्ज दाखल झाले होते. १० मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज माघे घेण्याची मुदत आहे. १२ मार्चला चिन्हांचे वाटप, २० मार्चला मतदान आणि २१ मार्चला मतमोजणीनंतर निकाल जाहीर होईल’’, अशी माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी गोपाळकृष्ण परदेशी यांनी दिली. 

याचिका अद्याप निर्णयाविना 
जिल्ह्यातील ७३५ पैकी केवळ १३ सेवा सोसायट्यांना लेखा परिक्षणात ‘अ’ किंवा ‘ब’ दर्जा आहे. मात्र, नेमक्या याच संस्थांमधून कोणाचेही अर्ज नसल्याने ते बाद ठरले. मात्र, बँकेचा या अधिनियमास स्थगिती देण्याबाबत सहकार मंत्र्यांकडे सादर केलेल्या याचिकेवर अद्याप निर्णय झालेला नाही. आता हा पेच कसा सुटणार? याकडे सहकार तज्ज्ञांचे लक्ष लागले आहे. 

 


इतर बातम्या
ठाकरे स्मार्ट योजनेतून शेतकऱ्यांचा...नाशिक : तळागाळातील प्रत्येक शेतकऱ्याचा सर्वांगिण...
माळढोक पक्षी अभयारण्यात आग, २५...सोलापूर : नान्नज (ता. उत्तर सोलापूर) येथील माळढोक...
कर्जमुक्तीच्या विस्ताराला बगल : शेतकरी...मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पात योजनांकरिताच्या...
अकोल्यात ४९७ गावांमध्ये पाणीटंचाईची...अकोला ः जिल्ह्यात ४९७ गावांमध्ये भविष्यात पाणी...
खंडित केलेल्या कृषिपंपाच्या जोडणीचे काय?नांदेड : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात...
कृषी संशोधनासाठीच्या तरतुदीचे स्वागतमुंबई ः राज्य अर्थसंकल्पात कृषी विद्यापीठांना तीन...
संत्रा प्रक्रिया प्रकल्पाच्या घोषणेमुळे...नागपूर ः मोर्शी तालुक्‍यात नव्या संत्रा प्रक्रिया...
आरोग्य व्यवस्था मजबूत करण्याला...मुंबई : अर्थसंकल्प मांडणे आम्हाला नवे नाही. मात्र...
विदर्भात उद्यापासून पाऊस शक्य पुणे : विदर्भाच्या काही भागांत वातावरणात बदल...
अर्थसंकल्पातून आरोग्य क्षेत्राला...पुणे ः आरोग्य संस्थांचे बांधकाम व श्रेणी...
अंमलबजावणीत दिसावा अर्थसंकल्पमुंबई : अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या...
मराठा आरक्षणसंदर्भात राज्यांना नोटिसा नवी दिल्ली ः मराठा समाजाला शिक्षण व नोकऱ्यांमध्ये...
शेती क्षेत्राच्या सुदृढतेवर भरपुणे : कोरोनाच्या संकटकाळात राज्याच्या...
बुलडाण्यात बीजोत्पादनाचा भार महिलांच्या...बुलडाणा ः पूर्वापार होत असलेल्या शेतीत महिलांचे...
‘मागेल त्याला शेततळे’च्या ८४ कोटी...नगर ः कृषी विभागाच्या मागेल त्याला शेततळे...
कृषिपंप रिवाइंडिंग करणाऱ्या महिला...हिंगोली ः जिल्ह्यातील आखाडा बाळापूर (ता.कळमनुरी)...
बीज परीक्षण करतात ‘मिळून साऱ्याजणी’ परभणी ः परभणी येथील कृषी विभागाच्या ‘आयएसओ’...
अडीच कोटी उलाढाल करणाऱ्या शेतकरी...जळगाव ः वर्षाला सुमारे अडीच कोटी रुपये एकूण...
मनीषाताईंनी विकसित केले तीन गुंठ्यांत...सोलापूर ः पोषण मूल्यावर आधारित अवघ्या तीन...
शेतकरी, ग्रामीण भागाचे राज्याच्या...पुणे : राज्याचा अर्थसंकल्प आज (ता. ८) अर्थ व...