बीड, जालना औरंगाबाद जिल्ह्यांत २३ टक्के पेरणी उरकली

औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत जवळपास २३ टक्के पेरणी उरकली.
Beed, Jalna In Aurangabad district, 23 percent sowing was completed
Beed, Jalna In Aurangabad district, 23 percent sowing was completed

औरंगाबाद  : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत जवळपास २३ टक्के पेरणी उरकली. बीड जिल्ह्यात सर्वांत कमी १३ टक्के, तर जालना जिल्ह्यात सर्वांत जास्त ३० टक्के पेरणी उरकली. औरंगाबाद जिल्ह्यात जवळपास २२ टक्के पेरणी आटोपली आहे.

बीड जिल्ह्यात खरिपाचे सर्वसाधारण ७ लाख ४६ हजार ४८ हेक्टर क्षेत्र आहे. त्या तुलनेत जवळपास १ लाख २ हजार ५०९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी उरकली आहे. कपाशीचे सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख ५७ हजार ५३३ हेक्टर असून त्यापैकी ७५ हजार ३४९ हेक्‍टरवर कपाशीची लागवड झाली आहे. बीड तालुक्यात ७ टक्के, पाटोदा ३, आष्टी ९ टक्के, शिरूर १४ टक्के , माजलगाव १० टक्के ,धारूर १७ टक्के, वडवणी ते २० टक्के, केज ७ टक्के ,परळी १५ टक्के, अंबाजोगाई १ टक्का, तर गेवराई तालुक्यात सर्वाधिक ४३ टक्के खरिपाची पेरणी उरकली.

आतापर्यंत पेरणी उरलेल्या क्षेत्रापैकी २ हेक्‍टरवर भात, २३७ हेक्टर खरीप ज्वारी, ३३२८ हेक्टर बाजरी, मका ५९८ हेक्टर, तुर ४२२८ हेक्टर, मूग ३१८५ हेक्टर, उडीद  ३२२३ हेक्टर, भुईमूग ८८ हेक्टर, तीळ ५४ हेक्टर,  सोयाबीन १२२१५ हेक्टर, तर २ हेक्टर कारळाचा समावेश आहे. 

जालना जिल्ह्यात खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र ६ लाख १६६१ हेक्टर आहे. त्या तुलनेत १ लाख ८० हजार २७९ हेक्‍टरवर पेरणी उरकली आहे. कपाशीची २ लाख ९० हजार १५१ हेक्टर पैकी १ लाख ३० हजार ५६७ हेक्‍टरवर लागवड झाली आहे. सोयाबीनच्या १ लाख २३ हजार ३४० हेक्टरपैकी २४ हजार ६६९ हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. तुरीची १० हजार ५६२ व मुगाची १३९४१ हेक्टरवर, उडदाची ३५४० हेक्‍टरवर, तर मक्याची २७८२ हेक्‍टरवर पेरणी झाली आहे.

औरंगाबादमध्ये पेरणीला वेग

औरंगाबाद जिल्ह्यात खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र ६ लाख ७५ हजार १७१ हेक्टर आहे. त्यापैकी २०.५३ टक्के क्षेत्रावर अर्थात १ लाख ३८ हजार ६१२ हेक्टरवर पेरणी झाली. खरिपात ८६ हजार १६० हेक्‍टरवरील कपाशी लागवडीचा समावेश आहे. औरंगाबाद तालुक्यात ७०८७ हेक्‍टरवर, पैठण २०४५, फुलंब्री २३ हजार ६४४, वैजापूर २७ हजार ९६९, गंगापूर ३१ हजार ६०६, खुलताबाद १० हजार १०० सिल्लोड २५१४६, कन्नड २४००, तर सोयगाव तालुक्यात ८ हजार ६१३ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com