Agriculture news in marathi, In Beed, Osmanabad, fodder camps occupy over 39,000 animals | Agrowon

बीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर जनावरे
टीम अॅग्रोवन
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

उस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत अजूनही जनावरांच्या चारा व पाण्याचे संकट सुटलेले नाही. या दोन्ही जिल्ह्यांत अजूनही ६१ चारा छावण्यांमध्ये ३९ हजार ४२० जनावरे चारा व पाण्यासाठी आश्रयाला असल्याची स्थिती आहे.  

उस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत अजूनही जनावरांच्या चारा व पाण्याचे संकट सुटलेले नाही. या दोन्ही जिल्ह्यांत अजूनही ६१ चारा छावण्यांमध्ये ३९ हजार ४२० जनावरे चारा व पाण्यासाठी आश्रयाला असल्याची स्थिती आहे.  

मराठवाड्यात पावसाने निराशा केली आहे. आधी दुष्काळ व आता पावसाची समाधानकारक नसलेली हजेरी, यामुळे मराठवाड्यातील पशुधनाची परवड अजून संपलेली नाही. चारा व पाण्याच्या संकटामुळे बीड व उसमानाबाद जिल्ह्यांत अनुक्रमे ४६ व १५ चारा छावण्या अजूनही सुरू आहेत. बीड जिल्ह्यात तर अपेक्षित पावसाच्या तुलनेत ५० टक्‍केही पाउस झाला नाही. त्यामुळे येथील परिस्थिती अजूनच गंभीर आहे. बीड, आष्टी, वडवणी, गेवराई या चार तालुक्‍यांतील जनावरांच्या चारा, पाण्याचा प्रश्‍न  सुटलेला नाही. 

बीड तालुक्‍यातील एका चारा छावणीत ७८० जनावरे दावणीला आहेत. दुसरीकडे आष्टी तालुक्‍यात तब्बल ३९ चारा छावण्यांत सर्वाधिक २१ हजार ६४५ जनावरांनी चारा, पाण्यासाठी आश्रय घेतला आहे. वडवणी तालुक्‍यातील एका चारा छावणीत ८५५, तर गेवाराई तालुक्‍यातील ५ चारा छावण्यांमध्ये ४२२० जनावरे आहेत. 

उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम, परांडा, वाशी तालुक्‍यांत जनावरांच्या चारा व पाण्याचे संकट गंभीर आहे. भूम तालुक्‍यातील ५ चारा छावण्यांत ३९३१ जनावरांनी आश्रय घेतला आहे. परंडा तालुक्‍यातील ८ चारा छावण्यांमध्ये ५७६८, तर वाशी तालुक्‍यातील २ चारा छावण्यांमध्ये २२२१ लहान, मोठ्या जनावरे आहेत.

चारा-पाण्याची वानवा  

दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर मराठवाड्यात उन्हाळ्यात ११५३ चारा छावण्यांना मंजुरात देण्यात आली होती. त्या तुलनेत बीडमध्ये सर्वाधिक, तर त्यापाठोपाठ जालना, परभणी, उस्मानाबाद व औरंगाबाद जिल्ह्यांत चारा छावण्या सुरू झाल्या होत्या. जसजसा पाऊस होत गेला, तसतसे पेरणी व शेती मशागतीच्या कामानिमीत्ताने शेतकऱ्यांनी छावण्यांमधील जनावरे घरी नेली. परंतु त्यानंतर पुन्हा एकदा पावसाने ओढ दिल्याने चारा व पाण्याचा प्रश्‍न बिकट होत आहे.

इतर बातम्या
संत्र्याला जागतिक बाजारपेठेत पोचवण्याचे...अमरावती : जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या...
पुणे जिल्ह्याच्या दुष्काळी भागात...पुणे ः गणपतीच्या विसर्जनानंतर पुन्हा पावसाने जोर...
बागलाण तालुक्यात शेतातून चंदनाची चोरीनाशिक  : बागलाण तालुक्यातील नवे निरपूर येथील...
तोलाई परिपत्रक होणार रद्द पुणे ः बाजार समित्यांमध्ये शेतमालाच्या...
भात, सोयाबीन पिके बहरलीचास, जि. पुणे ः खेड तालुक्‍याच्या पश्‍चिम...
‘शेतकरी सन्मान’साठी २० हजार कोटी दिले...नाशिक : शेतकऱ्यांना सन्मान मिळवून देत त्यांना मदत...
‘मी शेतकरी’ आंदोलनाला गांधी जयंतीपासून...नगर : शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दीडपट हमीभाव तसेच...
शेतीपूरक व्यवसायांना राज्य शासनाची...सांगली ः अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास...
थकीत बिलासाठी मुंबईत दुग्धविकास आयुक्त...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी येथील दुग्ध...
नाशिक जिल्ह्यात मका लष्करी अळीच्या...नाशिक  : जिल्ह्यात यंदा अमेरिकन लष्करी अळीचा...
आर्थिक मंदीमुळे देशातील शेती क्षेत्राला...नांदेड ः सध्या प्रचंड मंदी आहे. गुंतवणूक केली जात...
सातारा जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...सातारा ः माण, खटाव, फलटण या दुष्काळी तालुक्यांना...
विषबाधेच्या चौकशीची फाइल अडली गृह...नागपूर: प्रशासन गतिमान असल्याचा दावा सरकारकडून...
शेतकऱ्यांसाठी 'इर्मा' लागू करण्याचा...पुणे : राज्यात शेतकऱ्यांसाठी इर्मा अर्थात ‘‘इनकम...
दसरा-दिवाळीपर्यंत अभूतपूर्व 'कांदाटंचाई'पुणे : राज्यातील बाजार समित्यांत दोन दिवसांत...
कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची...पुणे : कर्नाटक, गोवा, अरबी समुद्र, कोकण आणि...
ठिकठिकाणी पावसाची हजेरीपुणे ः कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाल्याने...
पाच कीटकनाशकांवर अमरावती विभागात दोन...मुंबई : कीटकनाशकांच्या वापरामुळे शेतकरी व...
कापडे, हळनोर, कांबळे यांना यंदाचा ‘डॉ....पुणे ः ‘सकाळ माध्यम समूहा’तील ‘ॲग्रोवन’चे...
आचारसंहितेच्या धास्तीने जिल्हा परिषदेत...पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या...