बीडच्या भाजी अडतीमध्ये दोन गटांत हाणामारी

बीडच्या भाजी अडतीमध्ये दोन गटांत हाणामारी
बीडच्या भाजी अडतीमध्ये दोन गटांत हाणामारी

बीड : खासबागजवळील अडत मार्केटमध्ये दोन गटांत दगडफेक आणि तुंबळ हाणामारीनंतर तणाव निर्माण झाला. यामध्ये तलवारीचाही वापर करण्यात आल्याची घटना मंगळवारी (ता. ८) सकाळी घडली. या प्रकरणी परस्परविरोधी फिर्यादीवरन पेठ बीड पोलिस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. दरम्यान, दंगल नियंत्रण पथकासह पोलिसांचा फौजफाटा दाखल झाल्यानंतर येथील तणाव निवळला. 

शहरातील खासबाग परिसरात भाजीपाला ठोक विक्रीची आडत आहे. या ठिकाणी व्यापारी आणि शेतकऱ्यांसोबत दादागिरीचे प्रकार नित्याचेच आहेत. मंगळवारी सकाळी आडत सुरू झाल्यानंतर सलमान खान गफार खान तिथे आल्यानंतर त्याचे मोहम्मद शफीक याच्यासोबत भांडण सुरू झाले. यानंतर दोन्ही गट आमनेसामाने आले. दगडफेकीनंतर तरुणांनी हातात तलवारी घेऊन येऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. याची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर, सहायक पोलिस निरीक्षक नितीन पगार हे दंगल नियंत्रण पथक व पोलिसांसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी टवाळखोरांना चोप देऊन ताब्यात घेतले. 

या प्रकरणी पेठ बीड पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादीवरन मोहम्मद शफीक जाफर, शेख जुनेद शेख शहाबोद्दीन, शेख नाजोद्दीन शेख बागवान, गफार खान आबाज खान, सलमान खान गफार खान यांच्यासह इतर दोघांवर गुन्हे नोंद करण्यात आले. घटनेत चौघे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तलवार जप्त केली आहे. दरम्यान, या भागातील काही टवाळखोरांचा शेतकऱ्यांना नेहमीचाच त्रास आहे. तसेच या ठिकाणी भाजी, फळे आणणाऱ्या वाहनचालकांकडून हप्ते वसलीचे प्रकारही नित्याचेच आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com