पर्यावरण संतुलनामध्ये मधमाशी महत्त्वाची...

निसर्गाचे संतुलन राखण्यामध्ये मधमाशीची महत्त्वाची भूमिका आहे. फळ धारणेसाठी मधमाशीपालन अत्यंत उपयोगी आहे. मध हे अत्यंत पौष्टिक अन्न आणि औषध आहे.
Beekeeping in orchards is beneficial
Beekeeping in orchards is beneficial

निसर्गाचे संतुलन राखण्यामध्ये मधमाशीची महत्त्वाची भूमिका आहे. फळ धारणेसाठी मधमाशीपालन अत्यंत उपयोगी आहे. मध हे अत्यंत पौष्टिक अन्न आणि औषध आहे. निसर्गात अनेक प्रकारचे कीटक आहेत जे मानव आणि शेतीसाठी उपयुक्त आहेत. निसर्गाचे संतुलन राखण्यामध्ये मधमाशीची महत्त्वाची भूमिका आहे. फळ धारणेसाठी मधमाशीपालन अत्यंत उपयोगी आहे. मध हे अत्यंत पौष्टिक अन्न आणि औषध आहे. मधमाश्या मेण देतात ते सौंदर्य प्रसाधने, औद्योगिक उत्पादनाचा घटक आहे. मधमाश्यांपासून मिळणारे राजान्न (रॉयल जेली) दंश विष, परागकण, प्रोपौलीस इ. पदार्थांना उच्च प्रतीचे औषधी मूल्य आहे. परागीभवनाद्वारे पिके, भाजीपाला पिके, फळ पिकांच्या उत्पादनात जवळपास १५ ते ३० टक्के वाढीस मदत होते. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व नैसर्गिक संपत्तीचे जतन करण्यासाठी त्याचा अत्यंत उपयोग होतो. मधमाशीच्या अॅपीस सेरेना इंडिका (भारतीय सातेरी मधमाशी), अॅपीस डोरसेटा (आग्या माशी), अॅपीस फ्लोरीया (लहान मधमाश्या), अॅपीस अन्द्रेनिफार्मिस (हिमालयातील मधमाशी), अॅपीस लेबोरीओसा आणि अॅपीस केचेवानिकोवी या प्रजाती आहेत. अॅपीस मेलीफेरा ही प्रजाती युरोपातून आयात केलेली आहे म्हणून तिला युरोपियन मधमाशी म्हणतात. वरील सर्व प्रजाती शत्रूपासून संरक्षणासाठी दंश काट्याचा उपयोग करतात. तर मेलीपोनी कुटुंबातील डॅमर बी दंश काटाविरहित मधमाशी प्रचलित आहे. यांपैकी भारतीय मधमाशी आणि युरोपियन मधमाशी या प्रजातींचे पालन करणे शक्य आहे. मधमाशीपालनाचे तंत्र

  • भारतीय सातेरी मधमाश्यांपासून एका वर्षात २ ते ५ किलो मध प्रति वसाहतीमागे मिळतो. युरोपीय मधमाश्यांपासून ४५ ते १५० किलो मध मिळू शकतो.
  • एका वसाहतीमध्ये १५ ते ३० हजार मधमाश्या असून त्यात राणी माशी, कामकरी माशी आणि नर माशी अशा जातींचा समावेश असतो. एका वसाहतीमध्ये एक राणी माशी, एकूण संख्येच्या ५ टक्के नर माश्या व इतर कामकरी माश्यांची संख्या असते. राणी माशी पोळ्याच्या अष्टकोनी कप्प्यामध्ये तांदळाच्या आकाराची एक एक अंडी घालते. तीन दिवसानंतर अंड्यातून अळ्या बाहेर पडतात.
  • अंडी घातल्यानंतर १६व्या दिवशी राणी माशी कोशातून बाहेर पडते. नंतर नराबरोबर हवेत मीलन करते. मिलनानंतर २४ तासात फलित व अफलित अंडी घालण्यास सुरुवात करते. एक राणी माशी दर दिवसाला ५०० अंडी घालते. राणी माशी आकाराने मोठी असते.
  • साधारणपणे २४ दिवसानंतर पूर्ण वाढलेली नर माशी कोशातून बाहेर पडते. राणी माशी सोबत मिलन करणे एवढेच नर माशीचे काम असते व त्यानंतर त्या आपला प्राण त्यागतात.
  • कामकरी माश्या फलित अंड्यातून जन्म घेतात. २१ दिवसाच्या कालावधीनंतर कामकरी माश्या कोशातून बाहेर येतात. त्या परागकण, मकरंद व प्रोपोलीस वाहून आणणे, वसाहतीचे रक्षण करणे, नवीन पोळे तयार करणे, पोळ्यातील डागडुजी करणे, अळ्यांना खाऊ घालणे, स्वच्छता राखणे, वसाहतीमध्ये अनुकूल वातावरण कायम ठेवणे इत्यादी कामे निष्ठेने, निःस्वार्थपणे व वक्तशीरपणे पार पाडतात.
  • मधमाश्यांचे संगोपन महत्त्वाचे

  • मधमाश्यांचा अधिवास संपू न देणे व त्यांचे संरक्षण करावे.
  • मधाची पोळी जाळून अथवा धूर देऊन काढू नयेत.
  • विषारी कीटकनाशकांच्या फवारण्या पोळ्यावर करू नका.
  • मधमाश्या शेतात असताना कीटकनाशकांचा वापर टाळावा.
  • मधमाश्यांना उपयुक्त सपुष्प वनस्पतींची लागवड करावी.
  • संपर्क - डॉ.पराग तुरखडे, ९५४५४९११४७ (डॉ. तुरखडे विषय विशेषज्ञ (पीक संरक्षण) आणि डॉ. रविंद्र सिंह वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख म्हणून श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र, कणेरी मठ जि.कोल्हापूर येथे कार्यरत आहेत)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com