दुष्काळी मदतीच्या वाटपास सुरवात

तालुक्‍यातील २०० हजार खातेदारांपैकी आठ ते नऊ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये सामाईक खातेदारांची संख्या जवळपास ५० टक्के आहे. त्यामुळे त्यांची नाहरकत घेण्याचे काम सुरू आहे. सप्टेंबरअखेरपर्यंत दुष्काळ निधीचा विषय मार्गी लागेल. - जयंत पाटील, तहसीलदार, उत्तर सोलापूर
दुष्काळी मदतीच्या वाटपास सुरवात
दुष्काळी मदतीच्या वाटपास सुरवात

सोलापूर : जिल्ह्यातील गतवर्षीच्या रब्बी हंगामात दुष्काळ जाहीर होऊनही उत्तर सोलापूर व बार्शी या तालुक्‍यांना वगळण्यात आले. पण नंतर सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर ही मदत मंजूर झाली. त्यानुसार उत्तर सोलापूर तालुक्‍यासाठी १७ कोटी ९७ लाखांचा निधी मिळाला आहे. त्या निधीचे वितरण थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यामध्ये सुरू झाले आहे. पहिल्या दोन टप्प्यांत पाच कोटी ८० लाख रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यांत जमा होणार आहे. 

उत्तर सोलापूर तालुक्‍यात मागील वर्षी दुष्काळ पडला. मात्र, खरीप हंगामात तालुक्‍याचा समावेश दुष्काळात केला नव्हता. त्यानंतर रब्बी हंगामातही दुष्काळाची स्थिती कायम राहिल्याने तालुक्‍याचा समावेश दुष्काळी तालुक्‍यात केला. दुष्काळ पडल्याने शेतकऱ्यांना दुष्काळ निधी देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यानुसार १७ कोटी ८० लाख रुपयांचा निधी जमा झाला आहे. 

तालुक्‍यातील २० हजार शेतकऱ्यांना हा निधी मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात तालुक्‍यातील २१ गावांतील एक हजार ८३३ शेतकऱ्यांच्या खात्यावर एक कोटी १७ लाख रुपये जमा झाले. दुसऱ्या टप्प्याचा निधी बॅंकांमध्ये जमा केला आहे. पुढील तीन-चार दिवसांमध्ये तो थेट शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा होईल. 

दुसऱ्या टप्प्यात ३५ गावांतील सहा हजार १८८ गावांतील शेतकऱ्यांना चार कोटी ६३ लाख रुपयांच्या निधीचे वितरण करण्यात आले. विलंबाने का होईना तालुक्‍यात शेतकऱ्यांना दुष्काळ निधीचे पैसे मिळू लागले आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com