agriculture news in marathi, Beginning of Baglan's `Waghamba` | Agrowon

बागलाणच्या वाघंबा योजनेस प्रारंभ
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 28 फेब्रुवारी 2019

नाशिक : बागलाण तालुक्यातील शेरमाळ डोंगरावरील गुजरात राज्याकडे वाहून जाणारे पाणी बागलाण तालुक्यात वळविण्यासाठी वाघंबा वळण बंधारा ही नियोजित योजना तयार करण्यात आली. त्याचा प्रारंभ आमदार दीपिका चव्हाण यांच्या हस्ते हा करण्यात आला. हरणबारी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याचा मोसमसह काटवन परिसराला आधार होणार आहे. 

नाशिक : बागलाण तालुक्यातील शेरमाळ डोंगरावरील गुजरात राज्याकडे वाहून जाणारे पाणी बागलाण तालुक्यात वळविण्यासाठी वाघंबा वळण बंधारा ही नियोजित योजना तयार करण्यात आली. त्याचा प्रारंभ आमदार दीपिका चव्हाण यांच्या हस्ते हा करण्यात आला. हरणबारी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याचा मोसमसह काटवन परिसराला आधार होणार आहे. 

चव्हाण यांच्या हस्ते या वाघंबा वळण बंधारा कामाचा लोकार्पण झाले. अध्यक्षस्थानी माजी पंचायत समिती सभापती विमलबाई महाले होत्या. माजी आमदार संजय चव्हाण, शैलेश सूर्यवंशी, शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, नगरसेवक काकाजी सोनवणे, अशोक सावंत, काशिनाथ महाले, सोमनाथ चौधरी, गिरिदास महाले, जाकीर शेख, संगीता साबळे, वैशाली सूर्यवंशी, शमा दंडगव्हाळ, भाईदास महाले आदी उपस्थित होते.

चव्हाण म्हणाल्या, ‘‘बागलाण गुजरात राज्याला लागून आहे. येथील डोंगर रांगावरील पावसाचे पाणी गुजरात राज्यात वाहून जाते. यामुळे तेथून पश्‍चिम वाहिनीद्वारे अरबी समुद्रात वाहून जाणारे पाणी अडवून ते तापी या तुटीच्या खोऱ्यातील हरणबारी मध्यम प्रकल्पात वळविण्यासाठी तत्कालीन खासदार प्रताप सोनवणे यांनी शासनस्तरावर पाठपुरावा केला. नियोजित वळण योजना वाघंबा शेरमाळ डोंगराचे पाणलोट क्षेत्र ०.५२ चौ. कि.मी आहे. जलनिष्पत्ती १६.७८ द.ल.घ.फु. आहे. पूर्ववाहिनी तापी खोऱ्यात हे पाणी वळविणे प्रस्तावित आहे.’’

‘‘या योजनेद्वारे हरणबारी धरणातील जलसाठ्यात वाढ होऊन बागलाण तालुक्यातील मोसमसह काटवन परिसरातील शेतीसिंचनाचा प्रश्‍न मार्गी लागणार आहे. आगामी काळात ही योजना कार्यान्वित करून पुढील पावसाळ्यात त्याचा फायदा होईल. बागलाणमधील शेती ''सुजलाम सुफलाम'' होण्यास मदत होईल, अशी ग्वाही चव्हाण यांनी दिली.

इतर बातम्या
कलिंगडांच्या जनुकीय प्रदेशांचा घेतला...आंतरराष्ट्रीय संशोधकांचा गट कलिंगडाच्या सात...
औरंगाबाद जिल्ह्यात मका खरेदीसाठी दहा...औरंगाबाद : मक्याला किमान आधारभूत किंमत मिळावी,...
सांगली जिल्ह्यात यंदा पावसाची ‘रेकॉर्ड...सांगली : जिल्ह्यात गेल्या २० वर्षातील सर्वाधिक...
युरिया ब्रिकेटची पन्हाळा तालुक्यात शंभर...कोल्हापूर : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन...
परभणीत साडेचार लाख हेक्टरवर पिके वायापरभणी : ऑक्टोबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत कमी...नांदेड : पावसामुळे नांदेड, परभणी, हिंगोली...
रत्नागिरी : गतवर्षीच्या तुलनेत भात...रत्नागिरी ः अतिवृष्टीमुळे कोकणातील शेतकरी चांगलाच...
शिरपूर उपबाजारात सोयाबीनची आवक वाढलीशिरपूर, जि. वाशीम  : सलग सुरू असलेला पाऊस...
करडा कृषी विज्ञान केंद्रात रब्बी कृषी...अकोला ः परतीच्या पावसाने खरीप पिकांचे अतोनात...
पणन संचालकपदी कोणाची वर्णी लागणार?पुणे ः शेतमाल विपणनच्या ३०७ बाजार समित्या, ९००...
धक्कादायक ! कांदा नुकसानीच्या...नाशिक  : चालू वर्षी दुष्काळामुळे होरपळून...
अमरावती : रब्बी हंगाम क्षेत्रात होणार...अमरावती ः मॉन्सूनोत्तर पाऊस खरीप पिकांच्या मुळावर...
‘भातकुली’वर पाणीटंचाईचे सावटअमरावती  ः सुरुवातीला उघडीप त्यानंतर...
दक्षिण आफ्रिकेतील 'मालावी हापूस'...पुणे  ः दक्षिण आफ्रिकेतील मालावी प्रांतात...
पुणे विभागात रब्बीचा चार लाख हेक्टरवर...पुणे  ः ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यांत...
साताऱ्यात राष्ट्रीयीकृत बँकांकडून...सातारा ः अतिपावसाने शेती क्षेत्राचे कोट्यवधींचे...
पुणे बाजार समितीत ‘ई-नाम’ची अंमलबजावणी...पुणे :  शेतीमालाच्या ऑनलाइन लिलावांतून...
माण तालुक्यात पीक पंचनाम्यांमध्ये...दहिवडी, जि. सातारा  : पावसाने जोरदार तडाखा...
राज्यात अखेर राष्ट्रपती राजवटमुंबई ः चौदाव्या विधानसभेसाठी कोणत्याच...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस...कोल्हापूर  : यंदाच्या प्रतिकूल परिस्थितीच्या...