शेतकरी कर्जमुक्तीसाठी सोलापुरात आधार प्रमाणीकरणास प्रारंभ

 Beginning of certification of basis for farmers debt relief
Beginning of certification of basis for farmers debt relief

सोलापूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकरी सभासदांचे आधार प्रमाणीकरण करून या योजनेचा प्रारंभ अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव यांच्या हस्ते करण्यात आला.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा प्रारंभ जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप आणि माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथील थकबाकीदार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करून करण्यात आला. मंद्रूप येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत झालेल्या या कार्यक्रमास जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे, तहसीलदार उज्ज्वला सोरटे, अग्रणी बँक व्यवस्थापक संतोष सोनवणे, सहायक निबंधक आबासाहेब गावडे, बँक आॅफ इंडियाचे विश्वास वेताळ उपस्थित होते.

या कर्जमुक्ती योजनेंतर्गत आधार प्रमाणीकरणाच्या कामात मंद्रूप येथील १०४; तर वेळापूर येथील १९४ पात्र शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर असून, त्यांचे आधार प्रमाणिकरण केले जाणार आहे. या याद्यामध्ये काही त्रुटी आढळल्यास त्यांची त्या-त्या स्तरावर निर्गती केली जाईल, असे अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी स्पष्ट केले. त्यांच्या हस्ते आधार प्रमाणीकरणाच्या पोचपावत्यांचे वितरणही करण्यात आले. त्याचबरोबर श्रीमती नागुबाई कुंभार, भाग्यश्री कुमठाळे, पुंडलिक लोभे, सदाशिव जोडमुठे यांचा सत्कार करण्यात आला. 

२८ फेब्रुवारीला यादी लावणार जिल्ह्यात सोमवारी (ता. २४) कर्जमुक्ती योजनेअंतर्गत मंद्रूप आणि वेळापूर येथे पात्र थकबाकीदार शेतकरी सभासदांच्या आधार प्रमाणीकरणाच्या कामाची पथदर्शी योजना शासनाने हाती घेतली असून जिल्ह्यातील उर्वरित पात्र थकबाकीदार शेतकरी सभासदांच्या याद्या २८ पर्यंत उपलब्ध केल्या जातील. या याद्या ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, विकास सोसायटी; तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संबंधित शाखेत लावल्या जातील, असेही जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे म्हणाले.

जिल्ह्यातील ८० हजार शेतकऱ्यांना ७७१ कोटी मिळणार महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. या योजनेच्या अंमलबजावणीत कोणत्याही त्रुटी राहू नयेत, यासाठी प्रशासन सतर्क असून, जिल्ह्यातील ८० हजार ७८६ थकबाकीदार शेतकरी सभासदांची जवळपास ७७१.६२ कोटी रुपयांची कर्जमाफी होऊन हे शेतकरी कर्जमुक्त होतील. जिल्ह्यात एकूण ८०७८६ शेतकऱ्यांपैकी ७९३११ शेतकऱ्यांची नावे पोर्टलवर अपलोड झाली आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com