agriculture news in Marathi, The beginning of the gate of Telhara dam in Chikhliya | Agrowon

चिखलीतील तेल्हारा धरणाच्या गेटदुरुस्तीस अखेर सुरवात

टीम अॅग्रोवन
बुधवार, 22 मे 2019

बुलडाणा ः पाटबंधारे विभागांतर्गत असलेल्या चिखली तालुक्यातील शेलगाव शिवारातील तेल्हारा धरणाच्या मुख्य गेटची दुरुस्ती करून पाणीटंचाईची समस्या सोडविण्यात यावी, अशी मागणी रयत क्रांती संघटनेसह शेतकऱ्यांनी वारंवार केली. मात्र, संबंधित विभागाकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनायक सरनाईक यांच्यासह शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. १३) उपविभागीय अभियंत्याची भेट घेत गेटची दुरुस्ती करा; अन्यथा धरणामध्ये जलसमाधी आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला होता. या आंदोलनाची दखल घेत उपविभागीय अभियंत्यांनी गेटची पाहणी केली.

बुलडाणा ः पाटबंधारे विभागांतर्गत असलेल्या चिखली तालुक्यातील शेलगाव शिवारातील तेल्हारा धरणाच्या मुख्य गेटची दुरुस्ती करून पाणीटंचाईची समस्या सोडविण्यात यावी, अशी मागणी रयत क्रांती संघटनेसह शेतकऱ्यांनी वारंवार केली. मात्र, संबंधित विभागाकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनायक सरनाईक यांच्यासह शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. १३) उपविभागीय अभियंत्याची भेट घेत गेटची दुरुस्ती करा; अन्यथा धरणामध्ये जलसमाधी आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला होता. या आंदोलनाची दखल घेत उपविभागीय अभियंत्यांनी गेटची पाहणी केली. दरम्यान, गेटच्या दुरुस्तीस सुरवातही करण्यात आली.

शेलगाव शिवारातील तेल्हारा धरणाचे मुख्यव्दार हे गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून नादुरुस्त असल्याने यामधून दररोज हजारो लिटर पाण्याचा अपव्यय  होत होता. यामुळे धरणात पाणीसाठा शिल्लक राहत नव्हता. परिणामी, धरणाखालील शेलगाव, आन्वी, मुंगसरी, तेल्हारा, एकलारा व इतर गावांतील पाणीपुरवठा विहिरी कोरड्या पडत. नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. याची दखल घेत रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनायक सरनाईक यांच्यासह शेतकऱ्यांनी वारंवार ग्रामपंचायतीचे ठराव देऊन गेटची दुरुस्ती करण्याची मागणी जिल्हाधिकारी, कार्यकारी अभियंता, सिंचन विभागाकडे केली होती.

दरम्यान, पाटबंधारे विभागाच्या उपविभागीय अभियंत्यांनी मेकॅनिक, संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांना घेऊन तेल्हारा धरणाच्या मुख्य गेटची पाहणी केली. त्यानंतर गेटच्या कामास सुरवात करण्यात आली आहे. या वेळी उपविभागीय अभियंता रोकडे, जलसंधारणचे सहायक अभियंता शिंदे, आर. एच. झुरावत, रयतचे जिल्हाध्यक्ष विनायक सरनाईक, उमेश चव्हाण, उपसरपंच नंदकिशोर अंभोरे, मुंगसरीचे माजी उपसरपंच शिवशंकर इंगळे, मदन अंभोरे, भागवत ठेंग यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.


इतर ताज्या घडामोडी
मक्यापासून निर्मित जैवप्लॅस्टिकचा...मक्यातील स्टार्च आणि अन्य नैसर्गिक घटकांचा वापर...
जुन्या बागेमध्ये घडाच्या विकासाकडे लक्ष...द्राक्ष बागेमध्ये सध्या वातावरण चांगले असले, तरी...
औरंगाबाद विभागात उसाचे तीन लाख मेट्रिक...औरंगाबाद : या गाळप हंगामात ९ डिसेंबर अखेरपर्यंत...
औरंगाबाद जिल्ह्यात गव्हावर आढळला...औरंगाबाद : जिल्ह्यातील गव्हाच्या पिकावर खोडमाशीचा...
नावातील त्रुटी दुरुस्तीसाठी...वाशीम : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत...
रत्नागिरी जिल्ह्यात खरिपाच्या विमा...रत्नागिरी : शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी,...
शिरोळ, हातकणंगले तालुक्यांत ऊस...कोल्हापूर : ऊस वाहतूकदारांना नऊ टक्के वाढ...
‘नासाका’ सुरू करण्यासाठी शरद पवारांना...नाशिक : ‘नासाका’ पुन्हा सुरू व्हावा यासाठी दिल्ली...
कृषिपंपांना कॅपॅसिटर बसवा, ऑटो स्विचचा...नाशिक : वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर कृषिपंप तत्काळ...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत दोन...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...
पीकविम्याच्या भरपाईसाठी प्रस्ताव पाठवा...सोलापूर : उत्तर सोलापूर, नरखेड, मार्डी, शेळगी,...
पुणे विभागातील १७०० गावांमधील भूजल...पुणे  ः यंदा मुबलक प्रमाणात पाऊस झाला असला,...
नगर जिल्ह्यातील कारखान्यांकडून पावणेसात...नगर  ः जिल्ह्यात १४ सहकारी व नऊ खासगी असे...
नवीन लाल कांद्याच्या दरात चढ-उतारनाशिक: अतिवृष्टीमुळे अनेक खरीप कांदा लागवडी बाधित...
कांदा दरवाढीनंतर कोबीला आले ‘अच्छे दिन’कोल्हापूर : कांद्याचे दर वाढल्याने हॉटेल...
भंडारा : शेतकऱ्यांना आज होणार विमा...मुंबई : भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप २०१९...
...म्हणून सहा एकरांवरील द्राक्षबागेवर...नाशिक  : निफाड तालुक्यातील सोनेवाडी येथे...
राज्याला केंद्राकडून १५ हजार कोटी येणे...मुंबई  :  वस्तू व सेवा कर (जीएसटी)...
शिवनेरीवरून कर्जमाफीची घोषणा होण्याची...पुणे  ः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (गुरुवारी...
पंकजा मुंडे यांच्या स्वाभिमान...बीड  : लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या...