Agriculture news in Marathi, Beginning with the guarantee of the Moog | Agrowon

मुगाची हमीभावाने खरेदी सुरू करावी

टीम अॅग्रोवन
शनिवार, 14 सप्टेंबर 2019

परभणी ः मुगाची आधारभूत किंमत ७ हजार ५० रुपये असताना जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील व्यापारी ४ हजार ते ५ हजार रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी करीत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात हमीभावाने मूग खरेदीसाठी केंद्रे सुरू करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

परभणी ः मुगाची आधारभूत किंमत ७ हजार ५० रुपये असताना जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील व्यापारी ४ हजार ते ५ हजार रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी करीत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात हमीभावाने मूग खरेदीसाठी केंद्रे सुरू करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

यंदाच्या हंगामातील मुगाची आवक सुरू झाली आहे. आर्थिक अडचणी असलेले शेतकरी मूग बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. केंद्र शासनाने मुगाची आधारभूत किंमत प्रतिक्विंटल ७ हजार ५० रुपये निश्चित केलेली आहे. परंतु, कृषी उत्पन्न बाजार समित्या अंतर्गतचे व्यापारी मुगाची ४ हजार रुपये ते ५ हजार रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी करत आहेत. 

त्याकडे सर्व संबंधित यंत्रणांचे दुलर्क्ष होत असल्याने शेतकऱ्यांचे फार मोठे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे हमीभावाने मुगाची खरेदी करण्यासाठी शासकीय खरेदी केंद्र सुरू करावेत. केंद्र सुरू होईपर्यंत शेतमाल तारण योजनेअंतर्गंत मुगासाठी तारण कर्ज देण्यात यावे. 

महाबीजला शेतमालाच्या आधारभूत किंमतीच्या ८० टक्के अग्रीम देण्यासाठी आदेशीत करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष देशमुख, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष प्रा. किरण सोनटक्के, युवक जिल्हाध्यक्ष शांतीस्वरूप जाधव, किरण तळेकर, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र रोडगे, मनोज राऊत, दीपक वारकरी, अशिष हरकळ, गोपाळ देशमुख, शेख सलमान, मोबीन कुरेशी यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.


इतर ताज्या घडामोडी
कोल्हापूर : साखर उताऱ्यात खासगी कारखाने...कोल्हापूर : यंदाच्या गळीत हंगामात फेब्रुवारीच्या...
वाईत हळदीला दहा हजारांवर दर वाई, जि. सातारा : वाई शेती उत्पन्न बाजार...
वाशीम जिल्ह्यातील महिला बचतगट डिजिटल...वाशीम : राष्ट्रीय  कृषी व ग्रामीण विकास बँक...
जुने वाण राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत...नगर : राहीबाई यांनी जुनी परंपरा पुनर्जीवित केली...
जातीय सलोख्याला ठेच लागते की काय अशी...जुन्नर, जि. पुणे : सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या...
राज्यातील आजारी यंत्रमाग उद्योग...कडेगाव, जि. सांगली ः राज्यातील आजारी यंत्रमाग...
संत्रा, मोसंबी पिकातील फळगळीची कारणेसंत्रा, मोसंबी फळबागांमध्ये नैसर्गिक परिस्थिती,...
लक्षात घ्या चुनखडीयुक्त जमिनीचे गुणधर्मजमिनीत मुक्त चुना वेड्यावाकड्या खड्यांच्या आणि...
नाशिकमध्ये गवार ३००० ते ५५००...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सीताफळातील बहार व्यवस्थापनफेब्रुवारी-मार्च महिन्यांत पाण्याची उपलब्धता...
शेतकरीभिमुख संशोधनावर भर : कुलगुरू डॉ....अकोला  ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...
लेखी आश्वासनानंतर बाजार समिती...नाशिक : शासनाने जाहीर केलेला महाभाई भत्ता मिळावा...
लातूर विभागात सूक्ष्म सिंचनातील ११...नांदेड : पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत यंदा...
खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यातजळगाव ः खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे....
सातारा : अधिकृत विक्रेत्यांकडून...सातारा : बाजार समितीच्या आवारातील...
ग्रामीण पर्यटन विकासाचा ‘शिवनेरी...पुणे ः गड किल्ल्यांच्या पर्यटनाच्या माध्यमातून...
‘एफएसएसएआय’च्या नव्या ‘सीईओ’विषयी...पुणे: भारतीय अन्न सुरक्षितता व मानके...
‘म्हैसाळ’मधून पाणी सोडण्याच्या हालचालीसांगली : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून पाणी...
पीकविमा र‍कमेसाठी शेतकऱ्यांचा रास्ता...अमरावती  ः पीकविम्याची रक्‍कम कर्ज खात्यात...
बिबट्या दिसल्याने ग्रामस्थांत दहशतअमरावती  ः गावशिवारात एकाच आठवड्यात दोनदा...