मार्च महिन्याची सुरुवातच अकोलेकरांसाठी ‘ताप’दायक ; पारा ३९.५ अंश सेल्सिअसवर 

मार्च महिन्याला सुरुवात होताच यंदाचा उन्हाळा ‘ताप’दायक ठरू लागला आहे. मंगळवारी (ता. २) अकोल्याचा पारा ३९.५ अंश सेल्सिअस इतका नोंदविण्यात आला.
 मार्च महिन्याची सुरुवातच  अकोलेकरांसाठी ‘ताप’दायक ; पारा ३९.५ अंश सेल्सिअसवर The beginning of March ‘Fever’ for Akolekars; Mercury at 39.5 degrees Celsius
मार्च महिन्याची सुरुवातच  अकोलेकरांसाठी ‘ताप’दायक ; पारा ३९.५ अंश सेल्सिअसवर The beginning of March ‘Fever’ for Akolekars; Mercury at 39.5 degrees Celsius

अकोला : मार्च महिन्याला सुरुवात होताच यंदाचा उन्हाळा ‘ताप’दायक ठरू लागला आहे. मंगळवारी (ता. २) अकोल्याचा पारा ३९.५ अंश सेल्सिअस इतका नोंदविण्यात आला. सकाळपासूनच उन्हाच्या झळांना सुरुवात होत आहे.  गेले काही दिवस रात्री थंडी व दिवसा उन्ह असे वातावरण होते. मात्र, गेल्या दोन दिवसांत वातावरणात बदल होऊन उष्म्यात वाढ झाली आहे.

थंडीचा जोर पूर्णतः ओसरला असून, रात्रीच्या तापमानातही वाढ होऊ लागली. मंगळवारी अकोला मोठ्या प्रमाणात तापले. गेले आठवडाभर ३६ ते ३७ अंशांदरम्यान राहणारे वातावरण वाढले. पारा ३९.५ अंश सेल्सिअसपर्यंत जाऊन धडकला. मार्चची सुरुवातच कडक उन्हाने झाली आहे. संपूर्ण दिवसभर कोरडे वातावरण राहत असून, उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याच्या लहरी थांबल्याचे जाणवत आहे. उन्हाळा सुरू होऊन पहिल्याच आठवड्यात उन्हाचे चटके बसू लागले. याची हलकीशी चुणूक मंगळवारी अनेकांना दिसली. 

यंदाचा उन्हाळा अधिक ‘ताप’दायक राहील, याची झलक दिसून आली. कोरोनामुळे जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी सुरू आहे. दिवसा रस्त्यांवरील वाहने व गर्दी काही अंशी कमी असते. दुपारी व्यावसायिक प्रतिष्ठाने पूर्णतः बंद झाल्यानंतर रस्त्यांवर आणखी सामसूम पसरते. वाढत असलेल्या तापमानामुळे नागरिक आतापासूनच खबरदारीच्या उपाययोजना करू लागले आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com