कोल्हापूर : महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना वाहतूक अनुदान देण्याबाबत हालचाली सुरू झाल्या
ताज्या घडामोडी
मार्च महिन्याची सुरुवातच अकोलेकरांसाठी ‘ताप’दायक ; पारा ३९.५ अंश सेल्सिअसवर
मार्च महिन्याला सुरुवात होताच यंदाचा उन्हाळा ‘ताप’दायक ठरू लागला आहे. मंगळवारी (ता. २) अकोल्याचा पारा ३९.५ अंश सेल्सिअस इतका नोंदविण्यात आला.
अकोला : मार्च महिन्याला सुरुवात होताच यंदाचा उन्हाळा ‘ताप’दायक ठरू लागला आहे. मंगळवारी (ता. २) अकोल्याचा पारा ३९.५ अंश सेल्सिअस इतका नोंदविण्यात आला. सकाळपासूनच उन्हाच्या झळांना सुरुवात होत आहे.
गेले काही दिवस रात्री थंडी व दिवसा उन्ह असे वातावरण होते. मात्र, गेल्या दोन दिवसांत वातावरणात बदल होऊन उष्म्यात वाढ झाली आहे.
थंडीचा जोर पूर्णतः ओसरला असून, रात्रीच्या तापमानातही वाढ होऊ लागली. मंगळवारी अकोला मोठ्या प्रमाणात तापले. गेले आठवडाभर ३६ ते ३७ अंशांदरम्यान राहणारे वातावरण वाढले. पारा ३९.५ अंश सेल्सिअसपर्यंत जाऊन धडकला. मार्चची सुरुवातच कडक उन्हाने झाली आहे. संपूर्ण दिवसभर कोरडे वातावरण राहत असून, उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याच्या लहरी थांबल्याचे जाणवत आहे. उन्हाळा सुरू होऊन पहिल्याच आठवड्यात उन्हाचे चटके बसू लागले. याची हलकीशी चुणूक मंगळवारी अनेकांना दिसली.
यंदाचा उन्हाळा अधिक ‘ताप’दायक राहील, याची झलक दिसून आली. कोरोनामुळे जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी सुरू आहे. दिवसा रस्त्यांवरील वाहने व गर्दी काही अंशी कमी असते. दुपारी व्यावसायिक प्रतिष्ठाने पूर्णतः बंद झाल्यानंतर रस्त्यांवर आणखी सामसूम पसरते. वाढत असलेल्या तापमानामुळे नागरिक आतापासूनच खबरदारीच्या उपाययोजना करू लागले आहेत.
- 1 of 1098
- ››