नवीन कृषी कायद्यांची सुरुवात काँग्रेस, राष्ट्रवादीच्या काळात ः आंबेडकर

आज देशभरातील शेतकरी नवीन तीन कृषी कायद्यांविरुद्ध लढत आहे. या तिन्ही कायद्यांची सुरुवात ही २००६ मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ताकाळातच झाली होती, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी (ता. २७) अकोला येथे केला.
new agricultural laws during the time of Congress, NCP: Ambedkar
new agricultural laws during the time of Congress, NCP: Ambedkar

अकोला ः आज देशभरातील शेतकरी नवीन तीन कृषी कायद्यांविरुद्ध लढत आहे. या तिन्ही कायद्यांची सुरुवात ही २००६ मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ताकाळातच झाली होती, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी (ता. २७) अकोला येथे केला.

शाहीनबागच्या धर्तीवर अकोला जिल्हाधिकारी कार्यालयापुढे मुस्लिम धर्मीयांनी कृषिबाग आंदोलन सुरू करून कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. या आंदोलनात बुधवारी ‘वंचित’चे नेते ॲड. आंबेडकर सहभागी झाले होते. त्या ठिकाणी पत्रकारांशी बोलताना त्यांनी शेतकऱ्यांना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसवर विश्‍वास न ठेवण्याचे आवाहन केले. ज्या कृषी कायद्यांविरुद्ध शेतकरी आज लढतो आहे, ते तीनही कायदे २००६ मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेसची सत्ता असतानाच मंजूर करण्यात आले. याशिवाय बाजार व्यवस्था संपवून हमीभाव न देण्याची सुरुवातही त्यांच्यात काळातच झाली होती, असा आरोपही ॲड. आंबेडकर यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

झेंडा फडकाविणारा भाजप कार्यकर्ता दिल्लीतील शेतकऱ्यांच्या हिंसक आंदोलनामागे केंद्रातील सत्ताधारी भाजप असल्याचा आरोप ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. लाल किल्‍ल्याकडे जाणारा मार्ग ट्रॅक्टर रॅलीमध्ये समाविष्ट नव्हता. त्यानंतरही शेतकरी त्या रस्त्याने गेले कसे, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. याशिवाय लाल किल्ल्यावर झेंडा फडकाविणारी व्यक्ती जित सिद्धू असल्याचे पुढे आले असून, तो भाजपचा कार्यकर्ता असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे आंदोलनादरम्यान काहीतरी घडणार याची जाणीव असल्याने आंदोलन चिघळविण्यासाठी भाजपनेच प्रयत्न केल्याचा आरोपही त्यांनी केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com