नाम फाउंडेशनच्या वतीने १०९ महिलांना २७ लाखांची मदत

नाम फाउंडेशनच्या वतीने शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विधवा महिलांना दिलासा व आर्थिक मदतीचा हात देण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील १०९ महिलांना २७ लाख २५ हजार रुपयांचे धनादेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
On behalf of the Nam Foundation 27 lakh assistance to 109 women
On behalf of the Nam Foundation 27 lakh assistance to 109 women

अकोलाः नाम फाउंडेशनच्या वतीने शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विधवा महिलांना दिलासा व आर्थिक मदतीचा हात देण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील १०९ महिलांना २७ लाख २५ हजार रुपयांचे धनादेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. ‘‘नाम फाउंडेशनचे मदत कार्य उल्लेखनीय आहे,’’ अशा शब्दात जिल्हाधिकारी श्रीमती अरोरा यांनी फाउंडेशनच्या कार्याचा गौरव केला.  जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आत्महत्याग्रस्त कुटुंबांना धनादेश वाटप कार्यक्रम पार पडला. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, नाम फाउंडेशनचे जिल्हा मार्गदर्शक ज्येष्ठ पत्रकार प्रा. मधू जाधव, सामाजिक कार्यकर्ते दिलीप सावरकर, नाम फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक माणिक शेळके उपस्थित होते. विदर्भ व खान्देशचे समनव्यक तथा दिग्दर्शक हरीश इथापे यांच्या मार्गदर्शनात देण्यात आली.  जिल्हाधिकारी अरोरा म्हणाल्या, की नाम फाउंडेशनने ग्रामीण भागात खूप चांगले काम केले असून आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना आर्थिक मदतीमुळे आधार मिळाला आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाना आवश्यक ती सर्व मदत करण्यासाठी प्रशासन आपल्या पाठिशी आहे. याकरीता शेतकरी कुटुंबांनी स्थानिक तहसील कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क साधावा. तसेच, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना पात्र योजनेचा लाभ प्राधान्याने देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना दिले. या कार्यक्रमाद्वारे नाम फाउंडेशनच्या वतीने आत्महत्याग्रस्त १०९ कुटुंबीयांना प्रत्येकी २५ हजार रुपये प्रमाणे २७ लाख २५ हजार रुपयांच्या आर्थिक मदतीचे धनादेश वाटप करण्यात आले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com