Agriculture news in marathi Behind the Bihar agitation of Kisan Sabha | Agrowon

किसान सभेचे बिऱ्हाड आंदोलन मागे

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020

नाशिक  : दिंडोरी तालुक्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून नवीन व विभक्त रेशन कार्ड देण्यात आलेले नाही. तसेच वनजमिनी आदींसह विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी दिंडोरी तालुका किसान सभेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर सोमवार (ता. २४) बिऱ्हाड मोर्चा व घेराव आंदोलन सुरू होते. बुधवार (ता. २६) किसान सभेचे पदाधिकारी यांच्यासोबत उपविभागीय अधिकारी डॉ. संदीप आहेर, वन विभागाचे अधिकारी, पोलिस विभाग यांच्यात चर्चा सकारात्मक चर्चा झाली.

नाशिक  : दिंडोरी तालुक्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून नवीन व विभक्त रेशन कार्ड देण्यात आलेले नाही. तसेच वनजमिनी आदींसह विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी दिंडोरी तालुका किसान सभेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर सोमवार (ता. २४) बिऱ्हाड मोर्चा व घेराव आंदोलन सुरू होते. बुधवार (ता. २६) किसान सभेचे पदाधिकारी यांच्यासोबत उपविभागीय अधिकारी डॉ. संदीप आहेर, वन विभागाचे अधिकारी, पोलिस विभाग यांच्यात चर्चा सकारात्मक चर्चा झाली. ‘‘रेशन कार्डाच्याबाबत तहसील कार्यालयात येणाऱ्या अडचणीवर स्वत: प्रांताधिकाऱ्यांनी मार्ग काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले,’’ अशी माहिती किसान सभेचे नेते सुनील मालुसरे यांनी दिली. 

तालुक्यातील शेतकरी, आदिवासी तसेच विविध सुविधांपासून वंचित असलेले नागरिक बिऱ्हाड घेऊन यामध्ये सहभागी झाले होते. किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांना शासकीय अधिकाऱ्यांनी काही आश्वासने दिली, ज्यामध्ये रेशन कार्ड काढताना अडवणूक होणार नाही. वनजमिनीचा प्रश्न न्यायालयाच्या निर्णयामुळे अडलेला आहे. अपात्र लाभधारकांच्या वनहक्क दाव्याची पूर्ण तपासणी पुन्हा करण्यात येईल त्याबाबत न्यायालयाचे निर्देश पाळण्यात येतील. संजय गांधी योजना कार्यालयामार्फत प्रश्न तातडीने सोडवण्याचे प्रांत डॉ. संदीप आहेर यांनी मान्य केले.

किसान सभेचे प्रश्न सोडवण्यासाठी दोन प्रतिनिधींनी सातत्याने तहसीलदारांशी संपर्क साधावा व मार्ग काढावा, रेशन कार्डाचा प्रश्न तातडीने सोडण्यात येईल, असे आश्वासन प्रांत डॉ. आहेर यांनी दिले. या वेळी तहसीलदार कैलास पवार, नायब तहसीलदार तांबे आदी उपस्थित होते.


इतर ताज्या घडामोडी
राज्यात वळीव पावसाचा दणका सुरूच पुणे : राज्यातील पुणे, नगर, जालना, यवतमाळ,...
गरजूंसाठी या बळीराजाने खुली केली...नाशिक : सध्याच्या टाळेबंदीच्या काळात हातावर...
मुख्य सचिव अजोय मेहता यांना मुदतवाढमुंबई  : राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता...
अंकुशनगर परिसरात पावसाचा दणका अंकूशनगर, जि. जालना: एकिकडे कोरोनाचे सावट...
परराज्यातील कामगार, कष्टकऱ्यांची पूर्ण...मुंबई : जीवनावश्यक वस्तूंची, औषधांची कमी नाही,...
विमानसेवा बंदचा भाजीपाला निर्यातीला...पुणे : फेब्रुवारी ते मे या काळात युरोपीय...
देशातील रुग्णसंख्या ९०० च्या घरातनवी दिल्ली : महासत्ता अमेरिकेसह संपूर्ण जगात...
मुंबई बाजार समितीत आज व्यापाऱ्यांचा...मुंबई : राज्य शासनाच्या आदेशामुळे सुरू...
‘कोरोना’चा सामना करण्यासाठी ११ हजार...अकोला  ः कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे...
वऱ्हाडातील ६५ हजारांवर नागरिक गावी परतलेअकोला ः रोजगार, नोकरीच्या निमित्ताने शहरांमध्ये...
अकोल्यातील दिड हजारांवर शेतकऱ्यांची...अकोला ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव...
जिल्हा परिषदेचे दीड लाख कर्मचारी देणार...नगर ः कोरोना संसर्गाबाबत उपाययोजना करण्यासाठी...
नगर जिल्ह्यात तिसऱ्या दिवशी पावसाचा...नगर  ः नगर जिल्ह्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी...
शेतमाल निर्यातीसाठी वाणिज्य मंत्रालयाने...नागपूर  ः राज्यात जारी करण्यात आलेल्या...
औरंगाबाद, जालना जिल्ह्यात पाऊस औरंगाबाद/जालना: दोन्ही जिल्ह्यातील जवळपास ६७...
कलिंगड, खरबूज उत्पादक शेतकऱ्यांना फटकासोलापूर ः खास उन्हाळी हंगाम डोळ्यासमोर ठेवून...
राज्य तलाठी संघांकडून एक दिवसाचे वेतन...परभणी ः कोरोना बाधितांच्या मदतीसाठी तलाठी, मंडल...
नांदेड येथे वाहतूक प्रमाणपत्र कक्ष...नांदेड ः अत्यावश्यक सेवा, वस्तू यांचा पुरवठा...
सांगली, मिरज, कुपवाड शहरात घरपोच...सांगली ः महापालिकेतर्फे सांगली, मिरज आणि कुपवाड...
नगर जिल्ह्यात लाख मोलाची फुले होताहेत...नगर ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर परराज्यातील...