Agriculture news in marathi; Beiyapur begins to buy soybeans | Agrowon

भिवापूर येथे सोयाबीन खरेदीला सुरवात

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

भिवापूर, नागपूर  : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात सोयाबीन खरेदीला सुरवात करण्यात आली. पहिल्या दिवशी शेतकऱ्यांनी ५५० क्विंटल सोयाबीन विक्रीस आणले होते. शासनाने सोयाबीनकरिता ३७२० रुपये हमीभाव जाहीर केला आहे. असे असले तरी व्यापाऱ्यांकडून ३३०० रुपये दर शेतकऱ्यांना देण्यात आला.

भिवापूर, नागपूर  : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात सोयाबीन खरेदीला सुरवात करण्यात आली. पहिल्या दिवशी शेतकऱ्यांनी ५५० क्विंटल सोयाबीन विक्रीस आणले होते. शासनाने सोयाबीनकरिता ३७२० रुपये हमीभाव जाहीर केला आहे. असे असले तरी व्यापाऱ्यांकडून ३३०० रुपये दर शेतकऱ्यांना देण्यात आला.

बाजार समितीच्या प्रांगणात या हंगामाच्या सोयाबीन खरेदीचा प्रारंभ समितीचे सभापती विठ्ठलराव राऊत यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी समितीचे सचिव रामकृष्ण गोंगल, उपसभापती भाऊराव तलमले, संचालक विजय वराडे, गुलाब घोडेस्वार यांच्यासह सोयाबीन उत्पादक शेतकरी, व्यापारी व अडते उपस्थित होते. आठवड्यातील रविवार व गुरुवार या दोन दिवशी समितीच्या यार्डात सोयाबीन खरेदी केली जाणार असल्याची माहिती सभापती विठ्ठलराव राऊत यांनी दिली.

गत वर्षीच्या तुलनेत तालुक्‍यात यंदा सोयाबीन लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. त्यामुळे सोयाबीनची बाजारात आवक चांगली राहील असा अंदाज होता. परंतु नोव्हेंबरमध्ये पडलेल्या सततच्या पावसाने सोयाबीनच्या उतारीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे बाजारातील आवक प्रभावित होईल, हे निश्‍चित आहे. तालुक्‍यात या वर्षी शेतकऱ्यांनी १८,२६३ हेक्‍टरमध्ये सोयाबीनची लागवड केली; जी गत वर्षीच्या तुलनेत जास्त आहे. कमी पावसामुळे मागील वर्षी व त्याआधीच्या वर्षी कापसाचे पीक समाधानकारक न आल्याने शेतकरी यंदा सोयाबीनकडे वळला. परंतु अतिवृष्टीमुळे सोयाबीननेही त्याचा भ्रमनिरास केल्याचे चित्र असल्याची माहिती समितीचे सचिव गोंगल यांनी दिली. कापूस खरेदी सुरू व्हायला एक महिना अवधी असल्याचेही गोंगल यांनी सांगितले. 


इतर ताज्या घडामोडी
नरनाळा किल्ला पर्यटन विकासासाठी...अकोला  : अकोला जिल्ह्याच्या सर्वसाधारण...
पीक फेरपालटातून रोगांचा प्रादुर्भाव...येत्या हवामान बदलाच्या काळामध्ये कीड आणि रोगांचा...
मंगळवेढ्यात डाळिंबाच्या सौद्यांना...मंगळवेढा, जि. सोलापूर : मंगळवेढा कृषी उत्पन्न...
अकोला जिल्ह्यातील सात गावे झाली ‘...अकोला  ः जिल्ह्यातील सात गावांची राज्य...
वाशीम जिल्ह्यात ७७७ कोटींंची कर्जमुक्ती...वाशीम : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी कृषी...नाशिक : ग्रामीण भागातील गरीब शेतकऱ्यांचे उत्पन्न...
सांगलीत ‘माणगंगा’वर ताब्याच्या...सांगली : आटपाडीतील माणगंगा सहकारी साखर...
सोलापूर जिल्हा नियोजन आराखड्यात ७४.४५...सोलापूर : जिल्ह्याच्या सन २०२०-२०२१ च्या जिल्हा...
सूक्ष्म सिंचन साधनांमुळे आदिवासी शेतकरी...हिंगोली : ‘‘वसंतराव नाईक मराठावाडा कृषी...
मोर्शी येथे ‘कामदार’ कार्यालयाचे उद्‌...अमरावती  ः शेतकरी, कष्टकऱ्यांचे प्रश्‍न...
प्राप्त निधी वेळेत खर्च करा : भुजबळ नाशिक : ‘जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत प्राप्त...
सोलापूरजिल्ह्याच्या ३४९.८७ कोटींच्या...सोलापूर : जिल्ह्यासाठी २०२०-२१ या आर्थिक...
खानदेशात रब्बीचे क्षेत्र दुप्पटजळगाव ः खानदेशात रब्बी हंगामाची स्थिती...
वाघाच्या बंदोबस्तासाठी गावकऱ्यांचा...भंडारा  ः वाघाच्या दहशतीमुळे शेतीकामे...
मराठवाड्यातील पाणीसाठ्यात झपाट्याने घटऔरंगाबाद : ऑक्‍टोबरमध्ये हिटऐवजी पावसाचे आगमन...
'युरियावरील लिकिंग रोखा'अंमळनेर, जि. जळगाव  ः सध्या रब्बी हंगाम...
थकीत ऊसबिलाप्रश्नी नांदेडमध्ये ...नांदेड ः परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील...
संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी भाजपचा...कोल्हापूर  ः महाविकास आघाडीने जाहीर केलेली...
सीताफळ लागवडीची संपूर्ण माहिती शासनाने...अकोला  ः सीताफळ लागवडीची संपूर्ण माहिती...
केंद्र सरकारकडे प्रलंबित प्रश्नांच्या ...मुंबई  ः ‘‘महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न...