बेलखेडा होणार संत्रा उत्पादक गाव

रिसोड तालुक्यातील दोन हजार लोकसंख्या असलेले बेलखेडा हे गाव संत्रा उत्पादक गाव म्हणून लवकरच ओळखले जाणार आहे. येथील १५० शेतकऱ्यांनी जवळपास चारशे एकरावर संत्रा लागवड केली आहे.
रिसोड, वाशीम, बेलखेडा हे गाव संत्रा उत्पादक गाव म्हणून लवकरच ओळखले जाणार आहे. येथील १५० शेतकऱ्यांनी जवळपास चारशे एकरावर संत्रा लागवड केल्याने ही ओळख निर्माण होणार आहे.
रिसोड, वाशीम, बेलखेडा हे गाव संत्रा उत्पादक गाव म्हणून लवकरच ओळखले जाणार आहे. येथील १५० शेतकऱ्यांनी जवळपास चारशे एकरावर संत्रा लागवड केल्याने ही ओळख निर्माण होणार आहे.

रिसोड, जि. वाशीम ः तालुक्यातील दोन हजार लोकसंख्या असलेले बेलखेडा हे गाव संत्रा उत्पादक गाव म्हणून लवकरच ओळखले जाणार आहे. येथील १५० शेतकऱ्यांनी जवळपास चारशे एकरावर संत्रा लागवड केल्याने ही ओळख निर्माण होणार आहे. पैनगंगा नदीच्या तीरावर असलेल्या बेलखेडा गावची जमीन अतिशय सुपीक समजली जाते. सिंचनाची भरपूर सुविधा असल्याने पुर्वीपासूनच या गावात ४० ते ५० शेतकरी संत्र्याचे उत्पादन घेत होते. त्यांना चांगले उत्पन्न मिळाल्यामुळे तसेच सोयाबीन ,उडीद, मूग, तूर, ज्वारी या पिकांचा अनुभव तितकासा चांगला येत नसल्याने शेतकरी फळबागेकडे वळत आहेत. येथील शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत व जुन्या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे अनुकरण करत यावर्षी २० हजार नवीन संत्रा कलमांची लागवड करण्यात आली. आता या गावात मिळून सुमारे १५० शेतकऱ्यांचा जवळपास चारशे एकरावर संत्रा होत आहे.   सुरुवातीच्या काळात काही वर्षे या फळबागेत आंतरपीकही घेता येत असल्याने यंदा अनेकांनी पिकांची लागवड केली आहे. शेतकऱ्यांना तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना, एमआरईजीएस योजनेमार्फत लाभ मिळत आहे. तसेच ठिबक सिंचन संचासाठी योजनेचा लाभ सर्व शेतकऱ्यांना मिळत आहे. त्यामुळे या गावातील शेतकऱ्यांना संत्रा लागवडीसाठी पाठबळ मिळत आहे. नवीन लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना ऋषी महाराज संत्रा उत्पादक स्वयंसहायता गटाचे तालुका अध्यक्ष डॉ. रामचंद्र देवडे, जगदीश देवडे यांचे मार्गदर्शन मिळत आहे. करडा कृषी विज्ञान केंद्रामार्फत वेळोवेळी प्रशिक्षण शिबिरे घेऊन मार्गदर्शन दिल्या जात आहे.    प्रतिक्रिया... माझ्याकडे चार एकर संत्रा असून मागील वीस वर्षापासून संत्र्याचे उत्पादन घेत आहोत. संत्र्यामध्ये सोयाबीन, हरभरा ही मिश्र पिकेही घेता येतात. दरवर्षी संत्र्यापासून पाच ते आठ लाख रुपयाचे उत्पन्न मिळते आहे. मागील वीस वर्षापासून वैद्यकीय व्यवसाय सोडून शेती करीत आहे.  - डॉ. रामचंद्र देवडे, अध्यक्ष, ऋषी महाराज संत्रा उत्पादक स्वंय सहायता गट, बेलखेडा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com