agriculture news in Marathi Belkheda will be a Orange producers villege Maharashtra | Page 2 ||| Agrowon

बेलखेडा होणार संत्रा उत्पादक गाव

टीम अॅग्रोवन
शनिवार, 11 जुलै 2020

रिसोड तालुक्यातील दोन हजार लोकसंख्या असलेले बेलखेडा हे गाव संत्रा उत्पादक गाव म्हणून लवकरच ओळखले जाणार आहे. येथील १५० शेतकऱ्यांनी जवळपास चारशे एकरावर संत्रा लागवड केली आहे.

रिसोड, जि. वाशीम ः तालुक्यातील दोन हजार लोकसंख्या असलेले बेलखेडा हे गाव संत्रा उत्पादक गाव म्हणून लवकरच ओळखले जाणार आहे. येथील १५० शेतकऱ्यांनी जवळपास चारशे एकरावर संत्रा लागवड केल्याने ही ओळख निर्माण होणार आहे.

पैनगंगा नदीच्या तीरावर असलेल्या बेलखेडा गावची जमीन अतिशय सुपीक समजली जाते. सिंचनाची भरपूर सुविधा असल्याने पुर्वीपासूनच या गावात ४० ते ५० शेतकरी संत्र्याचे उत्पादन घेत होते. त्यांना चांगले उत्पन्न मिळाल्यामुळे तसेच सोयाबीन ,उडीद, मूग, तूर, ज्वारी या पिकांचा अनुभव तितकासा चांगला येत नसल्याने शेतकरी फळबागेकडे वळत आहेत.

येथील शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत व जुन्या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे अनुकरण करत यावर्षी २० हजार नवीन संत्रा कलमांची लागवड करण्यात आली. आता या गावात मिळून सुमारे १५० शेतकऱ्यांचा जवळपास चारशे एकरावर संत्रा होत आहे.  

सुरुवातीच्या काळात काही वर्षे या फळबागेत आंतरपीकही घेता येत असल्याने यंदा अनेकांनी पिकांची लागवड केली आहे. शेतकऱ्यांना तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना, एमआरईजीएस योजनेमार्फत लाभ मिळत आहे. तसेच ठिबक सिंचन संचासाठी योजनेचा लाभ सर्व शेतकऱ्यांना मिळत आहे. त्यामुळे या गावातील शेतकऱ्यांना संत्रा लागवडीसाठी पाठबळ मिळत आहे.

नवीन लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना ऋषी महाराज संत्रा उत्पादक स्वयंसहायता गटाचे तालुका अध्यक्ष डॉ. रामचंद्र देवडे, जगदीश देवडे यांचे मार्गदर्शन मिळत आहे. करडा कृषी विज्ञान केंद्रामार्फत वेळोवेळी प्रशिक्षण शिबिरे घेऊन मार्गदर्शन दिल्या जात आहे.   

प्रतिक्रिया...
माझ्याकडे चार एकर संत्रा असून मागील वीस वर्षापासून संत्र्याचे उत्पादन घेत आहोत. संत्र्यामध्ये सोयाबीन, हरभरा ही मिश्र पिकेही घेता येतात. दरवर्षी संत्र्यापासून पाच ते आठ लाख रुपयाचे उत्पन्न मिळते आहे. मागील वीस वर्षापासून वैद्यकीय व्यवसाय सोडून शेती करीत आहे. 
- डॉ. रामचंद्र देवडे, अध्यक्ष, ऋषी महाराज संत्रा उत्पादक स्वंय सहायता गट, बेलखेडा

 


इतर अॅग्रो विशेष
आपत्कालीन परिस्थितीत राज्य सरकारांसोबत...मुंबई : आपत्कालीन परिस्थितीत केंद्र सरकार राज्य...
कीडनाशकांवर बंदीबाबत अभ्यासच झालेला नाहीपुणे: कृषी रसायन क्षेत्रात काही कीडनाशकांवर...
जालन्यात रेशीम कोषांची उलाढाल ६६...जालना: येथील रेशीम कोष खरेदी बाजारपेठेची यंदाच्या...
कलिंगड, भातशेतीसोबत ब्रॉयलर पक्षांची...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पेंडूर कनकवाडी येथील दीपक...
दूध आंदोलनाची पुढील दिशा आज ठरणारनगर ः दुधाला प्रतिलिटर तीस रुपये दर मिळावा आणि...
पॉवर टीलर आयातीवर निर्बंधपुणे: भारत-चीन वादाचा फटका आता पॉवर टीलर...
नगर जिल्ह्यात तेलकट डागांमुळे डाळिंब...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा छोटी तसेच तोडणीला...
शेळीपालन, श्‍वान, देशी कोंबडीपालनातून...शेळीपालन, मग श्‍वानपालन व आता देशी कोंबडीपालन अशी...
राज्यात ठिकठिकाणी पावसाच्या हलक्या सरीपुणे ः  कोकण, मध्य महाराष्ट्र, खानदेश,...
लक्ष वळविण्याची राजकीय खेळी!एखाद्या महासंकटाचा राजकीय लाभ कसा उठवायचा हे...
जो पारदर्शी तोच टिकेलकेंद्र सरकारने ‘एक देश एक बाजार’ योजनेची घोषणा...
आदिवासी महामंडळातर्फे ४९ लाख क्विंटल...नाशिक : कोरोनाच्या संकट काळात आदिवासी विकास...
संशोधनासाठी मोसंबी वाणांचे जतन फायदेशीर...बदनापूर, जि. जालना : मोसंबी फळपिकांच्या विविध...
परभणी जिल्ह्यात कापसाची ३६ लाख क्विंटल...परभणी ः कोरोना साथीमुळे लांबत गेलेला परभणी...
अल्पभुधारक शेतकऱ्यांच्या सबलीकरणावर भर नवी दिल्ली: शेती क्षेत्राला चालना देण्यासाठी...
रानभाज्या विक्रीतून रोजगार निर्मितीचा...नाशिक: राज्यातील आदिवासी भागात नैसर्गिक पद्धतीने...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा शिडकावा पुणे ः पावसाचा जोर कमी झाल्याने कोकण, मध्य...
चीनकडून बियाणे दहशतवादाचा धोका पुणेः देशातील बियाणे वारसा आणि बीजोत्पादन उद्योग...
बेकायदा ‘एचटीबीटी’मुळे तीनशे कोटींचा...पुणे : बेकायदेशीर तणनाशक सहणशील (एचटीबीटी) कापूस...
कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरला कोल्हापूर: जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे....