Agriculture news in Marathi, Beneficial for citrus dryland: Agriculture Minister Bonde | Agrowon

सीताफळ कोरडवाहू क्षेत्रासाठी लाभदायी ः कृषिमंत्री बोंडे
टीम अॅग्रोवन
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

अमरावती ः सीताफळ हे कोरडवाहू क्षेत्राला तारून नेणारे आहे. त्यामुळे सीताफळाच्या विविध वाणांवर संशोधनासह प्रक्रिया, साठवणूक व विपणनासाठी संशोधन केंद्राने पूरक प्रयत्न करावे, असे निर्देश कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिले.

अमरावती ः सीताफळ हे कोरडवाहू क्षेत्राला तारून नेणारे आहे. त्यामुळे सीताफळाच्या विविध वाणांवर संशोधनासह प्रक्रिया, साठवणूक व विपणनासाठी संशोधन केंद्राने पूरक प्रयत्न करावे, असे निर्देश कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिले.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या सीताफळ संशोधन केंद्राचे उद्‍घाटनानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कुलगुरू डॉ. विलास भाले, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य मोरेश्‍वर वानखडे, संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, सीताफळ उत्पादक संघाचे अध्यक्ष श्‍याम गट्टाणी, गजानन कृपाळ, केंद्रप्रमुख एस. एस. निचळ, फळशास्त्र विभागप्रमुख डॉ. शशांक भराड यांची या वेळी उपस्थिती होती.  

कृषिमंत्री पुढे म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांनी कमी उत्पादन खर्च, कमी पाण्यात येणाऱ्या व चांगले उत्पन्न देणाऱ्या पिकांकडे वळले पाहिजे. सीताफळ हे कोरडवाहू क्षेत्रात येणारे व चांगले उत्पन्न देणारे पीक आहे. त्यावर प्रक्रिया करून गराची साठवणूक करता येणे शक्‍य आहे. विविध खाद्यपदार्थांमध्ये सीताफळ गराला मागणी आहे. त्यामुळे केंद्राने वाण संशोधनासह प्रक्रिया व विपणनासाठी तंत्रज्ञान विकसीत करावे.’’

सीताफळ हे एकरी दीड लाख रुपये उत्पन्न देणारे पीक असून, त्यावरील प्रक्रिया व्यवसायातून रोजगारही निर्माण होईल. त्यामुळे जिल्ह्यात सीताफळ हब निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, असे डॉ. भाले यांनी सांगितले. 

फलोत्पादनाचा वृद्धिदर गत चार वर्षात ५.४ टक्‍क्‍यांपर्यंत वाढला असून, सीताफळाचा वृद्धीदर २३ टक्‍क्‍यांपर्यंत पोचला आहे. भारतातील सीताफळ उत्पादनापैकी सुमारे ३१ टक्‍के उत्पादन महाराष्ट्रात होते. केंद्राने तीन हजार झाडांची लागवड केली असून, काढणीपश्‍चात तंत्रज्ञान, गर साठवणूक, छाटणी तंत्रज्ञान विकसीत केले आहे, असे डॉ. निचळ यांनी सांगितले. मत्स्यविक्रीसाठी मत्स्यगंधा वाहनाचे वाटपही या वेळी करण्यात आले.

इतर बातम्या
थंडीचे आगमन लांबणारपुणे   : राज्यात मॉन्सूनोत्तर पाऊस पडत...
पुणे जिल्हयात हलक्या ते मध्यम पावसाची...पुणे : गेल्या दोन दिवसांपासून पावसासाठी पोषक...
मंगळ, चंद्रसदृश मातीमध्ये पिकांचे...नासा या अमेरिकन अवकाश संशोधन संस्थेने चंद्र आणि...
पुणे जिल्ह्यात तीन लाख हेक्टरवर रब्बी...पुणे : मॉन्सूनच्या अंतिम टप्प्यातील पावसाने...
नगर जिल्हा परिषदेमध्ये दूरध्वनीवरील...नगर  : पाणी येत नाही. शिक्षक शाळेत उशिरा...
विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारतोफा...मुंबई : चौदाव्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी...
घाटशीळ पारगाव प्रकल्प कोरडानगर : जिल्ह्यात यंदा पावसाळा संपत आला तरी अजून...
सातारा जिल्ह्यात सर्वदूर पाऊससातारा : जिल्ह्यात शुक्रवारी (ता.१८) सर्वदूर...
उमेदवारी देऊन केलेली चूक सुधारा : पवारसातारा : ‘‘वरुणराजानेही आपल्याला आशीर्वाद दिले...
राज्यात सुगीची वेळ, अन्‌ पावसाचा खेळपुणे  : अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र...
मराठवाड्यातील ३३५ मंडळांत पाऊस; खरीप...औरंगाबाद, परभणी : परतीच्या पावसाने मराठवाड्यातील...
काकडा परिसरात सोयाबीन काढणीच्या...काकडा, अमरावती ः परिसरात सोयाबीन...
अकोला येथे पावसाळी वातावरणाने...अकोला ः गेल्या २४ तासांपासून या भागात...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वावडिंग खरेदी सुरू सिंधुदुर्ग  ः बहुउपयोगी वावडिंग खरेदीला...
पट्टणकोडोलीला ‘इट्टल-बिरोबाच्या नावानं...पट्टणकोडोली, जि. कोल्हापूर  : ‘इट्टल-...
विश्रांतीनंतर सोलापुरात पुन्हा सर्वदूर...सोलापूर  ः गेल्या काही दिवसांच्या...
शेतकरी, जनतेच्या प्रश्नांची उत्तरे...नगर  : राज्यात पाच वर्षांत १६ हजार शेतकरी...
महायुतीला ऐतिहासिक विजय मिळेल ः...मुंबई ः केंद्र आणि महाराष्ट्रातील भाजप-शिवसेना...
आपण विजयाचा जल्लोष साजरा करू ः...नागपूर : मतदानाचा दिवस युद्धदिन समजून...
भाजप-शिवसेनेने पाच वर्षे  फक्त थापा...मुंबई : पाच वर्षे ज्यांनी विविध आश्वासने...