agriculture news in marathi, beneficiaries waiting for grant, jalgaon, maharashtra | Page 2 ||| Agrowon

जळगावात अवजारे, फवारणी पंप योजनांचे लाभार्थी अनुदानाच्या प्रतीक्षेत
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

जळगाव  ः तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेची कार्यवाही जलद झाली, परंतु नंतर लाभार्थींच्या याद्या गट विकास अधिकारी कार्यालयांकडून जळगाव जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडे वेळेत न पोचल्याने अवजारे, फवारणी पंप आदी योजनांच्या लाभार्थींना अनुदानाची प्रतीक्षा आहे. 

जळगाव  ः तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेची कार्यवाही जलद झाली, परंतु नंतर लाभार्थींच्या याद्या गट विकास अधिकारी कार्यालयांकडून जळगाव जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडे वेळेत न पोचल्याने अवजारे, फवारणी पंप आदी योजनांच्या लाभार्थींना अनुदानाची प्रतीक्षा आहे. 

कृषी विभागातर्फे थेट अनुदान (डीबीटी) तत्त्वावर पलटी नांगर, एचडीपीई पाईप, फवारणी पंप या योजनांबाबत कार्यवाही केली जाते. त्यासाठी स्वनिधीतून तरतूद केली जाते. यंदा निवडणुक जाहीर होण्यापूर्वी कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्व योजनांच्या तांत्रिक मान्यतेची कार्यवाही केली. तसेच सर्वसाधारण सभेत सर्व माहिती सादर करून इतर मंजुरीही घेतल्या. प्रशासकीय मान्यतेची कार्यवाही पूर्ण केली. या योजनांबाबत तालुका स्तरावरून गटविकास अधिकारी कार्यालयातर्फे लाभार्थींच्या अंतिम याद्या मागविल्या जातात.

यात ज्या याद्या आचारसंहिता लागू होण्यापूर्वी कृषी समितीकडे प्राप्त झाल्या, त्यांना मंजुरी देण्यात येऊन संबंधित लाभार्थींना अनुदान देण्यास सुरवात झाली.  फवारणीच्या बॅटरीचलित व हातपंपासाठी सात लाख, रोटाव्हेटरसाठी ४५ लाख, एचडीपीई पाईपसाठी ४० लाख रुपये निधीची तरतूद केली आहे. पलटी नांगरसाठी १३० लाभार्थींना अनुदान द्यायचे आहे. फवारणीच्या बॅटरी व इतर पंपांसाठी जादा अर्ज तालुकास्तरावर आले. फवारणीपंपासाठी निम्म्या लाभार्थींची निवड होऊन अनुदान वाटपाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.  पलटी नांगर, रोटाव्हेटर, एचडीपीई पाइपसाठी ३० टक्के लाभार्थींच्या याद्या अंतिम करून अनुदान वितरणाची कार्यवाही सुरू झाली. आता निवडणुका आटोपल्यानंतर लाभार्थी निवड व अनुदान वितरणाची कार्यवाही केली जाईल, असे सांगण्यात आले.

इतर बातम्या
नांदेड : पावसात भिजल्यामुळे पिकांचे...नांदेड : गेल्या आठवड्यात नांदेड, परभणी, हिंगोली...
मेहकर तालुक्यात कृषी कर्मचाऱ्यांनी...अकोला ः मेहकर तालुक्यात यावर्षी समाधानकारक...
खामगावात टेक्सटाइल पार्क होणारच ः...बुलडाणा  ः तरुणांना रोजगार उपलब्ध करून...
खारपाण पट्ट्यात रब्बीत हजार हेक्टरवर...अकोला  ः जिल्ह्यात असलेल्या खारपाण पट्ट्यात...
जळगाव जिल्ह्यात हमीभाव खरेदी केंद्रांत...जळगाव  ः जिल्ह्यात शासकीय हमीभाव कडधान्य व...
वाघाच्या दहशतीखालील गावे टाकणार...वर्धा  ः कारंजा घाडगे तालुक्‍यातील अनेक...
शेतकऱ्यांना न्याय मिळण्याची आशा धूसर :...‘लोकांच्या डोळ्यांवर धर्मांधतेची झापड चढविण्यात...
वीजग्राहकांच्या समस्यांबाबत भूमिका...मुंबई ः राज्यातील महावितरण कंपनीच्या...
सोलापुरातील ६९५ दूध संस्थांना नोटिसासोलापूर : सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाला दूध...
एचएएल कर्मचाऱ्यांच्या देशव्यापी बेमुदत...नाशिक  : प्रलंबित वेतन करारासह इतर...
आटपाडी तालुका पाऊस, ‘टेंभू’मुळे पाणीदारसांगली : आटपाडी तालुक्यात टेंभूच्या योजनेचे...
सांगलीतील निवडणूक प्रचारात शेती प्रश्‍न...सांगली: विधानसभा निवडणुकीचा प्रचार चांगलाच रंगू...
कर्जफेडीची क्षमता देणाऱ्या धोरणांची गरजविधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये राजकीय...
महामंडळाने ‘उद्योग’ बंद केले तरच विकासराज्यातील कृषी उद्योगाला चालना देण्यासाठी ‘...
हजारो नाशिककरांनी चाखली रानभाज्यांची चवनाशिक : आदिवासी भागात उपलब्ध होणाऱ्या विषमुक्त...
`मी काय केले, हे विचारणाऱ्या अमित...कन्नड जि. औरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी व...
नाशिक जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर...नाशिक : जिल्ह्यासह बागलाण तालुक्यात अतिवृष्टीमुळे...
जालन्यात मूग खरेदी केंद्रांकडे...जालना : हमीदराने शेतीमाल खरेदीसाठी जिल्ह्यात...
नवरात्रोत्सवात पुणे बाजारसमितीत फुलांची...पुणे  ः नवरात्र आणि दसऱ्याला पुणे बाजार...
वैविध्यपूर्ण विचारांनी विद्यार्थी...परभणी : ‘‘विद्यार्थ्‍यांची सांस्‍कृतिक, भाषिक व...