agriculture news in marathi, beneficiary part may waived of solar agri pump scheme, mumbai, maharashtra | Agrowon

सौर कृषिपंप योजनेतील लाभार्थी हिस्सा माफ करण्याचे विचाराधीन : उर्जामंत्री बावनकुळे
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 20 जून 2019

मुंबई : मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत लाभार्थ्याला १० टक्के, तर मागासवर्गीय व आदिवासी लाभार्थ्याला ५ टक्के रक्कम भरावी लागते. ही रक्कम माफ करण्यासाठी मंत्रिमंडळात जावे लागणार असून, त्यानंतर शासन या मागणीवर योग्य विचार करू शकते, असे आश्वासन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिले.

मुंबई : मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत लाभार्थ्याला १० टक्के, तर मागासवर्गीय व आदिवासी लाभार्थ्याला ५ टक्के रक्कम भरावी लागते. ही रक्कम माफ करण्यासाठी मंत्रिमंडळात जावे लागणार असून, त्यानंतर शासन या मागणीवर योग्य विचार करू शकते, असे आश्वासन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिले.

काँग्रेसचे आमदार नसीम खान यांनी हा प्रश्न विचारला होता. या योजनेसाठी लागणारे अर्ज ऑनलाइन भरावे लागतात. गरीब शेतकरी फॉर्म भरू शकत नाही. राज्यात दुष्काळ आहे, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमधील लाभार्थ्यांचा हिस्सा माफ करावा, अशी मागणी त्यांनी केली. यावर उत्तर देताना ऊर्जामंत्री बावनकुळे म्हणाले, की अडीच लाखांचा पंप शेतकऱ्यांना १० टक्के व ५ टक्के हिस्सा घेऊन नि:शुल्क देण्यात येत आहेत. संपूर्ण रक्कम माफ करणे सयुक्तिक नाही. त्यासाठी मंत्रिमंडळाची मान्यता घ्यावी लागेल.

भाजपचे ज्येष्ठ आमदार एकनाथ खडसे यांनी सांगितले, की ३ व ४ अश्वशक्तीचे पंप वापरणारे शेतकरी कमी आहेत. त्यामुळे ७ व १० अश्वशक्तीचे पंप देण्याचा निर्णय घेणार का, यावर ऊर्जामंत्र्यांनी सांगितले, की ३ व ५ अश्वशक्तीसाठी सौर कृषिपंप देण्याचा निर्णय झाला असून, ७ व १० अश्वशक्तीसाठी पारंपरिक वीजजोडणी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उच्चदाब वीज वितरण प्रणाली या योजनेत प्रत्येक शेतकऱ्याला एक ट्रान्सफॉर्मर देण्यात येणार आहे. ज्यांना सौरऊर्जेची जोडणी हवी त्यांना ती देण्यात येईल, तर ज्यांना पारंपरिक वीजजोडणी पाहिजे त्यांना तशी जोडणी मिळणार आहे, असेही ऊर्जामंत्री म्हणाले.

शेतकऱ्यांना १० तास वीज देण्यासाठी जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांची एक समिती नेमण्यात आली आहे. त्या-त्या जिल्ह्याची स्थिती पाहून ही समिती निर्णय घेते, समितीने शिफारस केल्यास संबंधित भागाला १० तास वीज देता येते, असे एका प्रश्नाच्या उत्तरात बोलताना ऊर्जामंत्र्यांनी सांगितले. एचव्हीडीएस योजनेस मिळणाऱ्या ट्रान्सफॉर्मरची मागणी जास्त आहे, पण पुरवठा कमी असल्याने जोडणीला वेळ लागत आहे. असे असले तरी पैसे भरून प्रलंबित असलेल्या वीजजोडण्या डिसेंबर ते मार्च २०२० याकाळात पूर्ण केल्या जातील, असेही ऊर्जामंत्री म्हणाले.

सौर कृषिपंपाच्या जोडणीसाठी भूजल सर्वेक्षण यंत्रणेचा अहवाल आवश्यक आहे. कारण ७० ते १०० मीटर अंतरावर पाणी असेल तिथेच ही जोडणी देता येते, असे सांगताना ऊर्जामंत्री म्हणाले, की कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातून सौर कृषिपंपासाठी नवीन अर्जच येत नाहीत, पैसे भरून प्रलंबित असलेले ६०७ शेतकऱ्यांना जोडणी लवकरच देण्यात येईल. या प्रश्नाच्या चर्चेत सहभागी होणाऱ्या आमदारांची संख्या मोठी होती. त्यामुळे उपाध्यक्षांनी या प्रश्नावर आपल्या दालनात बैठक घेऊ व सर्वांचे समाधान करू, असे आश्वासन सभागृहात दिले.
 

इतर अॅग्रो विशेष
डोणगावात होणार खजूर लागवडअकोला ः पारंपरिक पिकांना पर्याय शोधण्यासाठी...
रक्तक्षय दूर करण्यासाठी लोहयुक्त तांदूळनाशिक : दैनंदिन आहारातून अत्यल्प प्रमाणात लोह...
असंमत बियाणे लागवडीला बोंडअळी कारणीभूत...नवी दिल्ली : देशात २०१८ मध्ये गुलाबी...
दुष्काळामुळे द्यावा लागणार पाणी...पुणे ः सततच्या दुष्काळामुळे आता पाणी...
पीक पोषणात महत्त्वाची अन्नद्रव्ये पिकांच्या सुदृढ वाढीसाठी १८ अन्नद्रव्यांची...
मिल्क केक बनविण्याची प्रक्रियामिल्क केक हा दिसायला कलाकंदप्रमाणे असला तरी...
मराठवाड्यात ठिकठिकाणी हलक्या ते जोरदार...पुणे ः राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार...
सोयाबीनवरील कीडीची ओळख सोयाबीन हे राज्यातील महत्त्वाचे पीक असून, त्यावर...
नांदेड जिल्ह्यात अन्नधान्य पिकांच्या...नांदेड : जिल्ह्यात गुरुवारपर्यंत (ता. १८) ६ लाख...
एकाच गावातील ७५० एकरांत ७५०० कामगंध...जालना : गतवर्षी नियंत्रण मिळविलं म्हणून कपाशीवरील...
जलसंधारणाचा खामगाव पॅटर्न देशभरात जाणारअकोला ः राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना त्यासाठी...
कृत्रीम शीतपेयांना शोधला कोकणी नैसर्गिक...कोकणातील निसर्गरम्य कोळथर (ता. दापोली, जि....
फुलांनी आणला आयुष्यात बहर, अॅग्रोवनची...पुणे जिल्ह्यात रुई येथील सुहास लावंड यांनी...
जलव्यवस्थापनातील हुशारीतून फुलतेय ...दुष्काळाशी लढताना औरंगाबाद जिल्ह्यातील गाढेजळगाव...
दुष्काळातही कडवंची गावच्या अर्थकारणाची...भूगर्भीय सर्वेक्षण आधारित पाणलोटाची कामे, मृद...
मातीची सुपीकता टिकविणे आव्हानात्मक: डॉ...कोल्हापूर : कोल्हापूर विभागात मातीची सुपीकता...
साखर कारखान्यांना कर्ज न देणाऱ्या...मुंबई: आगामी हंगामासाठी साखर कारखान्यांना...
कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्याचा करारअकोला ः  केंद्र शासनाची पंतप्रधान कौशल्य...
जीवनावश्‍यक वस्तू कायद्यावर प्रश्‍नचिन्हनवी दिल्ली: जीवनावश्‍यक वस्तू कायद्याची आवश्यकता...
जनतेचा पैसा जनतेच्याच भल्यासाठीतत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९ जुलै...