कोरोना संकटात टाळेबंदीमुळे राज्याची तिजोरी रिकामी झाली असली तरी कृषी व सलग्न क्षेत्रांनी ११.७ टक्
ताज्या घडामोडी
नविन विहीर योजनेतून सोडतीद्वारे लाभार्थी निवड
औरंगाबाद: राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत अनु.जाती/जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना नविन विहीर योजनेतून सोडतीद्वारे लाभार्थी निवड करण्यात आली.
औरंगाबाद: राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत अनु.जाती/जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना नविन विहीर योजनेतून सोडतीद्वारे लाभार्थी निवड करण्यात आली. अनुसूचित जाती प्रवर्गातील ४१ व अनुसूचित जमाती प्रवर्गातील ४२ लाभार्थ्यांची निवड करून यादी प्रसिद्ध करण्यात आली.
राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या निधीतून २०२०-२१ मध्ये अनुसूचित जाती / जमाती प्रवर्गाच्या शेतकऱ्यांना अनुक्रमे १ कोटी १० लाख ४४ हजार रुपये व १ कोटी १२ लाख ९५ हजार रुपये नियतव्यय मंजूर केले होते. सोडतीद्वारे ज्या लाभार्थ्यांची निवड झाली, त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर तात्पुरत्या स्वरूपात निवड झाल्याबाबत संदेश पाठवून कळविण्यात आले आहे.
निवड झालेल्या लाभार्थ्यांनी यादी प्रसिद्ध झाल्यापासून सात दिवसांत (ता.२३) मार्गदर्शक सूचनांनुसार नमुद कागदपत्रे महाडिबिटी प्रणालीवर (संकेतस्थळ hh://mahadbtmahait.gov.in) `कागदपत्रे अपलोड करा` या टॅबवर जाऊन अपलोड करणे बंधनकारक आहे. डिजिटल ७/१२ ,डिजिटल ८ अ, जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, ग्रामसभेचा ठराव, स्वसाक्षांकित केलेले कुटुंब प्रमाणपत्र, अशी एकूण सहा कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.
संकेतस्थळावर शेतकरी योजना या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर वापरकर्ता आयडी व पासवर्ड व त्याखालील प्रतिमेत दर्शविलेले शब्द भरून लॉगीन करून आवश्यक असणारी कागदपत्रे अपलोड करावीत. पात्र लाभार्थींची निवड अंतिम करण्यात येईल. कामाची पूर्वसंमती देण्यात येईल.
अन्यथा, निवड रद्द होणार
विहित कालमर्यादेत आवश्यक कागदपत्रे अपलोड न केल्यास निवड रद्द होऊन प्रतीक्षा यादीतील पुढील लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल. ताबडतोब कागदपत्रे अपलोड करून लाभ घ्यावा, अडचण येत असल्यास संबंधित पंचायत समितीचे कृषी अधिकारी / विस्तार अधिकारी (कृषी ) यांचे मार्गदर्शन घ्यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी सभापती एल. जी. गायकवाड यांनी केले.
- 1 of 1065
- ››