Agriculture news in marathi Beneficiary selection through draw from new well scheme | Agrowon

नविन विहीर योजनेतून सोडतीद्वारे लाभार्थी निवड

टीम अॅग्रोवन
बुधवार, 24 फेब्रुवारी 2021

औरंगाबाद: राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत अनु.जाती/जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना नविन विहीर योजनेतून सोडतीद्वारे लाभार्थी निवड करण्यात आली.

औरंगाबाद: राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत अनु.जाती/जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना नविन विहीर योजनेतून सोडतीद्वारे लाभार्थी निवड करण्यात आली. अनुसूचित जाती प्रवर्गातील ४१ व अनुसूचित जमाती प्रवर्गातील ४२ लाभार्थ्यांची निवड करून यादी प्रसिद्ध करण्यात आली.

राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या निधीतून २०२०-२१ मध्ये अनुसूचित जाती / जमाती प्रवर्गाच्या शेतकऱ्यांना अनुक्रमे १ कोटी १० लाख ४४ हजार रुपये व १ कोटी १२ लाख ९५ हजार रुपये नियतव्यय मंजूर केले होते.  सोडतीद्वारे ज्या लाभार्थ्यांची निवड झाली, त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर तात्पुरत्या स्वरूपात निवड झाल्याबाबत संदेश पाठवून कळविण्यात आले आहे.

निवड झालेल्या लाभार्थ्यांनी यादी प्रसिद्ध झाल्यापासून सात दिवसांत (ता.२३) मार्गदर्शक सूचनांनुसार नमुद कागदपत्रे महाडिबिटी प्रणालीवर (संकेतस्थळ hh://mahadbtmahait.gov.in) `कागदपत्रे अपलोड करा` या टॅबवर जाऊन अपलोड करणे बंधनकारक आहे. डिजिटल ७/१२ ,डिजिटल ८ अ, जात प्रमाणपत्र, उत्पन्न‍ प्रमाणपत्र, ग्रामसभेचा ठराव, स्वसाक्षांकित केलेले कुटुंब प्रमाणपत्र, अशी एकूण सहा कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.

संकेतस्थळावर शेतकरी योजना या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर वापरकर्ता आयडी व पासवर्ड व त्याखालील प्रतिमेत दर्शविलेले शब्द भरून लॉगीन करून आवश्यक असणारी कागदपत्रे अपलोड करावीत. पात्र लाभार्थींची निवड अंतिम करण्यात येईल. कामाची पूर्वसंमती देण्यात येईल. 

अन्यथा, निवड रद्द होणार

विहित कालमर्यादेत आवश्यक कागदपत्रे अपलोड न केल्यास निवड रद्द होऊन प्रतीक्षा यादीतील पुढील  लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल. ताबडतोब कागदपत्रे अपलोड करून लाभ घ्यावा, अडचण येत असल्यास संबंधित पंचायत समितीचे कृषी अधिकारी / विस्तार अधिकारी (कृषी ) यांचे मार्गदर्शन घ्यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी सभापती एल. जी. गायकवाड यांनी केले.


इतर बातम्या
दूध विक्री कमिशनवर नियंत्रण आणा पुणे : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना...
किमान तापमानात वाढ पुणे ः मध्य महाराष्ट्राच्या परिसरात चक्रीय...
देशी कोंबडी पिलांच्या मागणीत ७० टक्के...नगर ः बर्ड फ्लूची लाट ओसरली आहे. मात्र तरीही...
‘पीएम-किसान’चे काम करण्यास महसूलचा नकार अकोला ः पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना...
अकोला : अवकाळी, गारपीटग्रस्तांना १७...अकोला ः गेल्या वर्षात जिल्ह्यात फेब्रुवारी ते मे...
खरिपात सोयाबीन पेरणीवेळी जोड ओळ पद्धत...जालना ः ‘‘येणाऱ्या खरीप हंगामात सोयाबीन पिकात जोड...
अकोला परिमंडळात ४८ तासांत ३४० चोऱ्या उघडअकोला ः अकोला परिमंडळात वीजचोरीच्या घटनांमध्ये...
मराठवाडा रेशीम शेतीचा केंद्र बिंदू ः डॉ...जालना : ‘‘हवामान बदलानुसार योग्य त्या पिकांच्या...
‘पोकरा’मध्ये कामाची प्रक्रिया आता ऑनलाइनमुंबई/औरंगाबाद : नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
राज्यात गहू क्षेत्रात ३८ टक्क्यांनी वाढनगर ः परतीच्या पावसाने पाण्याची बऱ्यापैकी...
‘महाबीज’चे २१० हेक्टरवर सोयाबीन...परभणी ः ‘महाबीज’च्या परभणी विभागांतर्गत सहा...
‘युटोपियन’कडून पाच लाख मेट्रिक टन उसाचे...सोलापूर ः ‘‘यंदा जास्त ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले...
म्हैसाळच्या आवर्तनासाठी पाणी मागणीची...सांगली ः मिरज पूर्व भागासह कवठेमहांकाळ, जत तालुक्...
`सुधारित शिफारशींसाठी शेतकऱ्यांमध्ये...परभणी ः ‘‘सोयाबीन उत्पादकता वाढ तसेच उत्पादन खर्च...
बूथ कमिट्या सक्षम करा : नाना पटोले मुंबई : काँग्रेस पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी सर्व...
प्रत्येक गावांनी पाण्याचे अंदाजपत्रक...पुणे : गावात पडणारा पाऊस व पिकांना लागणारे पाणी...
नेपाळच्या कांदा व्यापाऱ्याला ...नाशिक : जिल्ह्यात शेतमाल विक्री पश्चात...
वीज जोडणी तोडल्यास राज्यभर आंदोलन :...अकोला : आधीच कोरोनामुळे गेले वर्षभर शेतकरी व...
पालखेड उपबाजार आवारात द्राक्ष मण्यांचे...नाशिक : पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीचा...
तीनच दिवसांत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ...नाशिक : सोमवारी ४२३०, बुधवारी ३४८१ आणि गुरुवारी...