गावांत शासकीय योजनांचा लाभ पोचवा : कृषिमंत्री भुसे

Benefit of Government Schemes in Villages : Bhuse, Agriculture Minister
Benefit of Government Schemes in Villages : Bhuse, Agriculture Minister

नाशिक : ‘‘शासकीय योजनांच्या संदर्भात लोकांना कार्यालयांचे हेलपाटे मारायला लावू नका. योजनांचा लाभ पात्र लाभार्थींपर्यंत पोचवा. नेहमीच्या मानसिकतेतून बाहेर पडून गावागावात जाऊन तेथील समस्या जाणून घ्या. त्याचे निराकरण करा. गाव पातळीवरच शासकीय योजनांचा लाभ पोचवा,’’ असे आदेश कृषिमंत्री दादा भुसे यांनी विविध विभागप्रमुखांना दिले.

राज्याच्या कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर भुसे यांनी मतदारसंघात गुरुवार (ता. ९) मालेगाव येथे शासकीय विश्रामगृहावर विविध विभागीय कार्यालयप्रमुखांची आढावा बैठक घेतली. या वेळी ते बोलत होते. 

भुसे म्हणाले, ‘‘महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचे बँक खाते लवकर आधार लिंक करून घ्यावे. पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा आढावा घेऊन त्याचा अहवाल सादर करावा. पात्र लाभार्थी वंचित राहू नये, याची खबरदारी घ्या.’’

तहसीलदार चंद्रजित राजपूत यांनी कर्जमाफी व अवकाळी पाऊस मदतनिधी याविषयी माहिती दिली. शेतकऱ्यांच्या खात्यांवर वर्ग करावयाच्या निधीचे काम अंतिम टप्प्यात असून, उर्वरित काम येत्या दोन ते तीन दिवसांत पूर्ण होईल. अवकाळी पावसामुळे जनावरे मृत झालेल्यांना नुकसानभरपाई धनादेश प्राप्त झाले आहेत. त्याचे वाटप केले जाईल, अशी माहिती राजपूत यांनी दिली. 

प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांनी गेल्या कर्जमाफीचा किती लाभार्थींना लाभ झाला याचा आढावा मांडला. विविध योजनांच्या आढावा बैठकीसाठी प्रांत विजयानंद शर्मा, तहसीलदार चंद्रजित राजपूत, आयुक्त किशोर बोर्डे, गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे आदींसह महसूल, महापालिका, कृषी, वन, उपनिबंधक, जलप्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम आदींसह सर्व विभगांचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

मालेगावचा आदर्श निर्माण करा

सर्व विभागप्रमुखांनी आपापल्या विभागातील विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांची प्रलंबित प्रकरणे, प्रलंबित निधी याविषयी काही अडचणी असल्यास त्यासंबधी मंत्रालय स्तरावरून आवश्यक पाठपुरावा, निधी उपलब्ध करून दिला जाईल. आपल्या तालुक्यात योजनांची यशस्वीपणे अंमलबजावणी करून राज्यापुढे मालेगावचा आदर्श घेऊन जाता येईल, अशी अपेक्षा भुसे यांनी व्यक्त केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com