agriculture news in Marathi benefit of micro irrigation after 7 years Maharashtra | Agrowon

सूक्ष्म सिंचन योजनेचा सात वर्षानंतर पुन्हा लाभ

टीम अॅग्रोवन
बुधवार, 26 फेब्रुवारी 2020

अकोला ः सूक्ष्म सिंचनाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना आता सात वर्षानंतर पुन्हा लाभ मिळू शकणार आहे. राज्य सरकारने पूर्वीच्या धोरणात बदल करीत १० वर्षांची मर्यादा आता सात वर्षांवर आणली आहे. याचा फायदा मोठ्या प्रमाणावर शेतकरी घेऊ शकतील.

अकोला ः सूक्ष्म सिंचनाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना आता सात वर्षानंतर पुन्हा लाभ मिळू शकणार आहे. राज्य सरकारने पूर्वीच्या धोरणात बदल करीत १० वर्षांची मर्यादा आता सात वर्षांवर आणली आहे. याचा फायदा मोठ्या प्रमाणावर शेतकरी घेऊ शकतील.

सन २०१४-१५ पर्यंत सूक्ष्म सिंचन योजना केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन अभियानांतर्गत राबविण्यात येत होती. सन २०१५-१६ पासून सूक्ष्म सिंचन योजना पंतप्रधान कृषी सिंचन योजनेच्या ‘प्रतिथेंब अधिक पीक’ घटकाअंतर्गत राबविण्यात येत आहे. राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन अभियानाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सूक्ष्म सिंचन अनुदानासाठी लाभ घेतलेल्या क्षेत्रावर १० वर्षानंतर पुन्हा लाभ अनुज्ञेय होता.

परंतु, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या ‘प्रतिथेंब अधिक पीक’ घटकाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सात वर्षांच्या कालावधीनंतर अनुदानाचा लाभ अनुज्ञेय केला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसाठीही सात वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्याच क्षेत्रावर पुन्हा लाभ देण्याची बाब विचाराधीन होती. याअनुषंगाने आता सुधारणा करून सात वर्षानंतर शेतकऱ्यांना अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

शेतकऱ्यांना दिलासा
सध्या दुष्काळी परिस्थिती, पाण्याची कमतरता अशी परिस्थिती सर्वत्र आहे. या काळात पाण्याचा काटेकोर वापर करण्याच्या उद्देशाने सूक्ष्म सिंचन पद्धतीवर जोर दिला जात आहे. शेतकरीसुद्धा विविध योजनांमधून सूक्ष्म सिंचन संच खरेदी करतात. बऱ्याच शेतकऱ्यांकडील संच पाच ते सात वर्षात विनाकामाचे होतात. अशा शेतकऱ्यांना या नव्या धोरणामुळे सातव्या वर्षी पुन्हा नवीन संच खरेदीसाठी अनुदानाचे पाठबळ फायदेशीर ठरणार आहे. याबाबत शासनाकडून सोमवारी (ता.२४) संबंधितांना आदेश करणारे परिपत्रक काढण्यात आले.


इतर अॅग्रो विशेष
शेतकरी कंपन्यांचाही ‘ई-नाम’मध्ये समावेश नवी दिल्ली: केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर...
राज्यात उन्हाचा चटका वाढला पुणे: एप्रिल महिना सुरू होताच राज्यात उन्हाच्या...
पिंपळगाव बसवंत बाजार समितीत ३० हजार...नाशिक: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मजुरटंचाई...
कोल्हापुरात तीस हजार ऊस तोडणी कामगार...कोल्हापूर: जिल्ह्यातील सुमारे तीस हजार ऊस तोडणी...
औरंगाबादमध्ये २९ टन मालाची थेट विक्रीकोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर औरंगाबाद शहरात 'शेतकरी...
कोरोनामुळे कृषी पर्यटन व्यवसाय अडचणीत सातारा : कोरोनाच्या संसर्गामुळे दिवसेंदिवस बळी...
संकटावेळी तरी पंतप्रधानांनी गंभीर...मुंबई : देशात कोरोना विषाणूने थैमान घातले असून...
‘कोरोना विरोधात जाणिवेसाठी रविवारी...पुणे : ‘‘कोरोना विरोधात उभारलेल्या लढ्याची...
कोरोनाच्या निदानासाठीच्या ‘मायलॅब'ला...पुणे ः देशातील कोरोनाच्या प्रत्येक रुग्णाच्या...
कांदा विक्रीसाठी ‘पणन’चे प्रयत्नपुणे: कोरोना लॉकडाऊनमध्ये शेतमालाची पुरवठा साखळी...
दूध संकलनास टाळाटाळ करणाऱ्यांवर कारवाई...वर्धा ः  दूध संकलनास टाळाटाळ करणाऱ्या दूध...
पालघर, डहाणू, तलासरी तालुक्यात भूकंपाचे...मुंबई: पालघर जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून...
मोसंबी मागणीअभावी बागेतचऔरंगाबाद: परिपक्व झालेल्या मोसंबीच्या मृग...
लॉकडाऊनमुळे ‘निविष्टा’ कंपन्यांची उधारी...पुणे: लॉकडाऊनमुळे राज्यातील खते, बियाणे व कीडनाशक...
तीन दिवसांत एक हजार वीस टन द्राक्ष ...पुणे ः कोरोना विषाणूमुळे राज्यातील द्राक्ष...
विदर्भ, मराठवाड्यात पुर्वमोसमी पावसाचा...पुणे : राज्यात उन्हाचा चटका चांगलाच वाढल्याने...
हरभरा खरेदीच्या नोंदणीसाठी मुदतवाढमुंबई: किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत हमी...
हापूसच्या निर्यातीसाठी युद्धपातळीवर...मुंबई: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
लॉकडाऊन संपल्यानंतर राज्यांनी गर्दी...मुंबई : लॉकडाऊन संपविल्यानंतर १५ एप्रिलला लगेच...
रासायनिक खतांचा काळाबाजार होईल; गाफील...पुणे: “देशात रासायनिक खतांचा मुबलक साठा आहे....