Agriculture news in marathi, Benefit to six lakh farmers in Jalgaon district at increased rate | Page 3 ||| Agrowon

जळगाव जिल्ह्यातील सहा लाख शेतकऱ्यांना वाढीव दराने लाभ

टीम अॅग्रोवन
रविवार, 24 ऑक्टोबर 2021

जळगाव : जून ते ऑक्टोबर २०२१ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे, पूरपरिस्थितीमुळे पिकाचे नुकसान झाले. अशा शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्याचा शासन निर्णय राज्य शासनाने जाहीर केला आहे.

जळगाव : जून ते ऑक्टोबर २०२१ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे, पूरपरिस्थितीमुळे पिकाचे नुकसान झाले. अशा शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्याचा शासन निर्णय राज्य शासनाने जाहीर केला आहे. जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी प्रतिहेक्टरी दहा हजार, बागायत पिकांच्या नुकसानीसाठी प्रतिहेक्टरी १५ हजार, तर बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी २५ हजार रुपये प्रतिहेक्टर अशी वाढीव दराने मदत दिली जाईल. याचा जिल्ह्यातील सुमारे सहा लाख नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लाभ होईल. 

शासनाने दिलेल्या पत्रकानुसार, यंदा जून ते ऑक्टोबर २०२१ या कालावधीत राज्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टीचा फटका बसला. यामुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम हातातून गेला. फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले. ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे. तातडीने व वाढीव दराने नुकसानभरपाई मिळावी, यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.  या बाबतचा शासन निर्णय २१ ऑक्टोबरला जाहीर करण्यात आला आहे. 

या अगोदर राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरानुसार जिरायत पिकांसाठी दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रतिहेक्टरी सहा हजार ८०० रुपये इतकी मदत दिली जात होती. आता नवीन शासन निर्णयानुसार दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रतिहेक्टरी दहा हजार रुपये इतकी मदत मिळेल. बागायत पिकांसाठी अगोदर दोन हेक्टरच्या मर्यादेत १३ हजार ५०० रुपये प्रतिहेक्टर इतकी मिळणारी मदत आता १५ हजार रुपये प्रतिहेक्टर इतकी वाढविण्यात आली आहे. तर बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी दोन हेक्टरच्या मर्यादेत १८ हजार रुपये प्रतिहेक्टर इतकी मिळणारी मदत आता २५ हजार रुपये प्रतिहेक्टर इतक्या दराने मिळेल. 

मदत मिळण्याचा मार्ग मोकळा 

जळगाव जिल्ह्यात प्रामुख्याने चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, जामनेर, मुक्ताईनगर, रावेर आदींसह अन्य तालुक्यांचा समावेश होता. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात आले. यातून जिल्ह्यातील तब्बल सहा लाख पाच हजार १७१ शेतकऱ्यांचे नुकसान झाले. या सर्व शेतकऱ्यांना आता राज्य शासनाच्या निर्णयानुसार वाढीव दराने नुकसानभरपाई मिळेल. शेतकऱ्यांना सुमारे साडेपाचशे कोटी रुपयांची मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.


इतर बातम्या
मेंढ्यांच्या संरक्षणासाठी लवकरच योजना ...सुपे, जि. पुणे ः पावसाची संततधार, अतिवृष्टी व...
शेतकऱ्यांनी करून दाखवलं : डॉ. गौहर रझा नाशिक : नव्या भारताचे स्वप्न साकारण्यासाठी शेतकरी...
द्राक्ष पीकविमा योजना  विभागनिहाय...नाशिक : दोन दिवसांपासून राज्यात झालेल्या...
सोयाबीन दरातील सुधारणा  आठवड्याच्या...पुणे ः चालू आठवड्यात बुधवारनंतर सोयाबीन दरात...
‘जवाद’ चक्रीवादळाची  तीव्रता कमी होणारपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘जवाद’ चक्रीवादळ...
दर्जेदार कृषी विद्यापीठांत  राज्याला...पुणे ः देशातील पहिल्या २० दर्जेदार कृषी...
पुणे जिल्ह्यात १,२४५ ‘विकेल ते पिकेल’...पुणे : शेतीमालाला केवळ हमीभाव नाही तर हमखास भाव...
पुणे जिल्ह्यात धरणांत एक टीएमसी...पुणे : जिल्ह्यात दोन दिवसांपासून धुमाकूळ...
कोल्हापूर जिल्हा बँकेसाठी ३६८...कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा बॅंकेच्या...
सांगली जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पिकांचे...सांगली : जिल्ह्यामध्ये दोन दिवसांपूर्वी मुसळधार...
सांगली जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष पदाची...सांगली ः जिल्हा बँकेत अध्यक्षपदी आमदार मानसिंगराव...
नंदुरबार : पशुसंवर्धन विभागाच्या...नंदुरबार : पशुसंवर्धन विभागामार्फत सन २०२१-२२ या...
नंदुरबार : रब्बीचे अनुदानित बियाणे...नंदुरबार : कृषी विभागाच्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा...
खानदेशात मका लागवड घटणार  गहू, बाजरीची...जळगाव ः खानदेशात मका लागवड घटेल, असे संकेत आहेत....
नांदेड जिल्ह्यात नुकसानीच्या मदतीचे...नांदेड : अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी...
नगर जिल्ह्यात रब्बी पेरणी पोहोचली ३१...नगर ः रब्बी हंगामातील बहुतांश पिकांच्या पेरणीचा...
सातारा जिल्ह्यात मॉन्सूनोत्तर पावसाचा...सातारा ः जिल्ह्यात शुक्रवारी (ता.३) पावसाचा जोर...
रब्बी, उन्हाळी हंगामांत पिकांखालील...वर्धा : या वर्षी पाऊस लांबल्याने प्रकल्पांमध्ये...
सोलापूर :शेतकऱ्यांना दुधाळ गाई,...सोलापूर : पशुसंवर्धन विभागामार्फत दुधाळ गाई-...
वीज प्रश्‍नांवर सकारात्मक तोडगा काढणार...वाशीम : जिल्ह्यात विजेची समस्या दिवसेंदिवस गंभीर...