महाराष्ट्रात २०१२ च्या दुष्काळापासून दुग्ध व्यवसायाचा रुळावरून घसरलेला गाडा संकटाच्या खाईतच जात आ
ताज्या घडामोडी
संयुक्त सर्व्हेक्षणातून मिळावा पीकविम्याचा लाभ ः पालकमंत्री डॉ. फुके
भंडारा ः जिल्ह्यात मॉन्सूनोत्तर पावसामुळे झालेल्या नुकसानीचे कृषी विभाग व विमा कंपनीने संयुक्त सर्व्हेक्षण करावे. त्यासोबतच नुकसानग्रस्त प्रत्येक शेतकऱ्याला पीकविम्याचा लाभ देण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी दिले. नुकसानबाधित क्षेत्रासंबंधीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

जिल्हाधिकारी कार्यालयातील या बैठकीला खासदार सुनील मेंढे, आमदार राजू कारेमोरे, माजी आमदार बाळा काशीवार, अपर जिल्हाधिकारी विलास ठाकरे, उपविभागीय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदूराव चव्हाण यांची उपस्थिती होती. बैठकीच्या सुरवातीला नुकसानबाधित क्षेत्राविषयीची माहिती डॉ. फुके यांनी घेतली. कृषी विभाग व विमा कंपनी प्रतिनिधींनी संयुक्त सर्व्हे करण्याच्या सूचना या पार्श्वभूमीवर त्यांनी दिल्या.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण यांनी विमाधारक भंडारा, मोहाडी, तुमसर, पवनी, साकोली, लाखनी व लाखांदूर या सात तालुक्यांतील गावांमधून ११६७ शेतकऱ्यांकडून पंचनाम्यासाठी अर्ज आल्याचे सांगितले. प्राप्त अर्जांपैकी ४७९ अर्जांचे पंचनामे करण्यात आल्याची माहिती दिली. प्रशासनाने ही परिस्थिती संवेदनशीलपणे हाताळावी. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी व्हॉटसअप क्रमांक सुध्दा उपलब्ध करून देण्यात यावा, असे निर्देश पालकमंत्री डॉ. फुके यांनी दिले.
- 1 of 583
- ››