सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेतोरे (ता.वेंगुर्ला) येथील शेतकऱ्यांनी आंबा, काजू या मुख्य पिकांन
महिला
सीताफळातून होतो जीवनसत्त्वांचा पुरवठा
सीताफळात जीवनसत्त्व क अत्यंत चांगल्या प्रमाणात असते. त्याचप्रमाणे बी-६, बी-२, मॅग्नेशिअम आणि पोटॅशिअम यांचे चांगले प्रमाण असल्याने आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरते.
सीताफळात जीवनसत्त्व क अत्यंत चांगल्या प्रमाणात असते. त्याचप्रमाणे बी-६, बी-२, मॅग्नेशिअम आणि पोटॅशिअम यांचे चांगले प्रमाण असल्याने आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरते.
सीताफळात शर्करेप्रमाणे तंतुमय घटक व इतर पौष्टिक द्रव्ये आहेत. या फळातील शर्करा टिकाऊ ऊर्जा देते. त्यांचा इतर प्रक्रिया केलेल्या साखरेप्रमाणे शरीरातील इन्शुलिनवर वाईट परिणाम होत नाही. सीताफळात जीवनसत्त्वे, क्षार, फायबर आणि प्रथिने असतात, तसेच यात जवळ जवळ स्निग्ध पदार्थ नसतात. त्यामुळे सीताफळापासून शरीरास ऊर्जा मिळते.
- या फळात जीवनसत्त्व क अत्यंत चांगल्या प्रमाणात असते. त्याचप्रमाणे बी-६, बी-२, मॅग्नेशिअम आणि पोटॅशिअम यांचे चांगले प्रमाण आढळते. साधारणपणे १०० ग्रॅम गरामध्ये दिवसाला हव्या असणाऱ्या क जीवनसत्त्वाचा चांगला पुरवठा होतो. क जीवनसत्त्व हे अँटिऑक्सिडंट असते. त्याच्या सेवनाने कॅन्सरचा धोका टाळता येतो. ताणतणावातून जाताना तसेच संसर्गजन्य जंतूशी लढताना, शस्त्राक्रियेनंतर जखमा भरत नसतील तर आपणास क जीवनसत्त्वाची गरज भासते.
- सीताफळात मॅग्नेशिअमचा शरीरास आवश्यक असणारा साठा उपलब्ध असतो. मॅग्नेशिअममुळे स्नायूंना आराम मिळतो. ह्रदयविकार टाळण्यासाठी सुद्धा मॅग्नेशिअम शरीरास आवश्यक आहे. मज्जातंतू आणि सांध्यांची पोटॅशिअम, जीवनसत्त्व आणि क्षारांची गरज भागविण्यासाठी सीताफळांचे सेवन करावे.
- सीताफळात अमिनो ॲसिड आहे. त्यामुळे शरीराची प्राणवायूने होणाऱ्या प्रक्रिया करण्याच्या क्षमतेमध्ये वाढ होते.
ताज्या १०० ग्रॅम सीताफळ गरातील जीवनसत्त्व आणि पोषकद्रव्यांचा साठा
पाणी | ७३.५ टक्के |
प्रथिने | १.६ टक्का |
स्निग्ध पदार्थ | ०.३ टक्का |
तंतुमय पदार्थ | २.१ टक्के |
खनिजद्रव्ये | १.३ टक्का |
पिष्टमय पदार्थ | ६९.३ टक्के |
कॅल्शिअम | ०.०२ टक्का |
स्फुरद | ०.०४ टक्का |
उष्मांक | १०५ कॅलरी |
लोह | १.० टक्का |
संपर्कः डॉ. अविनाश काकडे, ८०८७५२०७२०
(राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)
- 1 of 14
- ››