शेतकऱ्यांना मिळणार विमा योजनेचा लाभ : बिराजदार

शेतकऱ्यांना मिळणार विमा योजनेचा लाभ : बिराजदार
शेतकऱ्यांना मिळणार विमा योजनेचा लाभ : बिराजदार

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ज्या अधिसूचित मंडळात सरासरीपेक्षा पाऊस कमी झाला. त्या पेरणी न करू शकलेल्या आणि प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा हप्ता भरलेल्या शेतकऱ्यांना विमा संरक्षित रकमेच्या २५ टक्केपर्यंत लाभ मिळणार आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार यांनी दिली.

बिराजदार यांनी दिलेल्या  माहितीनुसार, जिल्ह्यातील ज्या  अधिसूचित मंडळात सरासरीच्या २५ टक्केपेक्षा कमी पेरणी झाल्या. त्या ठिकाणी ज्वारीच्या क्षेत्रासाठी ही तरतूद लागू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. यामध्ये रब्बी ज्वारी (जिरायत) साठी ६९ अधिसूचित मंडळे आहेत. त्यापैकी १० मंडळे आणि रब्बी ज्वारी (बागायत) ५२ अधिसूचित मंडळे आहेत. त्यापैकी २१ मंडळात ही योजना लागू झाली आहे.

रब्बी ज्वारी (बागायत) साठी विमा संरक्षित रक्कम २७३०० प्रतिहेक्टर आहे. त्याला २५ टक्के म्हणजेच ६८२५ रुपये रक्कम मिळेल. रब्बी ज्वारी (जिरायत) साठी २१००० रुपये प्रतिहेक्टर आहे. त्याच्या २५ टक्के रुपये म्हणजेच ५२५० रुपये प्रतिहेक्टर विमा मदत मिळेल. ज्या शेतकऱ्यांनी रब्बी २०१८ हंगामात विमा हप्ता भरला आहे,  त्यानांच हा लाभ मिळेल. २५ टक्के रक्कम मिळाल्यानंतर त्या पिकासाठीचे विमा संरक्षण संपुष्टात येईल. जाहीर ३१ मंडळाव्यतिरिक्त मंडळात सरासरीच्या २५ टक्केपेक्षा जास्त पेरणी झाली आहे, अशा मंडळासाठी पीक हंगामाच्या शेवटी पीक कापणी प्रयोगाच्या आधारे पीकविमा मिळेल, असेही बिराजदार यांनी सांगितले.

ज्वारी (बागायत) मंडळे  दक्षिण सोलापूर तालुक्यातील- मंद्रुप, होटगी ,विंचुर, निंबर्गी करमाळा तालुक्यांतील केम, पंढरपूर तालुक्यांतील पंढरपूर, भंडीशेगांव  भाळवणी, करकंब, पटवर्धन कुरोली, पुळुज, चळे॰ तुंगत, कासेगांव, सांगोला तालुक्यातील सांगोला, शिवणे, जवळा, हतीद, सोनंद, कोळा, नाझरा, महुद बु, संगेवाडी, माळशिरस तालुक्यातील, माळशिरस, इस्लामपूर, अकलुज, लवंग, महाळुंग, पिलीव, वेळापूर या मंडळ/मंडळ गटाचा समावेश आहे.

ज्वारी (जिरायत) मंडळे  पंढरपूर तालुक्यातील पंढरपूर, भंडीशेगांव, भाळवणी, करकंब, पटवर्धन कुरोली, पुळुज, चळे, तुगंत, कासेगांव, माळशिरस तालुक्यांतील अकलुज, लवंग, महाळुंग, वेळापूर.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com