परभणी जिल्ह्यात अडीच लाख शेतकऱ्यांना सन्मान योजनेचा लाभ

परभणी जिल्ह्यात अडीच लाख शेतकऱ्यांना सन्मान योजनेचा लाभ
परभणी जिल्ह्यात अडीच लाख शेतकऱ्यांना सन्मान योजनेचा लाभ

परभणी : परभणी जिल्ह्यामध्ये एकूण शेतकरी संख्या ३ लाख ४७ हजार ९४८ शेतकऱ्यांपैकी अत्यल्पभूधारक आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांची एकूण संख्या २ लाख ५३ हजार ३१ एवढी आहे. या शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभ मिळण्याची शक्यता आहे. जानेवारीअखेरपर्यंत जिल्ह्यात असलेल्या अत्यल्प आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांची माहिती संकलित केली जात आहे. त्यामुळे योजनेच्या लाभार्थी संख्येत बदल होऊ शकतो, असे महसूल विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

महसूल विभागाकडील उपलब्ध माहितीनुसार, सद्यस्थितीत परभणी जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये एकूण ३ लाख ४७ हजार ९४८ शेतकरी आहेत. यामध्ये अत्यल्पभूधारक म्हणजे एक एकर पेक्षा कमी जमिनधारण क्षेत्र असलेले १ लाख ३० हजार १०४ शेतकरी, अल्पभूधारक म्हणजे एकूण ५ एकर जमिनधारण क्षेत्र असलेले १ लाख २६ हजार ९२७ शेतकरी आणि ५ एकरपेक्षा अधिक जमीनधारण क्षेत्र असलेले ९० हजार ९१७ शेतकरी आहेत.

यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये जाहीर करण्यात आलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्रतिवर्ष ६ हजार रुपये आर्थिक सहाय्य तीन टप्प्यांमध्ये देण्यात येणार आहे. ग्रामस्तरीय समितीमध्ये तलाठी हे समिती प्रमुख, तर ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, कृषी सहायक आणि विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे सचिव हे सदस्य आहेत. हे कर्मचारी पात्र शेतकऱ्यांकडून अल्पभूधारक असल्याचे शपथपत्र, आधार कार्ड, बँक पासबुक यांची सत्यप्रत आदी कागदपत्रे घेत आहेत. या शेतकऱ्यांच्या याद्या तयार करणार असून त्यावरील आक्षेप आणि दुरुस्तीनंतर पात्र शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर आर्थिक मदतीच्या पहिल्या हप्त्याची रक्कम जमा केली जाणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.

परभणी जिल्ह्यातील तालुकानिहाय शेतकरी संख्या

तालुका अत्यल्पभूधारक अल्पभूधारक बहुभूधारक  एकूण
परभणी २२५२५ २२३४३  १७२३२  ६२१०० 
जिंतूर १८५३४  २१०७० १७४१० ५७०१४
सेलू  १३०७७  १४६८५  ११४१४   ३९१७६
मानवत  ७५१३ ९६२४  ८१५८   २५२९५
पाथरी  ११०२० १३५८४  ६०३३ ३०६३७
सोनपेठ ८७४२  ८३१२  ५६४४  २२६९८
गंगाखेड १८७७३ १३४३० ९१३९ ४१३४२
पालम १२९९३  १०६८९ ७०१७ ३०६९९
पूर्णा  १६९२७   १३१९० ८८७० ३८९८७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com