hapus mango_1.jpg
hapus mango_1.jpg

आंबा प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी मिळणार लाभ

पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यासाठी आंबा हे पीक निश्‍चित करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत २०२१-२२ आर्थिक वर्षात जिल्ह्यातील १४१ प्रक्रिया उद्योजकांना लाभ दिला जाणार आहे.

रत्नागिरी ः पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यासाठी आंबा हे पीक निश्‍चित करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत २०२१-२२ आर्थिक वर्षात जिल्ह्यातील १४१ प्रक्रिया उद्योजकांना लाभ दिला जाणार आहे. त्यासाठी नवीन उद्योग उभारू इच्छिणाऱ्या किंवा सध्या असलेल्या उद्योगाचं विस्तारीकरण वा आधुनिकीकरण करू इच्छिणाऱ्यांना अर्ज करता येणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले. आत्मनिर्भर भारत पॅकेजमधून सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना केंद्र सरकारने राबविण्याचे निश्‍चित केले आहे. ही योजना २०२०-२१ ते २४-२५ या पाच वर्षांच्या कालावधीत राबवायची आहे. असंघटित क्षेत्रातील अन्न प्रक्रिया उद्योगांना आर्थिक बळ देऊन त्यामधून रोजगारनिर्मितीचा हा प्रयत्न आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या मालावरील प्रक्रिया उद्योगांना चालना दिली जाणार आहे. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातून आंबा या पिकाची निवड केली गेली आहे. यामध्ये नवा उद्योग उभारायचा असल्यास तो केवळ आंबा प्रक्रिया उद्योग असणे बंधनकारक आहे.  लाभार्थ्यांना बँक कर्जाशी निगडित एकूण पात्र प्रकल्प खर्चाच्या ३५ टक्के आणि जास्तीत जास्त १० लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे. त्यातून लाभार्थ्यांना उद्योगासाठी लागणारे भांडवली खर्च भागवता येऊ शकतात. यासाठी इच्छुकांनी ऑनलाइन अर्ज करावयाचा आहे. रत्नागिरी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून याची अंमलबजावणी होणार आहे. या योजनेचा लाभ वैयक्तिक पातळीवर किंवा गट स्वरूपातही घेता येऊ शकेल. अर्ज सादर करणे, सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करणे, कर्ज मंजुरीसाठी बँकेकडे पाठपुरावा करणे अशा विविध कामांमध्ये इच्छुक लाभार्थ्यांना साह्य करण्यासाठी जिल्हास्तरावर चार संसाधन व्यक्तींची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामध्ये डॉ. आनंद तेंडुलकर, अमर पाटील, उन्मेश वैशंपायन, शेखर विचारे यांचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com