agriculture news in marathi Benefits for setting up mango processing industry | Page 2 ||| Agrowon

आंबा प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी मिळणार लाभ

टीम अॅग्रोवन
बुधवार, 6 ऑक्टोबर 2021

पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यासाठी आंबा हे पीक निश्‍चित करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत २०२१-२२ आर्थिक वर्षात जिल्ह्यातील १४१ प्रक्रिया उद्योजकांना लाभ दिला जाणार आहे.

रत्नागिरी ः पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यासाठी आंबा हे पीक निश्‍चित करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत २०२१-२२ आर्थिक वर्षात जिल्ह्यातील १४१ प्रक्रिया उद्योजकांना लाभ दिला जाणार आहे. त्यासाठी नवीन उद्योग उभारू इच्छिणाऱ्या किंवा सध्या असलेल्या उद्योगाचं विस्तारीकरण वा आधुनिकीकरण करू इच्छिणाऱ्यांना अर्ज करता येणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले.

आत्मनिर्भर भारत पॅकेजमधून सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना केंद्र सरकारने राबविण्याचे निश्‍चित केले आहे. ही योजना २०२०-२१ ते २४-२५ या पाच वर्षांच्या कालावधीत राबवायची आहे. असंघटित क्षेत्रातील अन्न प्रक्रिया उद्योगांना आर्थिक बळ देऊन त्यामधून रोजगारनिर्मितीचा हा प्रयत्न आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या मालावरील प्रक्रिया उद्योगांना चालना दिली जाणार आहे. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातून आंबा या पिकाची निवड केली गेली आहे. यामध्ये नवा उद्योग उभारायचा असल्यास तो केवळ आंबा प्रक्रिया उद्योग असणे बंधनकारक आहे. 

लाभार्थ्यांना बँक कर्जाशी निगडित एकूण पात्र प्रकल्प खर्चाच्या ३५ टक्के आणि जास्तीत जास्त १० लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे. त्यातून लाभार्थ्यांना उद्योगासाठी लागणारे भांडवली खर्च भागवता येऊ शकतात. यासाठी इच्छुकांनी ऑनलाइन अर्ज करावयाचा आहे. रत्नागिरी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून याची अंमलबजावणी होणार आहे.

या योजनेचा लाभ वैयक्तिक पातळीवर किंवा गट स्वरूपातही घेता येऊ शकेल. अर्ज सादर करणे, सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करणे, कर्ज मंजुरीसाठी बँकेकडे पाठपुरावा करणे अशा विविध कामांमध्ये इच्छुक लाभार्थ्यांना साह्य करण्यासाठी जिल्हास्तरावर चार संसाधन व्यक्तींची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामध्ये डॉ. आनंद तेंडुलकर, अमर पाटील, उन्मेश वैशंपायन, शेखर विचारे यांचा समावेश आहे.

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
मुंबई विमानतळावरून होणार दैनंदिन ६६०...मुंबई : कोरोना निर्बंध शिथिल झाल्याने...
बैलगाडा शर्यतप्रकरणी सोमवारी सुनावणी राजगुरुनगर, जि. पुणे : बैलगाडा शर्यत बंदीविरोधात...
वाढीव वीजबिलांबाबत शेतकऱ्यांनी घेतली...मंगरूळपीर, जि. वाशीम : तालुक्यातील कासोळा,...
वऱ्हाडात आता विधान परिषद निवडणुकीचा बार अकोला : विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणुक...
सांगलीत एकावन्न हजार शेतकऱ्यांना १४...सांगली : डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत...
उस्मानाबाद जिल्ह्यात पीकविम्यावरून...उस्मानाबाद : जिल्हा प्रशासन व पीकविमा कंपनीमध्ये...
नाशिक जिल्ह्यात कांदा लिलाव सुरूनाशिक : जिल्ह्यातील बाजार समिऱ्यांमध्ये कांदा...
रत्नागिरीतील १५०३ गावांची पैसेवारी ५०...रत्नागिरी : खरीप हंगामात भातपीक घेणाऱ्या गावातील...
शेतकऱ्यांनो, ऊसतोडी घेऊ नका : पाटीलकऱ्हाड, जि. सातारा : साखर कारखान्यांनी एकरकमी...
जळगावात महाविकासच्या ‘सहकार’ला...जळगाव : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीतून भारतीय जनता...
कापसाला यंदा दर; मात्र उत्पादकतेत मोठी...अकोला : कापसाचा दर वाढल्याने बाजारपेठेत उत्साही...
विठोबा शेतकरी गटाकडून सेंद्रिय...नांदेड : कोरोनाच्या काळात सेंद्रिय पद्धतीने...
अमरावती विभागात १२८९ गावांची पैसेवारी...अमरावती : या वर्षी खरीप हंगामात अतिवृष्टी व...
सरकार आणि साखर कारखानदारांना विरोधात...परभणी : मराठवाड्यातील अनेक कारखान्यांनी यंदा अजून...
सांगली जिल्हा बँक निवडणूक : अठरा...सांगली : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत २१ पैकी तीन...
शेतकऱ्यांचे ८० लाख रुपये घेऊन...गोवर्धन, जि. नाशिक : गिरणारे येथील एका...
राज्यात दुधाच्या गुणवत्तेबाबत तडजोड...संगमनेर, जि. नगर : राज्यात दुधाच्या शुद्धतेबाबत...
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीवर भाजपचा...जळगाव : जळगाव जिल्हा बँक संचालकपदाच्या निवडणुकीवर...
परभणीत केवळ ७६७ टन डीएपी शिल्लक परभणी : जिल्ह्यात रब्बी हंगामातील सरासरी खताच्या...
निर्यातक्षम फळनिर्मितीतूनच शेतकऱ्यांची...नागपूर : शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक सुबत्ता...