Agriculture news in marathi ber is Rs. 800 to 4000 per quintal In the state | Agrowon

राज्यात बोरं ८०० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 13 डिसेंबर 2019

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात बोराची आवक वाढते आहे. पण, मागणी असल्याने दरही टिकून आहेत. बोराला प्रतिक्विंटलला सर्वाधिक २२०० रुपये इतका दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. 

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात बोराची आवक प्रतिदिन १०० ते २०० क्विंटलपर्यत आहे. देशी बोरासह ॲपल बोराचा समावेश त्यात सर्वाधिक आहे. बोराची आवक स्थानिक भागातून सांगोला, पंढरपूर, मोहोळ, माढा भागातून आहे. बाहेरील आवक तुलनेने कमीच आहे. देशी बोराला मागणी असली, तरी त्याची आवक तुलनेने कमी आहे. 

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात बोराची आवक वाढते आहे. पण, मागणी असल्याने दरही टिकून आहेत. बोराला प्रतिक्विंटलला सर्वाधिक २२०० रुपये इतका दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. 

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात बोराची आवक प्रतिदिन १०० ते २०० क्विंटलपर्यत आहे. देशी बोरासह ॲपल बोराचा समावेश त्यात सर्वाधिक आहे. बोराची आवक स्थानिक भागातून सांगोला, पंढरपूर, मोहोळ, माढा भागातून आहे. बाहेरील आवक तुलनेने कमीच आहे. देशी बोराला मागणी असली, तरी त्याची आवक तुलनेने कमी आहे. 

सप्ताहात बोराला प्रतिक्विंटलला किमान ५०० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक २२०० रुपये असा दर मिळाला. या आधीच्या सप्ताहातही आवक वाढलेलीच राहिली. प्रतिदिन २०० ते २५० क्विंटलपर्यंत होती. दर किमान ६०० रुपये, सरासरी १८०० रुपये आणि सर्वाधिक २५०० रुपये असा मिळाला. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यातही आवक चांगलीच राहिली. पण दर प्रतिक्विंटलला ५०० रुपये, सरासरी १३०० रुपये आणि सर्वाधिक २००० रुपये राहिला. एकूणच १००- २०० रुपयांच्या फरकाने दरातील तेजी टिकून राहिली. देशी बोरांना प्रतिक्विंटलमागे २०० ते ३०० रुपयांनी अधिक दर राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

नाशिकमध्ये १००० ते २००० रुपये

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता.११) बोरांची १२० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल १००० ते २००० रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १४५० रुपये होते, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

मंगळवारी (ता.१०) बोरांची आवक १४८ क्विंटल झाली. त्यास १५०० ते २००० असा प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर १४५० रुपये होते. सोमवारी (ता.९) ही आवक १४४ क्विंटल झाली. त्या वेळी १००० ते २००० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर १४५० होते. 

शनिवारी (ता.७) बोरांची आवक ६४ क्विंटल झाली. त्यांना १००० ते १००० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १४५० रुपये होते.
शुक्रवारी (ता.६) बोरांची आवक ८४ क्विंटल झाली. त्यास १००० ते २००० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १४५० होते. गुरुवारी (ता.५) आवक ५ क्विंटल झाली. त्यास १००० ते २००० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १४५० होते. बाजार समितीत आवक सर्वसाधारण होती. गेल्या चार दिवसांत आवक वाढत असून त्यानुसार दर १००० ते २००० दरम्यान होते. १४५० वर सर्वसाधारण दर स्थिर आहेत.

औरंगाबादेत ८०० ते १२०० रुपये 

औरंगाबाद येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. १२) बोराची ४२ क्‍विंटल आवक झाली. त्यांना ८०० ते १२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये ३० नोव्हेंबरला १४ क्‍विंटल आवक झाली. त्या वेळी बोरांना १२०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला.

५ डिसेंबरला ३० क्‍विंटल आवक झालेल्या बोराचे दर ७०० ते १३०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ७ डिसेंबरला ३४ क्‍विंटल आवक झाली. त्या वेळी बोराला १००० ते १८०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ९ डिसेंबरला १३ क्‍विंटल आवक झालेल्या बोराचे दर ६०० ते १६०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १० डिसेंबरला ३० क्‍विंटल आवक झालेल्या बोराचे दर १००० ते १४०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ११ डिसेंबरला २२ क्‍विंटल आवक झालेल्या बोरांना ६०० ते १२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

परभणीत १००० ते १२०० रुपयांचा दर

परभणी येथील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता. १२) बोरांची २० क्विंटल आवक होती. त्यांना प्रतिक्विंटल १००० ते १२०० रुपये दर मिळाला, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली. सध्या येथील मार्केटमध्ये बोरांची सोलापूर जिल्ह्यातून आवक होत आहे. गत महिनाभरातील प्रत्येक गुरुवारी बोरांची सरासरी २० ते २५ क्विंटल आवक होती. त्या वेळी प्रतिक्विंटल सरासरी १००० ते २००० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. १२) बोरांची २० क्विंटल आवक झाली. त्या वेळी घाऊक विक्रीचे दर १००० ते १२०० रुपये होते. किरकोळ विक्री प्रतिकिलो ३० ते ४० रुपये किलो दराने सुरू होती, असे व्यापारी शेख समीर यांनी सांगितले.

नगरमध्ये एक हजार ते तीन हजार रुपये क्विंटल 

नगर कृषी बाजार समितीत गुरुवारी (ता. १२) ४८ क्विंटल संकरित बोरांची आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल १००० ते ३००० व सरासरी २००० रुपयांचा दर मिळाला आहे. बोरांची आवक कमी जास्त प्रमाणात होत असली, तरी या आठवड्यात आवक वाढली आहे. 

नगर बाजार समितीत नगरसह शेजारच्या बीड, सोलापूर, औरंगाबाद जिल्ह्यांतून बोरांची आवक होत असते. ५ डिंबरला २३ क्विटंलची आवक होऊन १००० ते ३००० व सरासरी २००० रुपयांचा दर मिळाला आहे. २८ नोव्हेबरला २२ क्विंटल बोरांची आवक होऊन १००० ते २८०० व सरासरी १९०० रुपयांचा दर मिळाला. २१ नोव्हेंबरला १८ क्विंटलची आवक होऊन १००० ते ३००० व सरासरी २००० रुपयांचा दर मिळाला आहे. मागील आठवड्यापेक्षा या आठवड्यात बोरांची आवक वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि पावसाच्या भीतीने आवकेत वाढ होताना पाहायला मिळत आहे.

कोल्हापुरात प्रतिकिलोस १० ते २० रुपये दर

कोल्हापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बोरांची दीडशे ते दोनशे बॉक्‍स आवक होत आहे. त्यांना किलोस १० ते २० रुपये दर मिळत आहे. बाजार समितीत सोलापूर उस्मानाबाद भागातून बोरांची आवक होते. गेल्या पंधरा दिवसांपासून बोरांची आवक स्थिर असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

येत्या काही दिवसांत बोरांची आवक काहीशी कमी होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे बोरांच्या दरात वाढ होईल, असा अंदाज बाजार समितीतून व्यक्त करण्यात आला. स्थानिक ठिकाणाहून बोरांची आवक होत असली, तरी ती अत्यल्प असल्याची माहिती बाजार समितीतून देण्यात आली.

अकोल्यात १८०० ते २५०० रुपये 

अकोला येथील बाजारात गेल्या १५ दिवसांपासून बोरांची आवक सुरु झाली आहे. आठवड्याला एक ते दोन गाडी आवक होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

गुरुवारी (ता.१२) बोरांना १८०० ते २५०० रुपयांदरम्यान प्रतिक्विंटलचा दर मिळाला. येथील बाजारात सध्या पश्‍चिम महाराष्ट्रातून बोरांची आवक सुरु झाली आहे. आठवड्यातून एक किंवा दोन गाड्यांची आवक सुरु आहे. येत्या आठवड्यात ही आवक आणखी वाढेल. थंडीच्या दिवसांमध्ये मिळणाऱ्या बोरांना संक्रांतीपर्यंत बाजारात चांगली मागणी राहते. सध्या पश्‍चिम महाराष्ट्रातील बोरांची आवक असली, तरी येत्या आठवड्यानंतर लगतच्या जिल्ह्यांमधून बोर विक्रीसाठी दाखल होणार असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. गुरुवारी १८०० ते २५०० दरम्यान बोरांची विक्री झाली. किरकोळ विक्री ५० ते ६० रुपये प्रतिकिलो दराने ग्राहकांना केली जात होती.

नागपुरात किरकोळ बाजारात प्रतिकिलो ४० रुपयांचा दर

नागपूर : कळमणा तसेच महात्मा फुले भाजी बाजारात सद्या गावरान बोरांची नसली, तरी ऍपल बोरांची थोड्याफार प्रमाणात आवक आहे. सरासरी ४०० ते ५०० किलोच बोरांची खेप सद्या बाजारात येत असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. 

येत्या काळात ही आवक वाढण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. ऍपल बोरांसोबतच गावरान बोर थेट किरकोळ व्यापाऱ्यांना दिली जात आहेत. किरकोळ बाजारात गावरान बोर ४० रुपये किलो, तर ऍपल बोर ९० ते ९५ रुपये किलोने विकले जात आहेत. आवक कमी असल्याच्या परिणामी बोरांचे दरात काहीशी तेजी आली आहे. यापुढील काळात आवक वाढणार असल्याने दरात किंचित घसरण होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

दरातील ही घसरण किरकोळ राहणार असल्याने फारसा प्रभाव बोरांच्या बाजारपेठेवर होणार नाही. महात्मा फुले बाजारात व्यापाऱ्यांना व्यापारास मज्जाव करण्यात आला आहे. त्यांना कळमणा बाजार समितीतच व्यवहार करावा लागत आहे. काही व्यापारी महात्मा फुले भाजी बाजारात तळ ठोकून आहेत. त्यांच्याकडे काही भागातून बोरांची आवक होत आहे.

ताज्या बाजार भावासाठी क्लिक करा


इतर बाजारभाव बातम्या
खानदेशात मका दरात सुधारणाजळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
औरंगाबादमध्ये मोसंबीला सर्वसाधारण ३०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
कोल्हापूर : गुळाच्या दरात १५० रुपयांनी...कोल्हापूर : बाजार समितीत गेल्या आठ दिवसांमध्ये...
राज्यात बटाटा १००० ते २६०० रुपयेऔरंगाबादमध्ये क्विंटलला १००० ते १२५० रुपये...
नाशिकमध्ये भेंडीला सर्वसाधारण २९१० रुपयेनाशिक : ‘‘येथील बाजार समितीमध्ये भेंडीची आवक ५२...
नाशिकमध्ये कांद्याच्या दरात सुधारणानाशिक: नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
नगरमध्ये तूर ४००० ते ५५०० रुपये...नगर ः नगर येथील दादा पाटील कृषी उत्पन्न बाजार...
खानदेशात कांद्याच्या दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात कांदा दरात सुधारणा सुरूच आहे. दर...
औरंगाबादमध्ये मक्यासह तुरीचे दर स्थिरजालना : येथील बाजार समितीमध्ये गत आठवड्यात ५ ते ९...
पुण्यात भोगीनिमित्त गाजर, मटारला मागणीपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत द्राक्षांना क्विंटलला ६०००...औरंगाबाद : येथील बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. ९...
परभणीत शेवग्याला क्विंटलला ५००० ते ८०००...परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
आंबिया संत्र्याला मिळाला २२ हजार...नागपूर : बाजारात संत्र्याचे दर गडगडले असतानाच...
राज्यात कांदा २०० ते ३५०० रुपयेसोलापुरात प्रतिक्विंटला २०० ते ३५०० रुपये...
नाशिकमध्ये दोडक्याची आवक सर्वसाधारण;...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
खानदेशात मक्याची आवक कमीजळगावः खानदेशात प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
जळगावात आले प्रतिक्विंटल ३००० ते ५०००...जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
नागपुरात संत्रा, मोसंबीचे दर ‘जैसे थे’नागपूर : मागणीअभावी  संत्रा दरात घसरण झाली...
नगरला वाल, घेवड्याच्या दरात सुधारणानगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
पुण्यात हिरव्या मिरचीच्या दरात वाढ पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...