लोकसहभागातून बेरारी शेळीचे जतन गरजेचे ः डॉ. भिकाने

बेरारी शेळी पैदासकारांची संघटना स्थापन केल्यास संघटनेच्या माध्यमातून राजमान्यता मिळालेल्या शेळीस लोकमान्यता मिळेल, असे आवाहन सहयोगी अधिष्ठाता प्रा. डॉ. अनिल भिकाने यांनी केले.
Berari goat needs to be saved through public participation: Dr. Begging
Berari goat needs to be saved through public participation: Dr. Begging

अकोला ः विदर्भाच्या उष्ण वातावरणात तसेच पूर्व विदर्भातील अतिपावसाच्या भागात तग धरून राहण्याची क्षमता असणाऱ्या ‘बेरारी’ या जातीच्या शेळीस राष्ट्रीय पातळीवर शेळीची २३ वी जात म्हणून २०१२  मध्ये मान्यता मिळाली आहे. परंतु या भागातील पशुपालक या जातीबद्दल अजूनही अनभिज्ञ आहेत. त्यामुळे ते शेळीपालनासाठी राज्याच्या इतर भागातून अथवा परराज्यांतून शेळ्या आणतात. म्हणून बेरारी या शेळीच्या जातीचा प्रचार व प्रसार होणे गरजेचे आहे. हे काम लोक सहभागातून शक्य आहे. यासाठी बेरारी शेळी पैदासकारांची संघटना स्थापन केल्यास संघटनेच्या माध्यमातून राजमान्यता मिळालेल्या शेळीस लोकमान्यता मिळेल, असे आवाहन सहयोगी अधिष्ठाता प्रा. डॉ. अनिल भिकाने यांनी केले.

बेरारी शेळीपालकाना व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र आणून बेरारी शेळी पैदासकारांची संघटना स्थापण्यासाठी पुढाकार घेत असल्याची माहितीही त्यांनी दिली. स्थानिक स्नातकोत्तर पशुवैद्यक आणि पशुविज्ञान संस्थेच्या वतीने बेरारी शेळी पैदासकारांचा नुकताच ऑनलाइन मेळावा घेण्यात आला. या वेळी अध्यक्षस्थानावरून डॉ. भिकाने बोलत होते.

बेरारीचे संशोधक तथा पशुआनुशवंशिकी व पैदासशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. शैलेंद्र कुरळकर यांनी बेरारी शेळीचे उगमस्थान, पैदास, गुणवैशिष्ट्ये व महत्त्व सांगितले. बेरारी शेळी काटक असून, या जातीत जुळे देण्याचे प्रमाण ६० टक्के असल्याचे संशोधनात दिसून आल्याचे म्हणाले.

कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध भागांतून विशेषत: विदर्भातून मोठ्या संख्येने शेळीपालक, तज्ज्ञ, पशुवैद्यक सहभागी होते. चर्चेत सजल कुलकर्णी, नरेश देशमुख, अविल बोरकर, अंजिक्य शहाणे, नानू माहुले, राजरत्न वानखडे, तन्मय गिरी, अरविंद कोटे, रामेश्‍वर चव्हाण, पुरुषोत्तम ढबाले आदींनी सहभाग घेतला. डॉ. गिरीश पंचभाई यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. प्रवीण बनकर यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com