पर्यटनस्थळांवर सर्वोत्तम सुविधा द्याव्या ः राज्यमंत्री तटकरे

नाशिक विभागातील पर्यटनस्थळांचा एमटीडीसीच्या माध्यमातून संपूर्ण विकास करून त्यात पर्यटकांना सर्वोत्तम सुविधा पुरविण्यावर भर देण्यात यावा. तसेच ती पर्यटनस्थळे लवकरात लवकर पर्यटकांच्या सेवेत आणावीत, अशा सूचना पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी दिल्या आहेत.
Best facilities should be provided at tourist places: Minister of State Tatkare
Best facilities should be provided at tourist places: Minister of State Tatkare

नाशिक : नाशिक विभागातील पर्यटनस्थळांचा एमटीडीसीच्या माध्यमातून संपूर्ण विकास करून त्यात पर्यटकांना सर्वोत्तम सुविधा पुरविण्यावर भर देण्यात यावा. तसेच ती पर्यटनस्थळे लवकरात लवकर पर्यटकांच्या सेवेत आणावीत, अशा सूचना पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी दिल्या आहेत.

नाशिक येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या ग्रेप रिसॉर्ट येथे सोमवारी (ता. २१)आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलिल, प्रादेशिक व्यवस्थापक जगदीश चव्हाण, पर्यटन विभागाचे कार्यकारी अभियंता विनय वावधनी, स्थापत्य अभियंता महेश बागुल, विद्युत विभागाचे अभियंता सतीश चुडे, कनिष्ठ अभियंता रोहित अहिरे, कुलदीप संख्ये आदी उपस्थित होते.

राज्यमंत्री तटकरे म्हणाल्या, की शिर्डी येथील एमटीडीसीच्या पर्यटक निवासामध्ये पर्यटकांना त्यांच्या आवश्यकतेनुसार माफक दरात सोयी, सुविधा पुरविण्यासाठी नियोजन करण्यात यावे. त्यामुळे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पर्यटक निवासांचा अधिक प्रमाणात लाभ घेऊ शकतील. तसेच नाशिक येथील गंगापूर कन्वेन्शन केंद्र, कलाग्राम केंद्र, यासोबतच नंदूरबार जिल्ह्यातील संगमेश्वर, केदारेश्वर मंदिर परिसर आदी पर्यटनस्थळांचा विकास करण्यासाठी प्राप्त झालेल्या निधीच्या माध्यमातून तेथील कामांचा प्राधान्यक्रम ठरवून त्यानुसार कामे पूर्ण करण्यात यावीत.

विभागातील सर्व पर्यटन स्थळांचा विकास करत असताना कालबद्ध कार्यक्रम निश्चित करून प्रकल्प शंभर टक्के पूर्ण करण्यावर भर देण्यात यावा. कुठलेही काम अपूर्ण अवस्थेत ठेवू नये. अथवा अंशत: पूर्ण करू नये, असेही राज्यमंत्री तटकरे यांनी यावेळी सांगितले.

बैठकीनंतर राज्यमंत्री तटकरे यांनी ग्रेप पार्क रिसोर्टची पाहणी करून गंगापूर येथील बोट क्लब प्रकल्पास देखील भेट दिली. तसेच राज्यमंत्री तटकरे यांनी बोटींगचे पहिले तिकीट काढून बोटींग पर्यटनाच्या पहिल्या मानकरी ठरल्या. याप्रसंगी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. तर पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा सिंह नायर उपस्थित होत्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com